आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अर्थ’पूर्ण करिअर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिम्बायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, पुणे येथे उपलब्ध असणाºया एमएस्सी-अर्थशास्त्र या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहेत

अभ्यासक्रमाचा कालावधी : या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे असून त्यामध्ये प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यापार व विकासविषयक विषयांचा समावेश आहे. याशिवाय अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना औद्योगिक अर्थशास्त्र विषयातील संशोधनपर सराव, आर्थिक विषयातील संशोधनपर काम व त्याला पूरक उमेदवारी, अभ्यासक्रमाशी निगडित विषयांवर विशेष मार्गदर्शनसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता : अर्जदार सर्वसामान्य गटातील असल्यास त्यांनी अर्थशास्त्र, गणित, सांख्यिकी, भौतिकशास्त्र वा अभियांत्रिकी विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक उल्लेख चांगला असायला हवा.

विशेष सूचना : वरील गुणांच्या टक्केवारीची अट राखीव गटातील अनुसूचित जाती-जमातींच्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5%नी शिथिलक्षम आहे. याशिवाय जे विद्यार्थी यंदा वर नमूद पात्रता परीक्षेला बसले असतील त्यांना वरीलप्रमाणे टक्केवारी मिळाल्यास तेसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्र्थ्यांना त्यांच्या 8 जुलै 2013 रोजी समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे प्रवेश देण्यात येईल.

अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी सिम्बायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या दूरध्वनी क्र. 020-25672520 वर संपर्क साधावा अथवा स्कूलच्या www.sse.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज सिम्बायोसिस स्कूल ऑफ एकॉनॉमिक्स, 3 रा मजला, एससीएचसी बिल्डिंग, सेनापती बापट मार्ग, पुणे 411004 या पत्त्यावर 14 जून 2013 पर्यंत पाठवावेत.