आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्वगंधा-आस्कंद : एक शक्तिवर्धक औषधी वनस्पती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अश्वगंधाच्या नागोरी, जवाहर,
असगंद आदी 20 सुधारित जाती :

अश्वगंधा वनस्पतीची दोन मीटर उंचीपर्यंतची झुडपे मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. या वनस्पतीचे पुष्प पिवळट, लहान, गोल, रसदार भरपूर बीज असलेले, तर पिकल्यावर गुंजेसारखे लालसर दिसणारे असतात. एक मीटरपर्यंत जमिनीत लांब असणा-या मुळाचा घोड्याचा घामासारखा वास येतो, म्हणून याला अश्वगंधा किंवा ग्रामीण भागात आस्कंद म्हटले जाते. शरद ऋतूत फुले व त्यानंतर फळे येतात. वर्षाऋतूत बी पेरतात व हिवाळ्यात मुळे काढून घेतली जातात. संपूर्ण भारतात तसेच हिमालयात 1.5 उंचीपर्यंत तर मध्य प्रदेशाच्या मंदसोर जिल्ह्यात व्यापारी तत्त्वावर लागवड केली जाते. अश्वगंधाच्या नागोरी, जवाहर, असगंद आदी 20 सुधारित जाती आहेत. शेतकरीसुद्धा याची गादी वाफ्यावर रोप तयार करतात किंवा सरी वरंबा पद्धतीने रोपे तयार झाल्यावर 45 दिवसांनी लागवड केली जाते. लागवडीच्या वेळी 25 नगसाठी, 30 स्फुरदनंतर 40 दिवसांनी 45 किलो नत्र प्रती हेक्टरी दिले जाते. दोन ते तीन वेळा याची खुरपणी झाल्यावर गरजेनुसार याचा उपयोग औषधी भाग म्हणून करतात. हेक्टरी उत्पादन 100 किलो बी, तर 15 क्विंटल वाळलेली मुळे मिळते. साल काळी, खडबडीत आणि त्यात सरळ चिरा असलेली, पूर्ण वाढलेले लाकूड सुगंधी असते. ही झाडे भारताच्या दक्षिण भारतात नैसर्गिक अवस्थेत उगवतात. बुलडाणा जिल्हा व चिखली परिसरातही यांचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे.


बहुगुणी औषधी आहे
या झाडाच्या लाकडापासून काढलेले तेल औषधी आहे. हे तेल मुत्राशय सुजण्याच्या, परमा आणि कफ होण्याच्या उपचारात वापरले जाते. लाकूड पाण्याबरोबर उगाळून लेप तयार करतात. तो सुजेवर, तापात कपाळावर व त्वचारोगावर लावला जातो. बिब्यापासून काढलेले तेल त्वचारोगावर वापरले जाते. लाकडाची भुकटी, अगरबत्ती तयार करण्यासाठी वापरण्यात येते. सुगंधी भुकटी म्हणून हीदेखील तेल, साबण, उटणे इत्यादींमध्ये स्नानाच्या सामानात वापरली जाते. कीटकनाशक म्हणूनही याचा वापर केला जातो.


अश्वगंधाची मागणी अधिक
अश्वगंधा या वनस्पतीला आस्कंद नावाने ओळखले जाते. या वनस्पतीच्या मुळापासून बनवलेल्या पावडरला जास्त मागणी आहे. ही पावडर 400 रुपये किलोच्या दराने विकली जाते, असे चिखली येथील आयुर्वेद औषधी विक्रेते गोपाल शेटे यांनी सांगितले.


लोकांना महत्त्व नाही
शहरात अश्वगंधा वनस्पती विखुरलेल्या अवस्थेत दिसून येते. याकडे कोणाचेही लक्ष नाही. मात्र, हीच वनस्पती पावडर अथवा द्रवरूपाने औषधी दुकानात विकत घ्यावयाची झाल्यास ग्राहकांना मोठी किंमत मोजावी लागते.