आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान क्षेत्राचा अभ्यास करून त्यांना संशोधनपर प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणा-या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत देण्यात येणा-या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून प्रवेशिका मागवण्यात येत आहेत -
अधिक माहिती व तपशील : वृत्तपत्रात प्रकाशित किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेची जाहिरात पाहावी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरूच्या दूरध्वनी क्र. 080-22932975 वर संपर्क साधावा. http://www.kvpy.org.inयास भेट द्यावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील भरलेले व आवश्यक तो तपशील कागदपत्र असणारे अर्ज दि कन्व्हेनर, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू 560012 या पत्त्यावर 28 ऑगस्ट पर्यंत पाठवावेत.
शैक्षणिक साप्ताहिकी
०20 ऑगस्ट : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, मुंबई येथील मायक्रोबायोलॉजी विषयातील सीनियर रिसर्च फेलोशिपसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख संपर्क - डेप्युटी डायरेक्टर (अ‍ॅडमिन अ‍ॅँड अकाउंटस), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, ई-2, एमआयडीसी एरिया, अंधेरी (पूर्व), मुंबई- 400093. दूरध्वनी 022-28219803. संकेतस्थळ : www.iip-in.com
०22 ऑगस्ट : नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, मानेसर येथील संशोधनपर फेलोशिपसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख. संपर्क : अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, नॅशनल हाय-वे 8, नैनवालमोड, मानेसर (हरियाणा) 922051. दूरध्वनी 0124-2845200.. संकेतस्थळ : http://www.drdo.gov.in.
०25 ऑगस्ट : ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनतर्फे देशांतर्गत विविध व्यवस्थापन शिक्षण संस्थांमध्ये व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणा-या ‘कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट’ (सीएमएटी ; 2015-16) या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख. संपर्क - ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, 7 वा मजला, चंद्रलोक बिल्डिंग, जनपथ, नवी दिल्ली-110001. दूरध्वनी : 011-23724151. संकेतस्थळ : http://www.drdo.gov.in.
०26 ऑगस्ट : संरक्षण मंत्रालयांतर्गत असणा-या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओलॉजी अ‍ॅँड अलाइड सायन्सेस, दिल्ली येथील संशोधनपर पीएचडीसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख. संपर्क : डायरेक्टर, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओलॉजी अ‍ॅँड अलाइड सायन्सेस, डीआरडीओ, लखनऊ रोड, तिमारपूर, दिल्ली - 110054. दूरध्वनी 011-23883111. संकेतस्थळ : http://www.drdo.gov.in.
०28 ऑगस्ट : केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक व संशोधनप्रवृत्तीला चालना देण्यासाठी देण्यात येणा-या ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना’ अंतर्गत विविध स्तरांवरील संशोधनपर शिष्यवृत्तींसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख. संपर्क - दि कन्व्हेनर, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू 560012. दूरध्वनी 080-22932975. संकेतस्थळ : http://www.kvpy.org.in