आयपॅड-3 स्पर्धेत मागे / आयपॅड-3 स्पर्धेत मागे

प्रतिनिधी

May 19,2012 08:32:02 AM IST

अँपलचा आयपॅड-3 बाजारात आला आहे. जगभरातील तंत्र क्षेत्रातील लोकांकडून आयपॅड 3 बाबत संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. वास्तविक पाहता यात विशेष असे काहीच नाही, ज्याची मागणी अँपलच्या चाहत्याकडून होत होती. यात अशा काही गोष्टी आहेत, ज्या इतर आयपॅडच्या तुलनेत चांगल्या आहेत.
हफिंग्टन पोस्ट डॉट कॉमचे जेसन गिलबर्टच्या मते, अँपलने सर्वात मोठी कमाल या गोष्टीची केली आहे की, ती आहे स्क्रीनबाबतीत! अँपलने रेटिना डिस्प्लेचा वापर करून याचा दर्जा अनेक पटीने वाढवला आहे. याचे रेझ्युलेशन 2048 + 1536 पिक्सल इतके आहे. याच प्रकारचे रिझोल्युशन आयफोन 4 आणि 4 एसमध्ये आहे; पण याची स्क्रीनची साइज पूर्वीप्रमाणेच 9.7 इंच ठेवण्यात आली आहे.
यात नवीन प्रोसेसर, जास्त स्क्रीन रिझाल्युलेशन याशिवाय अँपलने यात प्रथमच RA5X S नावाची चीप लावली आहे. ही पहिल्या आयपॅडमध्ये लावण्यात आलेल्या चीपच्या दुपटीने काम करते. कंपनीने याच्या मेमरीमध्ये काहीही बदल केलेला नाही. आयपॅड-2 प्रमाणेच हासुद्धा 16.32 आणि 64 जीबी मेमरीसह बाजारात मिळेल. तत्पूर्वीच असा अंदाज लावण्यात येत आहे की, कंपनी आयपॅड 3 ला 128 जीबी मेमरीसह बाजारात आणू शकते.
फोन एरिना डॉट कॉमचे डॅनियलनुसार याची टेक्स्ट आणि इमेज आयपॅड 2 च्या तुलनेत चारपट जास्तीचे पिक्सल्स आहेत. डिस्प्लेसुद्धा 40 टक्के जास्त चांगला आहे.
टेक डायजेस्टचे गेराल्ड लिंकनुसार यात अँप्लिकेशन्स तितक्या गतीने लोड होऊ शकत नाहीत, जितक्या गतीने आयपॅड 2 मध्ये होतात. यामुळे नवा आयपॅड हँग होऊ शकतो तरीही चित्राचा दर्जा आयपॅड 2 पेक्षा जास्त चांगला आहे. कंपनीने यात सिरी सॉफ्टवेअर टाकलेले नाही. पण याच्याशीच साधम्र्य असलेले व्हाइस डिक्टेशन अँप्लिकेशन्स टाकण्यात आले आहे.

X
COMMENT