Home | Magazine | Kimaya | article of i phone-5,

अशा सुविधांवर विश्वासच बसणार नाही!

दिव्य मराठी नेटवर्क | Update - May 19, 2012, 08:38 AM IST

आयफोन 5 च्या सुविधा आणि त्यांचे फोटो दोन्ही सादर होण्यापूर्वीच बाहेर फुटले आहेत.

 • article of i phone-5,

  आयफोन 5 च्या सुविधा आणि त्यांचे फोटो दोन्ही सादर होण्यापूर्वीच बाहेर फुटले आहेत. लिक्वडमेटल टेक्नॉलॉजी असलेल्या या स्मार्टफोनची निर्मिती अनेक धातूच्या साह्याने करण्यात येत आहे. अँपलच्या आयफोन 5 साठी सुट्या भागांचा पुरवठा करणारी कंपनी एसडब्ल्यू ब्राक्सने याची काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत.
  थ्रीडी ऑब्जेक्ट अशी ओळख
  आयफोन 5 मध्ये अँपलने 3 डी फेस आणि ऑब्जेक्ट अशी ओळख असलेल्या तंत्राचा वापर केला आहे. 10 मे रोजी याच्या पेटंटसाठी कंपनीने अमेरिकेत अर्ज सादर केला आहे. या सुविधेमुळे आयफोनद्वारा घेतलेला फोटो तीन वेगवेगळ्या बाजूने पाहता येईल.
  थ्री डी फोटोग्राफी
  थ्री डी कॅमेरा आणि व्हिडिओ रेकॉर्डर असलेल्या आयफोन 5 मध्ये अँपल सोल्युशनचा वापर केलेला आहे. यात अनेक सेन्सरच्या साह्याने कॅमेरा थ्री डी फोटो घेण्यात येतील. एक सेन्सर पोलारयजिंग इमेज घेईल, तर इतर दोन सेन्सर नॉन पोलाराजिंग इमेज घेण्याचे काम करेल.
  अँपलचे रूप
  अँपल वापरणार्‍यांना आयट्यून स्टोअरमधून आता चित्रपट, अँप्लिकेशन आणि अन्य कंटेंट खरेदी करण्यासाठी अँपल आयडीची गरज पडते, पण आयफोन 5 साठी आयडीची गरज लागणार नाही. या नव्या फोनला अँपल अवतार नावाचे एक अँप्लिकेशन देण्यात येणार आहे. कंपनीने याचे पेटंट करण्यासाठी अर्ज केलेला आहे. युर्जस या सुविधा जरुरीनुसार वापरू शकणार आहेत. यानंतर आपोआप अनेक नव्या गोष्टी सुरक्षित राहतील.
  आधुनिक हेपटिक्स
  आयफोन 5 मध्ये एक नवी फीडबॅक सिस्टिम देण्यात आली आहे. यात थ्री डी बटनाच्या साह्याने फक्त स्पर्शाने बोलताही येते. केवळ बोलूनही मोबाइलला आपल्या र्मजीनुसार चालवता येईल या सुविधांचा वापर आयटीव्ही, आयपॅड आणि आयफोनवर बाहेरून दाखवताही येते.
  द आयवॉलट
  अँपलने आयव्ॉलट तंत्राचा वापर 6 मार्च रोजी प्राधान्याने आयफोन 5 च्या पेटंटसाठी केला आहे. याच्या साह्याने युर्जस आपल्या बँकेच्या खात्यावर क्रेडिट कार्डासारखा वापरही करेल. तसेच आपले क्रेडिट कार्ड प्रोफाइल, स्टेटमेंट्स, बँकेसंबंधी अन्य काही माहिती, सर्वकाही एकाच ठिकाणी पाहू शकता.

Trending