आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of I Have A Dream In Rasik By Shashikant Savant

आय हॅव अ ड्रिम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये लिंकन मेमोरियल येथे 28 ऑगस्ट 1963 रोजी झालेल्या भाषणाला आता पन्नास वर्षे पूर्ण झाली. काळ्या लोकांच्या लाखोंच्या मेळाव्यात मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) या त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नेत्याने केलेले भाषण हे जगभरातील सर्वोकृष्ट भाषणांपैकी एक मानले जाते. इतके की राजीव गांधी यांनी जेव्हा पंतप्रधान होऊन सूत्रे हातात घेतली, तेव्हा त्यांनीही किंग यांच्या भाषणातील आयते वाक्य वापरले किंवा वाक्याचा तुकडा वापरला. तेही म्हणाले, ‘आय हॅव अ ड्रीम.’ जगभरातील गाजलेल्या भाषणांमध्ये अब्राहम लिंकन यांच्या गटेनबर्ग येथे केलेल्या भाषणांपासून नेहरूंच्या ‘नियतीशी करार’ या सत्तांतराच्या वेळच्या भाषणापर्यंत अनेक भाषणे आहेत. अर्थातच चर्चिल यांचे ‘मला फक्त रक्त, अश्रू आणि घाम हवेत’ हे सांगणारे भाषण कोण विसरेल? ‘गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल फॉर द पीपल’ या लिंकनच्या गटेनबर्गच्या भाषणाने जर जगाला लोकशाहीची व्याख्या दिली असेल, तर चर्चिलच्या भाषणाने लाखो तरुणांना घरदार मागे टाकून दुसºया महायुद्धात लढायला बळ दिले. ब्रिटिशांकडून सूत्रे घेताना आपल्यासमोरचे आव्हान सांगताना नेहरू यांनी नियतीशी झालेला करार अधोरेखित केला. पण या साºयापेक्षा मार्टिन ल्यूथर किंग यांच्या भाषणात काहीतरी वेगळे होते. शतकानुशतके काळ्यांवर होणारा अन्याय झुगारून टाकण्यासाठी मार्टिन आणि त्यांचे अनुयायी जमले होते. इतकेच नाही, तर अमेरिकेतील राजकीय, सांस्कृतिक जगतातील मंडळीही तिथे होती. अमेरिकन यादवी युद्धात अब्राहम लिंकन यांच्या कुशल नेतृत्वाने काळ्यांची गुलामगिरी संपली, पण तरीही काळ्यांना हिणवणे, कमी लेखणे, त्यांना गुन्हेगार जमातीचे समजणे, हे कायमच होते. त्याच भाषणात मार्टिन ल्यूथर किंग म्हणाले, माझ्यासारखाच तुम्हालाही हा अनुभव आला असेल. काळा माणूस दुकानात जाऊन खरेदी करू लागला की सुरक्षा रक्षक त्याच्याकडे पाहू लागतात. काळा माणूस रस्त्यावर दिसू लागला तर गाड्यांचे दरवाजे पटकन बंद होतात. खरे तर मार्टिन ल्यूथर किंगने भाषण लिहून आणले, पण लिखित भाषण बाजूला ठेवून तो उर्त्स्फूतपणे बोलायला लागला. मार्टिनची भाषणे क्लेरेन जोन्स हा लेखक लिहीत असे. 36 राज्यांत आणि 200 शहरांमध्ये काळ्यांचा उठाव चालू होता. त्यामुळे किंग यांनी चळवळीला राजकीय दिशा द्यावी आणि नैतिक अधिष्ठान प्रबळ करावे, हे दोन हेतू ठेवून त्यांनी भाषण लिहिले होते. काळ्यांवर होणाºया अन्यायाविरुद्ध उत्स्फूर्तपणे बोलत असतानाच त्यांचे सहकारी महालिया जॅक्सन यांनी सूचित केले, ‘टेल देम अबाऊट द ड्रीम’ आणि एक ऐतिहासिक भाषण जगापुढे आले. या भाषणाअगोदर अमेरिकेत काळ्यांच्या हिंसेचा आगडोंब उसळला होता. अध्यक्ष जॉन्सन यांनी राजीनामा देतानाच्या भाषणात म्हटले, ‘अमेरिकन निग्रो आपले आयुष्य संपूर्णपणे जगू पाहतात. त्यांचा लढा हा आपलाही लढा आहे आणि केवळ तेच नव्हे, तर आपण साºयांनीच अन्याय आणि दुजाभाव संपवला पाहिजे. आपण तो संपवू.’ या भाषणाने किंग यांच्या डोळ्यात पाणी आले. नंतर आलेल्या अध्यक्ष केनेडींनी या अफाट मेळाव्याचे दृश्य टीव्हीवर पाहिले. नंतर जेव्हा किंग व्हाइट हाउसमध्ये केनेडींना भेटायला आले, तेव्हा केनेडींचे पहिले वाक्य होते- ‘आय हॅव अ ड्रीम.’ त्यानंतर बराच फरक पडला. निग्रोसारखा शब्द आता कृष्णवर्णीयांसाठी वापरला जात नाही. त्यांना आफ्रिकन अमेरिकन म्हणण्यात येऊ लागले. नोकºयांमध्ये, व्यवसायांमध्ये साशंकपणे न पाहता बरोबरीची वागणूक देण्यात येऊ लागली. गेल्या पन्नास वर्षांत कृष्णवर्णीयांची लोकसंख्या तीन टक्क्यांनी वाढली आहे. शिक्षणातील गळतीचे प्रमाण 29 टक्क्यांवरून अवघ्या 7 टक्क्यांवर आले आहे. जवळजवळ गोºयांइतकेच. 1960च्या सुमारास केवळ 4% आफ्रिकन अमेरिकन पदवीधर होते, आता 21% आहेत. गुन्हेगारीतील त्यांचा वाटा कमी झाला आहे. 60च्या दशकात 41% आफ्रिकन अमेरिकन दारिद्र्यरेषेखाली होते, आता त्यांचे प्रमाण 7 आहे. उद्योगामध्ये जवळजवळ 7% मंडळी आहेत. म्हणजेच, 1960च्या दशकाच्या तिप्पट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बराक ओबामा एक आफ्रिकन अमेरिकन माणूस आता अमेरिकेचा राष्‍ट्राध्यक्ष आहे!

shashibooks@gmail.com