Home | Magazine | Akshara | article of natasha jadhaw on book in akshara

मी तिरस्कार करणार नाही’

नताशा जाधव | Update - Dec 30, 2016, 03:00 AM IST

ईझेलादिन अबुइलेश हे एक पॅलेस्टिनी डॉक्टर आहेत. त्यांचे बालपण गाझापट्टीतील जबलिया निर्वासित छावणीत गेले.

  • article of natasha jadhaw on book in akshara
    ईझेलादिन अबुइलेश हे एक पॅलेस्टिनी डॉक्टर आहेत. त्यांचे बालपण गाझापट्टीतील जबलिया निर्वासित छावणीत गेले. जिथे जन्मदेखील झाला ते स्त्रीरोगतज्ज्ञ होते. शिवाय ‘वंध्यत्वावर उपाय’ या शास्त्रावर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे ते गाजत राहत होते परंतु कमला ते इस्रायलच्या हॉस्पिटलला जात असत. तिथे त्यांचे बहुतांश आयुष्य गेले. हॉर्वर्डमध्ये त्यांनी ‘सार्वजनिक आरोग्य’ या विषयात प्रशिक्षण घेऊन प्रावीण्य मिळवले. या विषयावरील त्यांची मते आणि त्यांचे संशोधन जगभरात प्रमाण मानले जाते. टोरोंटो विश्वविद्यालयातील डल्ला लाना प्रशालेत ते सहप्राध्यापक आहेत. ही प्रशाला सार्वजनिक आरोग्य या विषयाचे प्रशिक्षण देते.

    गाझापट्टीला डॉक्टर आपली मायभूमी मानतात. संबंध मध्य पूर्वेत त्यांनी सुचवलेला औषधोपचार प्रमाण मानला जातो. त्यांनी मायभूमी मानत असलेल्या प्रदेशाला जग मात्र जगातील सर्वात मोठी छळछावणी मानते. या भागात पंधरा लाख पॅलेस्टिनी हे तीनशे साठ चौरस किलोमीटर येवढ्या जमिनीवर दाटीवाटीने राहत होते त्यामुळे अशा भागाची प्रगति होऊ शकेल असे मत या पुस्तकात मांडले. डॉक्टर या नात्याने ते सीमेच्या दोन्ही बाजूकडील रोग्यांना औषधोपचार तसेच वयात येणाऱ्या मुलींना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांचा अनुभव यात माडले आहेत. त्याचप्रमाणे मुलींना स्त्रियांना उत्तम शिक्षण मिळावे याचे महत्त्व आणि गरज या गोष्टी त्यांनी तेथील लोकांना पटवून दिले आणि शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. १६ जानेवरी २००९ मध्ये इस्रायल बॉम्बहल्ल्यात ईझेलादिन यांच्या मुली आणि पुतणी मारल्या गेल्यामुळे त्यांनी हे कार्य जोमाणी अंगीकारले त्यांच्या वर झालेल्या या आघातला त्यांनी जो प्रतिसाद दिला त्याचे वर्णन केले. त्यामुळे त्यांचे कार्य जगातील सर्व लोकांच्या अंतकरणात ठसले गेले. विशेषता इस्रायलमध्ये याचा परिणाम जास्त प्रकर्षाने दिसून आला याबद्दलचे माहिती दिली आहे.
    शब्दांकन : नताशा जाधव
    प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस लेखक : डाॅ. इझेलदिन अबुइलेश किंमत : २५० रुपये

Trending