आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटनेस : वेळेवर खा! (लीना मोगरे)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठ‌ड्यात आपण ‘ब्रिस्क वॉकिंग’ची आेळख करून घेतली. या आठ‌ड्यात ‘वेट ट्रेनिंग’आिण संतुलित आहारबद्दल थोडंसं जाणून घेऊया. ‘वेट ट्रेनिंग’ म्हटले की आपल्याला धडकीच भरते. वेट ट्रेनिंगमुळे स्त्रियांचे शरीर व्यायाम करणाऱ्या पुरुषांप्रमाणे बलदंड दिसेल, या भीतीमुळे या प्रकाराकडे महिला पटकन वळत नाहीत; परंतु यामध्ये काहीही तथ्य नाही. वेट ट्रेनिंगमुळे खांदे, कंबर आिण इतर स्नायू बळकट होतात आिण शरीर सुडौल होण्यास मदत होते.

व्यायाम आिण संतुलित आहार यांचा योग्य मेळ असल्यास चांगला परिणाम दिसून येतो. संतुलित आहार म्हणजे, काय? शहरी, ग्रामीण, कष्टकरी, खेळाडू, बैठे काम करणाऱ्या स्त्रिया, तसेच प्रांत, हवामान, कुटुंबाची खाद्यसंस्कृती, वय आिण शारीरिक जडणघडण आदी बाबींवर आहार ठरवायचा असतो. सकाळी लवकर उठल्यानंतर इतर काहीही खाण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे. त्यामुळे पोटाच्या सामान्य तक्रारी कमी होतात. यानंतर तासाभराने न्याहारी करावी. यामध्ये पोहे/इडली/उपमा यांसारखे पदार्थ खावेत. यानंतर अकराच्या सुमारास केळी/सफरचंद/चिकू/पेरू खाण्यास हरकत नाही. फळांचा रस पिण्यापेक्षा फळ खाणे योग्य. दुपारी दोन वाजता जेवणात पोळी, भाजी किंवा भाकरी, थोडासा भात, वरण, मोड आलेले धान्य, ग्रीन सॅलड, एखादे अंडे किंवा मासे, उकडलेले चिकन असावे. तळलेले पदार्थ टाळावेत. संध्याकाळी चहासोबत डायजेस्टिव्ह बिस्किटे, खाखरा खाण्यास हरकत नाही. रात्री आठ वाजेपर्यंत हलके जेवण घ्यावे, यामध्ये पोळी, भाजी वा भाकरी, हिरवी पालेभाजी आणि सॅलड असावे. झोपण्याची वेळ आणि जेवणामध्ये साधारण चार तासांचे अंतर असावे.
वजन कमी करण्यासाठी वा फिटनेस वाढवण्यासाठी कमी खावे, असा समज आहे, जो चुकीचा आहे. वेळापत्रकाप्रमाणे व योग्य तोच आहार घ्यावा. भारतीय जेवणामध्ये आरोग्यास योग्य आणि चविष्ट पदार्थ बरेच अाहेत. उदा. नाचणीचे सत्त्व, भाकरी, मक्याचे पदार्थ, ताक, काकडी, मुळा, गाजर, बीट यांची कोशिंबीर, भाजणीचे थालीपीठ, खाखरा या पदार्थांना चव आणि प्रोटिन्स दोन्ही आहेत, त्यामुळे भारतीय कुटुंबामध्ये सहज उपलब्ध वस्तूंपासून आरोग्यदायी पदार्थ बनवता येतात.
म्हणून ईट हेल्दी. बी हेल्दी.
mkspostbox@gmail.com
बातम्या आणखी आहेत...