आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Dharmendra Pratap Sinh About Vidya Balan

विद्या बालन : परिणीताची कहानी ( आठवण )

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘परिणीता’पासून ‘कहानी’ चित्रपटापर्यंत यशस्वी करिअर करणारी विद्या बालन हिचा अभिनयप्रवास तसा फारसा सोपा नव्हता. यशाचा चढता आलेख टिकवणे आजही विद्यासाठी आव्हानच आहे.
टीव्हीवर पदार्पणाची संधी अजमावत एकता कपूरच्या ‘हम पांच’ या मालिकेतील टीनएजर राधिका साकारणार्‍या विद्या बालनला दीर्घकाळच्या संघर्षानंतर ‘परिणीता’ चित्रपटातून ब्रेक मिळाला. त्याआधी दक्षिणेत चित्रपटांमध्ये ब्रेक मिळवण्याचा तिने कैकदा अयशस्वी प्रयत्न केला होता. पण ‘परिणीता’च्या यशामुळे तिने या सगळ्या अपयशावर मात करीत स्टारडम प्राप्त केले.
यशस्वी चित्रपटांमधील सातत्य राखत असताना तिचे काही चित्रपट फ्लॉपही झालेत. पण 2009मधील ‘पा’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका करून तिने सशक्त अभिनेत्रीचा मान मिळवला. तिने ‘पा’मध्ये आईची भूमिकाही तितकीच ग्लॅमरस शैलीत साकारली. विद्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा तिने आपण आधी तीन चित्रपटांकरिता भेटलो असल्याचे मला अगदी मोकळेपणाने सांगितले होते.
विद्याचा हा चित्रपटक्षेत्रातला संघर्ष मोठा रोचक आहे. आमची पहिली भेट एका मॉलमध्ये झाली होती. विद्या त्या वेळी ‘भूलभुलैया’ चित्रपटाचे प्रमोशन करत होती. त्या काळात विद्या आपल्या कपड्यांच्या सेन्समुळे विनोदाचा भाग बनली होती. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये विद्या एक सर्वसाधारण मुलगी दिसत होती. मॉलमध्ये बाल्कनीतून तिने चाहत्यांना हाय हॅलो केले, पण प्रसारमाध्यमांच्या मात्र नजरा चुकवण्याचा प्रयत्न ती करायला लागली. तिच्यामध्ये आत्मविश्वास नव्हता. त्यानंतर आम्ही गोरेगावच्या स्टुडिओत भेटलो. त्या वेळी ती ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत होती. तेव्हा तिचा आत्मविश्वास पाहून मी चकित झालो. हीच विद्या पुढे ‘कहानी’ चित्रपटाकरिता खार रोड स्टेशनवर तितक्याच अभिनिवेशाने, आत्मविश्वासाने भर गर्दीत पोहोचली होती. तिला ‘इश्किया’, ‘नो वन किल्ड जेसिका’ चित्रपटांमुळेदेखील प्रगल्भ अभिनेत्रीचा दर्जा मिळाला होता.
मुलाखत देता देता विद्याने भूक लागली असून ती सहन होत नसल्याचे सांगत डबा मागवून मलादेखील विचारत खायला सुरुवात केली. नाकारले जाण्यापासून सतत मागणीत येण्यापर्यंत व नायिका असून एकहाती चित्रपट तोलण्यापर्यंतच्या तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांचा मी साक्षीदार आहे. आम्ही ‘कहानी’च्या निमित्ताने भेटलो. आता या चित्रपटाचा हॉलीवूडमध्ये रिमेकही बनणार आहे. पण आता लग्नानंतर विद्याला हिट चित्रपटाची खूप गरज आहे. भूतकाळातील कमाईवर भविष्य सुरक्षित ठेवता येणार नाही, याची तिला जाणीव आहे. त्यामुळे सध्या ती धडपड करते आहे, पुन:पुन्हा स्वत:ला सिद्ध करण्यासाठी. तरीदेखील ती समाधानी आहे, कारण आता तिला कुणी ‘अपशकुनी’ मानत नाही. तिसरी मुलाखत झाल्यानंतर विद्या दैनिक भास्करच्या मुंबई कार्यालयात ‘कहानी’च्याच प्रमोशनकरिता आली होती. मला पाहताच लक्षात ठेवून विद्याने माझी आवर्जून विचारपूस केली. विद्या आज इतक्या उंचीवर आहे, पण तिचे हे असे माणसांना लक्षात ठेवणे नेहमीच तिच्या नम्र स्वभावाचे उदाहरण म्हणून माझ्या लक्षात राहिले आहे.

dpsingh@dainikbhaskargroup.com