आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटासिड गोळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाची निर्मिती होत असते. प्रथिनांचे पचन होण्यासाठी या आम्लाचे कार्य महत्त्वाचे असते. तंबाखू-सिगारेट-मद्यपान यांचे व्यसन, जागरणे, ताणतणाव आदी कारणांमुळे काही व्यक्तींमध्ये या आम्लाची निर्मिती वाढते. या लोकांना अ‍ॅसिडिटी किंवा आम्लपित्ताचा त्रास होतो. आम्लपित्ताचा त्रास कमी करण्यासाठी अँटासिड गोळी वापरली जाते. या गोळीत अ‍ॅल्युमिनियम हायड्रॉक्साइड व मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड ही दोन औषधे असतात. या औषधामुळे जठरातील आम्लता कमी होते. ही गोळी 500 मिग्रॅची असून त्रास होत असताना चघळून ती खायची असते. दिवसभरात 4 ते 8 गोळ्या प्रौढ व्यक्ती घेऊ शकते. लहान मुलांना सहसा गरज पडत नाही. गोळीचे गंभीर असे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. आम्लाची उपयुक्त क्रियाही या औषधाने नष्ट होत असल्याने अन्नपचनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.


आम्लपित्त या आजारासाठी गोळ्यांपेक्षा जीवन जगण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणणे जास्त महत्त्वाचे आहे, हे विसरून चालणार नाही. जेवणाच्या नियमित वेळा, जागरण टाळणे, व्यसने टाळणे, नियमित व्यायाम या सर्वांचा अंगीकार केल्यास आपल्याला अँटासिड गोळीची गरज पडणार नाही.