आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाॅप ‘टिप्स’: चिमुकल्यांचा सर्दी-ताप अन‌् पालकांची काळजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहान मुले खेळता-खेळता रडू लागतात... त्यानंतर त्यांची कुरकूर सुरूच रहाते. ते का कुरकुरतात बरेच वेळा कळत नाही... मग त्यांचे नाक वहायला लागते, ताप येताे... याच वेळी त्यांचे अंगही कसकसत असते... पण ते लहान असल्याने त्यांना हे सांगता येत नाही. म्हणून मग पालकांनाही या गाेष्टी फारशा कळत नाहीत. अशा वेळी तत्काळ डाॅक्टरकडे मुलांना तपासणीसाठी न्यावेच, पण काही प्रथमाेपचारही असतात किंवा त्यांना सर्दी, ताप, खाेकला या गाेष्टी कशामुळे हाेतात हेदेखील समजून घेतले पाहिजे. त्यावरच प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न...
बाळाला औषधे लिहून दिल्यावर ३-४ प्रश्न आता नित्याचेच झाले आहेत. डॉक्टर यात सर्दी, खोकला आणि तापाचे औषध कोणते आहे? पुढच्या वेळी असाच त्रास झाला, तर हे औषध चालेल ना? प्रथमोचार म्हणजे सुरुवारीला केले जाणारे उपचार. लहान बाळांमध्ये विशेषतः तीन महिन्यांपेक्षा रहाणे योग्य नाही. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते घातक ठरू शकते. कारण अशा बाळांमध्ये कसल्याही पूर्वसूचनेशिवाय त्यांची प्रकृती ढासळण्याचा धोका असतो. मोठ्या बाळांमध्ये मुलांमध्ये मात्र, जर त्यांच्या लघवीचे प्रमाण आणि वागणूक नेहमीसारखी असेल, तर आपण प्रथमोपचारावर विसंबून राहू शकतो. पण त्याचवेळी त्यांच्या आजारावर बारीक लक्ष असणे आवश्यक असते. जर दाेन दिवसांपेक्षा जास्त दिवस आजारांची लक्षणे कायम राहिली, तर डॉक्टरांच्या मदतीने योग्य निदान करणे जरुरी असते. ताप, अंगदुखी, साधी जखम अशा दुखण्यापासून आराम देणारी औषधे बालकाच्या प्रथमोपचारासाठी घरी ठेवावेत.
ताप :
ताप हा आजार नसून, एक अथवा अधिक रोगांचे लक्षण आहे. ठराविक आजार वगळता ताप हा सामान्यत: शरीराला संसर्गामुळे होतो. काखेत मोजलेले शरीराचे तापमान १०० अंश F किंवा ३८ अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास ताप आहे असे समजावे.
मुळात ताप हा शरीराचा संरक्षण शास्त्र आहे. जे जंतू संसर्गापासून आपल्या शरीराला मुक्त करते. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष करू नये.

तापासाठी पेरासिटामोल हे एक सुरक्षित औषध आहे. हे क्रोसिन, मेटासिन, कॅप्सूल या नावाने प्रसिद्ध आहे. या औषधाचा उद्देश पूर्णत: तापमुक्ती नसून तापापासून होणाऱ्या त्रासापासून आराम देणे तापाची तीव्रता कमी करणे हा आहे. ताप आणि दुखण्यासाठी अजूनही बरीच औषधे असली तरीही पेरासिटामोल हेच सर्वात सुरक्षित औषध आहे. पण ते योग्य प्रमाणात घेणे जरुरी आहे.
तापाची तीव्रता कमी करण्यासाठी कोमट पाण्याने अंग पुसून घेणे. थंड पाणी किंवा बर्फाचा वापर करू नये. तीव्र तापात डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवून फारसा उपयोग होत नाही. याने ताप कमी झाला नाही तर डॉक्टरांना भेटावे.
सर्दी :
सर्दी म्हणजे नाक गळणे किंवा नाक बंद होणे. साधारणपणे सर्दी ही विषाणंूमुळे होते किंवा अॅलर्जीमुळे होते. या दोन्ही गोष्टी हानिकारक नाहीत आणि औषधांमुळे बऱ्याही करता येत नाहीत. निसर्गताच या कमी होतात.
औषधांच्या मदतीने आपण फक्त यामुळे होणारा त्रास कमी करू शकतो. पण सर्दीचा जास्त त्रास होत नसेल, तर औषधाचा वापर टाळावा.
बाळाच खाणं किंवा बाळ अाईचे दूध पीत असेल, तर दूध पिण्याचे प्रमाण, झोपेचे प्रमाण, खेळकरपणा या नेहमीच्या गोष्टी जर व्यवस्थित चालू असतील, तर औषधांची शक्यतो गरज नसते.
जर नाक बंद झाले असेल, तर नॉर्मल सलाइन, औषधाचे थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये टाकून श्वसनासाठी मोकळे करावे.
खोकला :
खाेकल्याची होण्याची कारणे अनेक आहेत. त्यामुळे प्रत्येक खोकल्यासाठी एकच औषध वापरणे चुकीचे आहे. खालील उपायांमुळे खोकला पूर्णतः थांबवता नाही आला तरी खोकल्यामुळे होणारा त्रास कमी करता येऊ शकतो.
डोक्याकडचा भाग झोपतेवेळी २० ते ३० अंशावर ठेवणे.
कोमेट पाण्याचा घोट घेऊन सतत ओला ठेवणे.
घरामधले तापमान योग्य राखणे, हवा खेळती ठेवणे.
मध आणि लिंबाचा रस याचे चाटण देणे.
खडीसाखर चघळून घसा सतत ओला ठेवणे.
अर्थातच जर दमा, क्षयरोग, न्यूमोनिया असा आजार असेल तर मूळ आजाराचा इलाज करणे आवश्यक असते. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावा.
बातम्या आणखी आहेत...