आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकला गुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्लॅनेटोरिअममधलं आकाश नि तारांगण बघून बाहेर पडताना थक्क झालेल्या ६-७ वर्षांच्या महीनच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं.
‘आई, हे सगळे ग्रह, तारे कसं काय तयार झालं असेल?’ त्यानं कमालीच्या कुतूहलानं विचारलं.
‘अरे, हे सगळं जग, विश्व देवानं तयार केलंय बरं का! म्हणून आपण त्याला नमस्कार करतो,’ विद्याने तिच्यावरच्या संस्कारानुसार उत्तर िदलं.
‘मग सगळे प्राणी आिण माणसं पण देवानेच केली आहेत का?’
‘हो तर!’
‘पण हे सगळं तयार करायला देवानं सामान कुठून आणलं?’ महीनचे प्रश्न िवद्याला हळूहळू िनरुत्तर करू लागले.
‘चल लवकर आता घरी. मला खूप कामं आहेत,’ असं म्हणून तिनं त्याच्या प्रश्नावलीला लगाम घातला.
घरी येईपर्यंत महीनला भूक लागली. त्याला लाडूच पाहिजे होता. लाडू तर तयार नव्हते. मग ‘गूळदाण्याचा करून देऊ?’ विद्यानं विचारलं.
‘यस्स,’ खुश होऊन महीनचे डोळे चमकले.
िवद्यानं गूळ, दाणे िमक्सरमध्ये घातले. पण तेवढ्यात वीज गेली. महीन एकदम िहरमुसला. पण आई म्हणाली, ‘अरे, वीज गेली तरी मी खलबत्त्यात कुटून करून देते ना! नाही तरी पूर्वी कुठे होते िमक्सर? त्याचा शोधच लागला नव्हता.’
‘मग पूर्वी सगळ्यांकडे फक्त खलबत्तेच होते का?’
‘हो माझी आई, आजी सगळं खलबत्त्यातच कुटायच्या.’
‘खलबत्ते पण देवानंच करून ठेवले होते का?’
िवद्याला हसू आलं. मग त्याला समजेल अशा सोप्या भाषेत तिनं मानवजातीचा इितहास सांगायला सुरुवात केली. माणसानं हळूहळू शोध कसे लावले, पूर्वी गुहेत राहणा-या माणसानंच नंतर घरं कशी तयार केली हे ऐकण्यात महीन अगदी रंगून गेला.
‘मग पूर्वी माणसाला घर नव्हतं तेव्हा त्याला रात्री भीती वाटत असेल नं?’ महीनच्या शंका सुरू झाल्या.
‘होऽना!’ िवद्या सांगू लागली. ‘रात्री भीती वाटायची तर! खूप मोठ्ठा धो धो पाऊस पडला, िकंवा कधी भूकंप झाला, जंगलाला आग लागली तर घाबरायचीच ना माणसं. त्यांना कळायचंच नाही की कोण असं करतंय? तसंच कधी कधी चांगल्या गोष्टीही पाहायला िमळायच्या. झाडावर फुलं कशी येतात, काही फुलांची फळं कशी होतात याचंही नवल वाटायचं. मग माणसांना असं वाटलं की कोणती तरी अद््भुत शक्ती हे सगळं करत असेल. चांगल्या गोष्टी करणा-या शक्तीला त्यानं देव मानलं. वाईट गोष्टी करणा-या शक्तीला दुष्ट शक्ती.’
‘पण तू तर म्हणाली होतीस की समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन त्याचे ढग बनतात आिण पाऊस पडतो. आिण जमिनीच्या खालचा गरम रस हलला की भूकंप होतो, असं.’
‘हो तसंच आहे. पण त्या काळात ते माणसाला माहीत नव्हतं ना, म्हणून त्यानं अशी समजूत करून घेतली.’
‘अरेच्चा! म्हणजे माणसानंच देव तयार केलाय की गं आई! देवानं माणूस नाही केला,’ महीननं लगेच तर्कशक्ती लढवली.
विद्या अवाक् झाली. िपढ्यान् िपढ्या ितच्यापर्यंत िझरपत आलेल्या विचारसरणीबाहेर ती कधी पडलीच नव्हती. महीननं मात्र एकाच झटक्यात विचारशक्तीला खुलं केलं होतं. विद्यानं त्याच्या बुिद्धमत्तेला, तर्काला मानलं. त्या चिमुकल्या गुरूविषयीच्या कौतुकानं अन् अिभमानानं ितचा ऊर भरून आला.