सीएनजी किट सर्वात / सीएनजी किट सर्वात ‘हिट’ !

दिव्य मराठी नेटवर्क

May 19,2012 08:34:33 AM IST

सध्या अनेक भारतीय कंपन्या सीएनजी किटच्या बाजारात उतरल्या आहेत; पण यातील बहुतांश किट एआरएआयकडून स्वीकृत झालेल्या नाहीत. त्यामुळे या किट्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याचबरोबर चीन, कोरियाकडून किट्स मागवण्यात येत आहेत.
एस. के. इको फ्यूएल सिस्टिमचे अनिल यादव यांनी सांगितले, बाजारात अनेक प्रकारच्या किट्स मिळतात. उदा. स्थानिक कंपन्या, चायनीज, इटालियन तसेच अज्रेंटिनाच्या किट्स उपलब्ध आहेत. यात अज्रेंटिना आणि इटलीतील कंपन्यांच्या किट्सला चांगली मागणी आहे.
या सर्वात इटलीच्या किट्सना सर्वाधिक मागणी राहते. कारण याची गुणवत्ता सगळ्यात चांगली आहे. दिल्लीत सीएनजी फिटमेंट सेंटर चालवणारे इको गॅसचे सेल्स विभागाचे विनोद शर्मा यांनी सांगितले की, याची गुणवत्ता चांगली आहे. त्याशिवाय अज्रेंटिनाच्या किट्सला मागणी असते. कारण याचा वापरही सुरक्षित व चांगला आहे; पण जे एआरएआयकडून स्वीकृत झालेल्या नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी याकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे. त्यांनी अशाच किट्स वापराव्यात, ज्या स्वीकृत असतील आणि कसोटीवर खर्‍या उतरतील.
तीन प्रकारच्या किट्स बाजारात उपलब्ध
सध्या तरी सीएनजी बाजारात तीन प्रकारच्या किट्स उपलब्ध आहेत. या किट्समध्ये ओपन लूप, क्लोज लूप आणि सिक्वेन्शियल किट यांचा समावेश आहे. ओपन लूप सिस्टिम सर्वात साधारण सिस्टिम आहे, ज्यात कमी सुटे भाग लागतात. यामध्ये सीएनजी गॅस सोडण्यावर कसलेही नियंत्रण नसते. एका ठरावीक स्पीडवर चालते. त्यामुळे ही सिस्टिम आता कमी प्रचलित आहे.
क्लोज्ड लूप सिस्टिम सर्वात जास्त चालते. कारण यात गॅस प्रमाणात वाहून नेण्यासाठी लॅमडा कंट्रोलरचा वापर केला जातो आहे.
हा कंट्रोलर स्वत: गॅसच्या फ्लोवर नियंत्रण ठेवतो. जास्तच बदल होत असतील तर रीडिंग ईसीयूला सांगण्यात येते. क्लोज्ड लूप सिस्टिममध्ये इंजिन 4 हजार आरपीएमपर्यंत सीएनजीवर चालते. यापेक्षा जास्त रीडिंग असेल तर स्वत:च पेट्रोल मोडवर चालतो. त्याने इंजिनला अतिरिक्त क्षमता मिळते. त्यामुळे ही सिस्टिम जास्त वापरली जाते.
यानंतर तिसरी सिस्टिम येते, सिक्वेन्शियल सिस्टिम. दशमेश इंपेक्स प्रा. लि. चे संचालक अमरजित मलहोत्रा यांनी सांगितले की, ही जवळपास क्लोज्ड लूप सिस्टिमसारखीच आहे; पण यात ईसीयू असतो आणि गॅसच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवतो. याचे सगळ्यात चांगले वैशिष्ट्य म्हणजे यात वेगळ्या प्रकारचा इजेक्टरवाले इंजेक्शन रेल सिस्टिम आहे, जे हवा आणि सीएनजी गॅसचे योग्य मिर्शण करते. सिक्वेन्शियल सिस्टिम सर्वात आधुनिक पण महाग आहे. याची रिप्लेसमेंट कॉस्टही सगळ्यात जास्त आहे. कारण अधिकांश डीलर किंवा फिटमेंट सेंटर याची सर्व्हिस करत नाहीत.
क्लोज्ड लूप सिस्टिम असलेल्या किट्स बाजारात सगळ्यात जास्त विकल्या जातात; पण यामध्ये कारचे पिकअप कमी असते. सिक्वेन्शियल किट सर्वात चांगली असते. सध्या किंमत भारतात सगळ्यात जास्त आहे. मलहोत्रा यांनी सांगितले, युरो 4 प्रमाणित कारमध्येच या किटचा वापर केला जातो. ही किट सर्वसाधारणपणे 50 ते 60 हजारांच्या आसपास आहे. याशिवाय बाजारात काही चायनीज कंपन्यांच्या किट्स उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत 35 ते 40 हजार रुपये इतकी आहे; पण एआरएआयकडून त्या प्रमाणित नाहीत. म्हणून अशा किट्स लावणे अविश्वसनीय ठरते.

X
COMMENT