आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

... अन‌् होमिओपॅथीने केली डेंग्यूवर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी मंगेश एस पोहनकर, आणि सध्या शहरात डेंग्यूची साथ चालू असताना मला आलेला अनुभव व्यक्त करत आहे. माझ्या पत्नीला एका रात्री अचानक हातपाय व सांधे दुखू लागले ताप येऊ लागला, दोन दिवस तिला रात्रभर झोप येत नसायची अक्षरश: ती वेदनेने रडायची. तिस-या रात्री तिला श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला मग आम्ही जनरल फिजिशियनकडे गेलो त्यांनी रक्ताच्या तपासण्या करण्यास सांगितल्या. त्याचे प्रमाण असे होते डब्ल्यूबीसी काऊंट ११०० प्लेटलेट काऊंट १४३००० त्यावरून डेंग्यूची लागण असल्याचे जाणवले,डब्ल्यूबीसी काऊंट कमी झालेला बघून त्यांनी मेडिसीन दिले आणि सांगितले दोन दिवसांत काऊंटमध्ये सुधार नाही झाला तर आपल्याला दवाखान्यात भरती व्हावे लागेल. मला हे ऐकून खूप भीती वाटली कारण डेंग्यूच्या उपचारासाठी दवाखान्यात भरती झाले म्हणजे खूप खर्च लागणार त्यात ६ – ७ दिवसांचा न झेपणारा खर्च. त्यात दिवसेंदिवस तिच्या प्लेटलेट ३०००० ते ४०००० नी कमी होत होत्या. तीला भरती केल्याशिवाय पर्यायच नव्हता, पण नशिबाने योगायोग असा घडला की दुस-याच दिवशी दिव्य मराठीमध्ये डेंग्यूबद्दल, होमिओपॅथीमध्ये डेंग्यूवर उपचार केले जातात हे समजले आणि मी लगेच होमिओपॅथिक उपचार सुरू केले. त्यांनी दिलेली औषधी संागितल्याप्रमाणे घेतली आणि दु्स-याच दिवशी त्रास कमी होऊ लागला. सांधेदुखी कमी झाली हळूहळू ताप येणे बंद झाले. दोन दिवसांनी रक्ताच्या तपासण्या केल्या डब्ल्यूबीसी २३००, प्लेटलेट १२५००० झाल्या, मग डॉक्टरांनी पुन्हा दोन दिवसांची औषधी दिली आणि पुन्हा दोन दिवसांनी तपासण्या करून येण्यास सांगितले दम्याच्या काळात तिचा त्रास पूर्णपणे कमी झालेला होता, तरी आमची खात्री व्हावी म्हणून दोन दिवसांनी पुन्हा रक्त तपासणी केली असता रीपोर्ट बघून असे वाटले की ही काहीतरी जादूच झाली डब्ल्यूबीसी २९०० व प्लेटलेट २२६००० हे काऊंट बघून तर मला खूपच आनंद झाला. आणि त्यानंतर पुन्हा चार दिवसांनी केलेली तपासणी तर विश्वास बसणार नाही अशीच होती, डब्ल्यूबीसी ५३००, तर प्लेटलेट ३६५००० हे रीपोर्ट बघून तर तिला पूर्णपणे डेंग्यूपासून बरी झाल्याची खात्री मला झाली. तिला दवाखान्यात भरती करण्याची वेळ आली. पण होमिओपॅथीमुळे ती टळली. त्यात डेंग्यू या आजारावर उपचार शक्य आहे. माझी खात्री झाली कारण मी तो अनुभव घेतला. उपचारादरम्यान कुठलेही इंजेक्शन किंवा भरती करायची गरज पडली नाही.

आज शहरात डेंग्यूमुळे इतकी भयानक स्थिती असून लोक होमिओपॅथिक उपचार घेत नाही किंव्हा त्यांना माहीत नाही याबद्दल खंत वाटते. होमिओपॅथिक उपचारपद्धतीचा लोकांनी विचार करणे गरजेचे आहे कारण इतर उपचार पद्धतीपेक्षा खूप कमी खर्चात उपचार होणारी ही पद्धती आहे.