आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांवरील खड्ड्याचे दुष्परीणाम : पंचकर्म चिकित्सेने मणक्यांचे होते पोषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज कोणतेही शहर असाे वा गाव प्रत्येक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. या खराब रस्त्यांमुळे अनेक प्रकारचे रोग उद्भवतात. ज्याप्रमाणे गाडी नेहमी खड्ड्यांच्या रस्त्यावर फिरल्यामुळे गाडीचे शाॅक अ‍ॅब्जाॅर्बर लवकर खराब होतात. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचे शॉक अ‍ॅब्जाॅर्बर समजले जाणारे मणके लवकर खराब होतात. त्यामुळे आज तरुण वयामध्ये देखील अनेकांना मणक्यांचे आजार झालेले दिसून येतात.

आजाराचे स्वरूप
{मणक्यांची झीज होणे {दोन मणक्यांमधील गादी (डिस्क) सरकणे {दोन मणक्यांमधील शीर दबणे {स्पाॅन्डिलाॅसिस
लक्षणे : {मान, पाठ, कंबर दुखणे {हात, पाय दुखणे {हात, पायाला मुंग्या येणे {हात पाय सुन्न पडणे {चक्कर येणे
>ज्यांचा गाडीवर नियमितपणे १५ कि.मी. पेक्षा अधिक प्रवास होतो. >पाठीवर, कंबरेवर पूर्वी मार लागलेला असणे. > व्यायाम व पोषक आहाराचा अभाव.
आहार-विहारातील उपाय
>गाडीचा कमीत कमी वापर करावा > नियमित व्यायाम करावा डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाने) > गाईचे दूध व गाईचे साजूक तूप आहारात असावे > भोपळा, दोडका, पडवळ यासारख्या फळभाज्या आहारात असाव्या >नियमित सेवन करावे
उदाहरण : एक ४८ वर्षीय पुरुष रोगी पाठ व मान दुखणे, हातापायांमध्ये मुंग्या व सुन्नपणा होणे इत्यादी लक्षणे घेऊन तपासणीसाठी आला. रुग्णाच्या mri मध्ये कंबरेचे व मानेचे स्पाॅन्डिलाॅसिस तसेच दोन मणक्यांमधील गादी सरकलेली असल्याचे निदान होते. त्याला पंचकर्मातील संजीवनी संशोधित तेलांचा ग्रीवाबस्ती, पृष्ठबस्ती, संजीवनी संशोधित बस्ती, पिण्डस्वेद यांचा तसेच काही आयुर्वेदिक औषधी नियमितपणे ४ महिन्यांसाठी दिल्यानंतर त्या रुग्णाचे सर्व लक्षणे कमी झाली व सर्वात महत्त्वाचे त्याला जो ऑपरेशनचा सल्ला दिला होता, ते ऑपरेशन न करता तो आनंदपूर्ण आयुष्य जगतो आहे.
चिकित्सा : {पंचकर्मातील संजीवनी संशोधित तेलाचा कटिबस्ती, पृष्ठबस्ती, संजीवनी संशोधित बस्ती पिण्डस्वेद यांचा अत्यंत उत्तम फायदा होतो {मणक्यांचे पर्यायाने अस्थींचे पोषण करणा-या विविध औषधींचा उत्तम लाभ मिळतो.
घ्यावयाची काळजी
>गाडीचे शाॅक अ‍ॅब्जाॅर्बर नेहमी चांगल्या कंडीशनमध्ये ठेवावे, जेणेकरून शरीराच्या शाॅक अ‍ॅब्जाॅर्बरवरील (मणक्यांवरील) वर्कलोड कमी होईल.
> गाडी व्यवस्थित चालण्यासाठी ज्याप्रमाणे ऑइलिंगची गरज असते. तसेच शरीर व्यवस्थित चालण्यासाठी देखील ऑइलिंग (सेवन)ची आवश्यकता असते. त्यामुळे नियमितपणे सेवन (औषधींनी संशोधित तेल सर्व शरीराला हलक्या हाताने लावावे, चोळू नये) करावे.
> ज्याप्रमाणे आपण गाडीची नियमित सर्व्हिसिंग करून गाडीतील छोटेमोठे प्राॅब्लेम दूर करतो, त्याप्रमाणे शरीराची सर्व्हिसिंग म्हणजे पंचकर्म चिकित्सा करून प्रकृतीशी संबंधित छोट्यामोठ्या तक्रारी दूर करून घ्याव्यात.