आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनीलचे रहस्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
४ वर्षे होऊनही सुनील आणि त्याच्या पत्नीचे सतत वाद होते. तिच्यावर विश्वास नाही, असं तो म्हणायचा, संसार मोडू नये म्हणून तिचाही आटापिटा होता. समस्या नेमकी कुठे होती?
सुनील, वय अठ्ठावीस. नोकरीला जाणारा. पत्नी ग्रॅज्युएट, तीही दिवसभर नोकरीला जाणारी. दोघे सकाळी कामासाठी घराबाहेर पडत, ती संध्याकाळीच घरी परतत. घर भाड्याचेच. आर्थिक परिस्थिती ठीकठाक. लग्न होऊन चार वर्षं झाली. अजून त्यांना मूल नव्हतं. दोघांचे सतत वाद होत. दोघेही नीट संसारात रमलेले दिसत नव्हते. एकमेकांवर विश्वास नव्हता. पतीपत्नीचं नातं काय असतं हे त्यांना सांगणारं, समजवणारं कुणी मोठं माणूस घरात नव्हतं. तरीही तिला संसार करावा, मूल व्हावं, दोघांनी नीट संसार करावा, असं वाटत होतं. मग समस्या कुठे होती?

तिच म्हणणं की, ‘घरात आम्ही दोघेच असतो संध्याकाळी. पण आमचा संवाद होत नाही. कधी आम्ही दोघे फिरायला जात नाही. सुटीच्या दिवशी फिरणं किंवा पिक्चर, नातेवाईक, असा काहीही विरंगुळा नाही. मीच नवऱ्याच्या मागे लागते, मी पुढाकार घेते. फिरायला जाऊ, गप्पा मारू. एकटे एकटे का बसता? नुसताच टीव्ही बघतात, कॉम्प्युटरवरच असतात. माझ्यात रमत नाहीत. माझ्या जवळ येत नाहीत. माझा तिरस्कार करतात.’

का? त्याने उत्तर िदले, ‘तिच्यावर माझा विश्वास नाही. वेळीअवेळी घरी येते, पगाराचा खुलासा देत नाही. आज भाड्याचे घर घेऊन तीन महिने झाले तरी तिने आजून सामान मांडले नाही. मी बाहेरच जेवतो. घरात स्वच्छता नाही. मला तिच्या सोबतच राहायचं नाही. ’
तिला विचारलं. सत्य बाहेर आलं. ‘तो म्हणतो ते बरोबर, पण सगळं तसं नाही.’ ‘अगं, मग का नांदत नाहीस नीट?’
तर ती म्हणाली, ‘मॅडम, आम्ही नुसतेच नवरा बायको नात्याने एका छताखाली राहतो, पण रात्री इतर वेळी मनाने शरीराने कधीच आम्ही एकत्र नसतो. आमचे शरीरसंबंधच होत नाहीत. रात्री मी त्याला विनवते, नीट वागा सांगते. पण हा दुसऱ्या खोलीत झोपतो. दार आतून बंद करतो. कारण कॉम्प्युटरवरती भलतीच चित्रं बघण्याचा त्याला खूप नाद आहे. त्यातच तो रमतो. त्याला मी लागत नाही. त्याला स्वत:चं समाधान स्वत:च करून घेण्याची सवय लागलीये आणि त्यातच तो रमतो. मी प्रेमाने जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर तो दूर लोटतो मला.’

‘सांगा कसा संसार करू? का त्याला स्वयंपाक करून खाऊ घालू? पैशाला आम्हाला काही कमी नाही. दोघेही नोकरी करतो. परंतु त्याला मी, माझ्या भावना, मन, शारीरिक गरज याची जाणीवच नाही आणि त्याला त्याचाच छंद, नाद आहे. तरीही मी नांदते मॅडम. मला संसार मोडायचा नाही.’
मी त्याला समजावलं. हस्तमैथुन करतोस, पत्नी असताना हे योग्य आहे का? तू २८ वयाचा. लग्न झालं, चार वर्षे होऊन अपत्य नाही. तिची मानसिकता किंवा समाज, नातेवाईक यांचाही विचार कर. आणि पत्नीच्या अधिकाराचा आणि पती म्हणन तिच्या सर्व गरजांचाही तू विचार कर. तुझ्याशिवाय ती अपूर्णच आहे. थोडंसं त्याला पटलं. पत्नीशी नीट राहीन असा होकार दिला त्याने आणि ती दोघं गेली.

पण मी विचार केला, असे किती तरुण, तरुणी स्वत:मध्येच रमत असतील. जोडलेल्या नात्यात रमणे, नैतिकता सांभाळणे, सवयींचा अतिरेक, दुष्परिणाम याबद्दल तरुणांना सांगायला हवंय. तसंच चांगले आचरण, आरोग्यासाठी संस्कार, व्यायामाचे धडे देणे गरजेचे आहे. सुनीलसारखी झपाट्याने वाढणारी मानसिकता थोपवायची आहे. त्यासाठी मुली, मुले वयात येताना त्यांना शरीरात होणारे बदल, मानसिक, भावनिक बदलांविषयी स्पष्ट नीट माहिती दिली जावी. म्हणजेच ते चुकीचा नाद, दिशा धरणार नाहीत. मुलामुलींच्या आवडी-निवडी, छंद, एकांतात रमणं, फिरणं हे सगळं मोठ्यांच्या नजरेतून सुटता कामा नये. तेव्हाच घरातून तरुण मुलामुलींना आधार आहे असे वाटेल.
shrirampreeti27@gmail.com
बातम्या आणखी आहेत...