आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा परीक्षा: फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, डेहराडून येथील संधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, डेहराडून येथे रिसर्च असिस्टंट- जनरल म्हणून खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत
जागांची संख्या व तपशील : एकूण उपलब्ध जागांची संख्या 10 असून त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी विज्ञान विषयातील पदव्युत्तर पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संशोधनपर कामाची आवड असायला हवी. संगणकाचे अद्ययावत ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 27 वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.

निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून 200 रु. चा अकाउंट्स ऑफिसर, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या नावे असणारा व डेहराडून येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.

अर्ज व तपशील : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 25 ते 31 मे 2013 च्या अंकात प्रकाशित झालेली फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, डेहराडूनची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिट्यूटच्या http://fri.icfre.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज सेक्शन ऑफिसर (एम्लॅब्लिशमेंट), फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, पोस्ट ऑफिस - न्यू फॉरेस्ट, डेहराडून 248006 (उत्तराखंड) यावर 21 मे 2013 पर्यंत पोहोचावेत.

वेतनश्रेणी व फायदे
निवड झालेल्या उमेदवारांना फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, डेहराडून येथे रिसर्च असिस्टंट - जनरल म्हणून दरमहा 5200 - 20200 + 2800 या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल.