आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यत्र तत्र तंत्र - फाइल्स डिलीट झाल्या? काळजी नको!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधी तरी डिलीट झालेला एखादा फोटो किंवा जुने गाणे आठवले की आपला मूड एकदम खराब होतो. अशा फाइल पुन्हा मिळवण्यासाठी अद्ययावत अॅप्लिकेशन्स सध्याच्या स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध आहेत. त्याविषयी...
स्मार्टफोनची काळजी घेणाऱ्यांसाठी सगळ्यात मोठा प्रश्न असतो डेटा रिकव्हरी. म्हणजेच एकदा डिलीट झालेल्या फाइल्स किंवा फोटो पुन्हा कसे शोधायचे. यासाठीदेखील अँड्रॉइड प्लेस्टोअरवर आता वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये डम्पस्टर्स, बॅकअप फाइल्ससारखे पर्याय पाहायला मिळतात. हे अॅप्लिकेशन्स मोबाइलमधली बरीच स्पेस खाणारे असले तरी, त्यांना किती महत्त्व आहे हे वेगळे सांगायला नको. कधीतरी पूर्वी डिलीट झालेला एखादा फोटो किंवा जुने डिलीट झालेले गाणे शोधायचे असल्यास आपला मूड खराब करून घेण्या शिवाय पर्याय नव्हता. आता असे होणार नाही. डम्पस्टर्समध्ये फोनमधील डिलीट केलेली प्रत्येक फाइल सापडते.
डम्पस्टर्स —
प्लेस्टोअरवर डम्पस्टर्स नावाने सर्च केल्यावर डम्पस्टर्सचे सगळे पर्याय दिसतात. या पर्यायांमध्ये एडिटर्स चॉइस नावाने सेपरेट केलेल्या पर्यायांवर भर द्यायला हवा. यामध्ये मोबाइलमधून डिलीट केलेली प्रत्येक इमेज तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल. रिस्टोअर ऑप्शनमध्ये गेल्यास डिलीट झालेल्या या सगळ्या फाइल पुन्हा मोबाइलमध्ये स्टोअर करता येतात.
फाइल मॅनेजर —
फाइल मॅनेजर जवळजवळ सगळ्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहेत. या फाइल मॅनेजरमध्येसुद्धा बॅकअप फाइल नावाचा पर्याय पाहायला मिळतो. या बॅकअपमुळे मोबाइलमधला सगळा डाटा एका सर्व्हरशी लिंक केला जातो जेणेकरून मोबाइल खराब झाला, रिसेट करावा लागला तरी डाटा डिलीट होत नाही.
बॅकअप डाटा —
बॅकअप डाटा नावाने अॅप स्टोअरवर सर्च केल्यास सगळ्या प्रकारच्या बॅकअप फाइल पाहायला मिळतील. त्यातही प्रामुख्याने असे अॅप्स असतात ज्यामध्ये फक्त कॉन्टॅक्ट, फाइल्स किंवा इमेजेसचा बॅकअप घेतला जातो. याविषयी अधिक माहिती प्रत्येक अॅपच्या स्पेसिफिकेशन्समध्ये दिलेली असते. ही तपासून घेतल्यास पुढे अडचणी येणार नाहीत.
saee.kawale@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...