आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेक्षकांचा 'टाइमपास'नि 'कोर्टा'ची उन्हाळी सुटी!!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेक्षक म्हणून मोठ्या संख्येने बोकाळलेल्या मध्यमवर्गाने वीकएंड कल्चर अाता चांगलेच स्वीकारले अाहे. क्वचितच, या तथाकथित वर्गाची तोंडी लावण्यापुरती सामाजिक संवेदना जागी होते; पण एरवी त्याला साेमवारी कामावर रुजू होताना नैराश्य अाणणारा चित्रपट नको असतो, असे गृहीत धरणा-या चित्रपटांची, निर्मात्यांची, दिग्दर्शकांची संख्या अाता मराठीत वाढली अाहे. त्यांच्या दृष्टीने या प्रेक्षकवर्गाचे ‘तणाव’ समजून घेत, त्यांना डाेकेउठाड पण विचार करायला भाग पाडणा-या चित्रपटांपेक्षा ‘रिलिफ’ देणारा चित्रपटच द्यायला हवा. शॉपिंग, पिकनिक अशा सगळ्या माध्यमांतून रिलॅक्सेशन शाेधणा-या प्रेक्षकाला चित्रपट हे मनोरंजनाचेच माध्यम वाटते; सामाजिक भान जागवण्याचे नाही, हे मराठी चित्रपटांनी लक्षात घ्यायला हवे, नि हिंदीसारखी ‘दबंग’ शैली अनुसरावी, हाही त्यातला छुपा संदेश. त्यामुळे मराठीत अाता सामाजिक भान जपणारे चित्रपट येताहेत नि प्रेक्षक ते स्वीकारताहेत, ही परीकथा न रचलेलीच बरी. दुर्दैवाने ‘दबंग’ शैलीतल्या चित्रपटांचे प्रेक्षकांना गृहीत धरणे खरे ठरते अाहे. ‘टाइमपास २’ हे याचे अत्यंत ताजे उदाहरण अाहे. या चित्रपटाने १ मेला प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स अाॅफिसवरचे अाजवरचे इतर मराठी हिट चित्रपटांचे सगळे रेकॉर्ड‌्स मोडले, ते या गृहीतकांच्याच अाधारे.

थाेडे फसवणुकीचे चित्र अाहे, खरे. काही चित्रपटगृहांमध्ये ‘टीपी २’ हाऊसफुल नव्हता, अगदी पहिल्या शनिवारीही नि रविवारीही. अर्थात, येथे ज्या दुस-या चित्रपटाशी तुलना लेखामध्ये केली जाणार अाहे, त्या चित्रपटाच्या तुलनेत मात्र ‘टीपी २’ बॉक्स अाॅफिसवर हिटच अाहे, यात
नवल नाही. ज्या एस्सेल व्हिजनने ‘फॅन्ड्री’सारख्या (जाे प्रदर्शित झाला. त्यानंतर जवखेड्यासारख्या ठिकाणी दलित हत्याकांड घडले!!) चित्रपटाचे प्रमोशन केले, त्या एस्सेल व्हिजनला ‘अंतर्गत कारणास्तव’ ‘कोर्ट’ सारख्या चित्रपटाला फारसे उचलता अाले नाही. त्यामुळे एस्सेलसारख्या मराठीत अाघाडीवर असणा-या कंपनीलाही अापली समाजव्यवस्था बदलू पाहणा-या सिनेमांपेक्षा गल्लाभरू चित्रपटांमध्ये ‘व्हिजन’ सापडले, यात नवल
नाही. १ मेलाच ‘टीपी २’ रिलीज करायचा, इतके पद्धतशीर धोरण अाखणा-या एस्सेलला महोत्सवांमध्ये अनेक ठिकाणी गाजणा-या ‘कोर्ट’ला वेळीच उचलता अाले नाही, हे मात्र विशेष!
येथे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, फक्त गृहीतकांचा मामला अाहे. जसे ‘टीपी २’ने प्रेक्षक बाळबोध अाहे, त्याला डोके बाजूला ठेवून, संवेदना बाजूला ठेवून चित्रपट बघायचा अाहे, हे गृहीत धरले; तसेच दुसरीकडे १७ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘कोर्ट’ने प्रेक्षक अाता सुजाण, संवेदनशील, सुज्ञ अाणि प्रगल्भ होत चालला अाहे, असे गृहीत धरले. याहीपेक्षा ‘कोर्ट’ने प्रेक्षकांनी अापल्याला समजून घ्यावे, ते घेतीलही, अ ापण माेडलेली सिनेमाची, सगळ्यांचीच चाैकट ते स्वीकारतील, हे अधिक गृहीत धरले. या गृहीतकाला सपशेल अापटवण्यात ‘टीपी २’सारखे अनेक चित्रपट देऊन एस्सेल व्हिजननेच माेडीत काढले.

साहजिकच ‘टीपी २’चे गृहीतक नेहमीप्रमाणे फळाला अाले. ‘विकी डोनर’ या हिंदी चित्रपटासारखी माऊथ पब्लिसिटीही ‘कोर्ट’च्या वाट्याला उलटल्यासारखीच अाली. ‘टीपी २’ने मोका साधत महाराष्ट्र दिनाला डंका वाजवला, सलमान-अामीर-शाहरुखसारखे सण-दिन तत्सम मसाला दिग्दर्शकांनी वाटून घ्यायला सुरुवात केली, ‘कोर्ट’ने केवळ अलीकडे घडणा-या सामाजिक-राजकीय घटनांची पार्श्वभूमी निवडली, जी मुळात सामान्य, मध्यमवर्गाला अद्याप नीटशी उमजलेलीच नाही. फेस्टिव्हलचा सिनेमा अाता कमर्शिअली गाजायला लागला अाहे, हा भ्रम ‘कोर्ट’ने दूर केला. ज्या मध्यमवर्गाने चित्रपटाचा अाशय, असा चित्रपट पडद्यावर येण्यामागची कारणे समजून घेणे अपेक्षित होते, त्यांनी पॉपकॉर्न खाऊन मध्यंतरानंतर
चित्रपट सोडणे वा ‘सहन करणे’ पसंत केले. या मध्यमवर्गाला ‘टीपी २’ला शिट्या मारताना, नि ‘कोर्ट’ पाहताना अस्थानी हसताना खरे लाज वाटायला हवी होती. पण मॉलमध्ये विंडो शॉपिंग, प्रसंगी खरेदी, नि एखाद्या रेस्टॉरंटमध्ये अायटीत की अायअायटीत करिअर करायचे, याची
चर्चा करणा-या या वर्गाकडून अपेक्षा करून ‘कोर्ट’च्या वाट्याला नेमके काय आले? दोन रांगांच्या मध्ये संतापाने सांडलेले पॉपकॉर्न आणि फेसबुकवरची व्हर्च्युअल समीक्षा नि एखाद्याचे थिएटरमध्ये घोरत झोपणे? (चित्रपटात झोपलेल्या न्यायाधीशासारखे!!) कुणालाच आपले विद्रूप रूप अारशात पाहायला अावडत नाही. ‘कोर्ट’ने नेमके मध्यमवर्गाचे हे रूप दाखवले नि मध्यमवर्ग जांभया देत बाहेर पडला.

एकीकडे, ‘टीपी २’ ने दगडू-प्राजक्ताचा हिट फॉर्म्युला पहिल्या भागाप्रमाणेच दुस-यातही कामी येईल, हे जाहिरातीच्या नि मार्केटिंगच्या बळावर गृहीत धरले; नि त्यात ‘टीपी २’ ला अपेक्षेप्रमाणे यश आले. ओसी पिल्स घेऊन पोटातला सामाजिक कळवळा असणारा उरलासुरला जीवही मारून टाकत ‘मानसिक स्वास्थ्याची’ काळजी घेणा-या, नर्व्ह‌्ज डिस्टर्ब न होऊ देणा-या वर्गाकडून खरे तर ‘टीपी २’ने रास्त अपेक्षा केली, नि ‘कोर्ट’ने अवास्तव.
मध्यमवर्गाला झोपवण्यात ‘टीपी २’ला यश अाले, नि ‘कोर्ट’ला त्यांना जागे करण्यापेक्षा त्यांची झोपच वाजवी अाहे, हे सिद्ध करण्यात. या ‘मास’ प्रेक्षकाला थोडी ट्रिटमेंट बदलून ‘कोर्ट’ला पकडता अाले असते का? अाले असते, पण चित्रभाषेची मोडतोड करताना एक चांगला सामाजिक अ ाशय ‘ कोर्ट’ने प्रयाेग केल्यासारखा वापरला, हे प्रेक्षकांनी त्याला दाद न देऊन सिद्ध केले. त्यामुळे ‘कोर्ट’चे फलित नेमके काय? केवळ एक उत्कृष्ट चित्रपट ठरणे, हे राष्ट्रीय पुरस्काराने शिक्कामोर्तब केलेले फलित की अाशयाचा न साधला गेलेला प्रत्यक्ष परिणाम हे फलित? शुगरकोटेड पण संवेदनशील सिनेमे चालतात, हे ‘कोर्ट’ला ओळखता अाले नाही. सिनेमा हा प्रेक्षकाच्या जवळचा अाहे, त्यातून तो प्रेक्षकाला बदलू शक तो, त्याची झाेपी गेलेली संवेदना जागी करू शकताे, हे गृहीतकही सपशेल फेल ठरत अाले, अाणि ठरते अाहे. त्यामुळे ‘टीपी २’ने तीन दिवसांत १० तोटी मिळवलेत, नि याच काळात ३ मेला ‘ तोर्ट’ने राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणे, यात या दोहोंचे यशापयश नेमके कशात अाहे, हे तर कळून
येतेच; शिवाय अापला प्रेक्षक नेमका अजून कुठे अडकून अाहे, हेही... प्रेक्षकांचा असा निर्बुद्ध टाइमपास काही संपणारा नाही. तूर्तास ‘ कोर्ट’सारख्या चित्रपटांनी उन्हाळी सुटीवर जाण्यातच हशील अाहे!!! नि ‘टीपी २’ने अाणखी टाइमपास केला आणि प्रेक्षकांची शाळा आणखी लांबली
तर मराठी सिनेमा गाठेल, अाणखी काही फसवणुकीचे अाकडे...!

dahalepriyanka28@gmail.com
बातम्या आणखी आहेत...