आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एज्यु कॉर्नर : मुंगीचे अनुकरण करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आपण ज्या मॅनेजमेंट गुरू व त्याच्या तत्त्वज्ञानािवषयी चर्चा करणार आहोत. तो कोणी व्यक्ती नव्हे तर ती आहे ‘मुंगी’. हो, अगदी बरोबर वाचलत ‘मुंगी’!
Wise men says "Mothernature is the most experienced of all
teachers, only the foolish refuse not to learn form here.'

निसर्गातले पशू-पक्षी एखाद्या मॅनेटमेंट गुरूला शोभावे असे व्यवहार करत असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंगी. मुंगीच्या वागण्यातून, आपण बरंच काही िशकू शकतो. त्यापैकी चार महत्त्वाची तत्त्व जी मुंगी आपल्याला शिकवते, ती पुढीलप्रमाणे.

चिकाटी आणि कणखरपणा
१ ) खचून न जाणाऱ्या चिवट मुंग्या (Never give up)
२) भविष्याचा वेध घेणाऱ्या मुंग्या (Look ahead)
३) विजिगीषू मुंग्या (Stay Positive)
४) क्षमतेचा पुरेपूर कस लावणाऱ्या मुंग्या (Do all you can)

१) खचून न जाणाऱ्या चिवट मुंग्या : ‘चिकाटी’चे उत्तम उदा. म्हणजे मुंगी. परिस्थिती कशीही असली तरी मुंगी आपले काम सोडत नाही.तिच्या मार्गात तुम्ही कितीही अडथळे आणा, त्या अडथळ्यांवर मात करून मुंगी आपली मार्गक्रमणा चालूच ठेवते. हे फक्त ितच्या अंगी असलेल्या चिकाटीच्या गुणामुळेच. त्याप्रमाणेच ज्या व्यक्तीच्या अंगी िचकाटी आहे ती व्यक्ती कुठल्याही अडथळ्यावर मात करू शकते. "Ant never quits &
it is focused on it's goal. It has the attitude of ""Winners never quit,
and Quitters nerer win.''
२) भविष्याचा वेध घेणाऱ्या मुंग्या : मुंग्या भविष्याचा वेध उत्तम प्रकारे घेतात. त्या उन्हाळ्यात हिवाळ्याचा िवचार करून ठेवतात. म्हणजे उन्हाळ्यातच िहवाळ्यासाठी लागणाऱ्या अन्नधान्याची सोय करून ठेवतात. हे तत्त्व मानवी जीवनालासुद्धा लागू पडते. आपल्या आयुष्यातसुद्धा हिवाळे येतच असतात. अशा वेळी येणाऱ्या खडतर काळाला तोंड देण्याची तयारी आपण वर्तमानकाळातच केली पािहजे. ज्यामुळे आपण जगण्याची गती
कायम राखू शकतो जी आजच्या स्पर्धेच्या युगात आवश्यक असते.
३)विजिगीषू मुंग्या : हिवाळ्यातल्या खडतर दिवसांमध्येसुद्धा मुंग्यांमधली िवजिगीषू वृत्ती कयम दिसून येते. हे िदवस निघून जाऊन उन्हाळ्याचा रमणीय काळ येणारच आहे, यावर त्यांचा अतूट िवश्वास असतो. ही सकारात्मक प्रवृत्ती संकटाच्या िदवसातसुद्धा कायम असते. याच प्रवृत्तीमुळे त्या िहवाळ्यातही बाहेर पडतात, कडाक्याची थंडी असेल तर त्या परत मागे िफरतात, तर रोज बाहेर पडतात मात्र नक्की. सुयोग्य नियोजनाने
मुंग्यात हा आत्मविश्वास आलेला असतो. हेच सूत्र तुम्हा आम्हाला आयुष्यातील आपल्या खडतर िदवसात लागू होते.
४) क्षमतेचा पुरेपूर कस लावणाऱ्या मुंग्या : मुंग्या आपल्या कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करतात. आपली गरज पूर्ण करताना मुंग्या आपल्या क्षमतेचा १००% वापर करतात. घेतलेल्या कामात किंवा त्या प्रयत्नात कोणतीही कसूर न ठेवता, सर्व गोष्टी मुंग्या सचोटीने करत असतात आणि त्यामुळेच त्या िहवाळ्यासाठी लागणाऱ्या अन्नधान्याची सोय उन्हाळ्यातच करू शकतात. यावरून आपले ध्येय गाठताना आपण हाती असलेल्या सर्व क्षमतेचा व साधनांचा पुरेपूर वापर करणे हा मंत्र ही िचमुकली मुंगी आपल्याला देते.

तत्त्वज्ञान
थोडक्यात ही मुंगी आपल्याला Never give up, Look ahead, stay Positive आणि Do-
all-you can ही महत्त्वाची, आयुष्यात सुखसमृद्धी िमळवण्याची तत्त्वे िशकवत असते. याबरोबरच िशस्तबद्धता, नेतृत्व सहकार्य, टीमवर्क यासारखे गुणही आपण मुंगीकडून िशकू शकतो. आपण सर्वांनी मुंगीचे बारकाईने निरीक्षण करून तिच्या जगण्याच्या शैलीचे अनुकरण केल्यास आयुष्यातील अनेक संकटांवर मात करणे सोपे जाईल.