आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Scholarship Examination Green Carrier

शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा:ग्रीन करिअर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था, पुणे येथील अभ्यासक्रम
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था, पुणेतर्फे पुणे आणि गांधीनगर येथे घेण्यात येणार्‍या व्यवस्थापन आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणार्‍या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
० आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. अनुसूचित जाती-जमातींच्या उमेदवारांसाठी गुणांच्या टक्केवारीची अट 5% नी शिथिलक्षम आहे. याशिवाय अर्जदारांनी सीएटी, एमएटी, एक्सएटी, एटीएमए, सीएमएटी यासारखी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
० निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व वर नमूद केलेल्या प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे पुणे वा नागपूर येथे समूह चर्चा व त्यानंतर मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची वर नमूद केलेल्या निवासी स्वरूपाच्या अभ्यासक्रमासाठी अंतिम निवड करण्यात येईल.
० अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास 1500 रु.चा दि डायरेक्टर, व्हीएएमएनआयसीओएम, पुणे यांच्या नावे असणारा व पुणे येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
० अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी वैकुंठ मेहता राष्ट्रीय प्रबंध संस्थान, पुणेच्या दूरध्वनी क्र. 020-25701 वर संपर्क साधावा अथवा संस्थेच्या www.vamnicom.gov.inया संकेतस्थळाला भेट द्यावी.

० अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज संचालक, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान, विद्यापीठ मार्ग, गणेशखिंड, पुणे-411007 या पत्त्यावर 28 फेब्रुवारी 2014 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
ज्या पदवीधरांना सहकारासह कृषी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासह आपले करिअर करायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा.

‘निकमार’ पुणेचे विविध अभ्यासक्रम
‘निकमार’ म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अँड रिसर्च - पुणेतर्फे खालीलप्रमाणे
विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यामध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत -
दोन वर्षांचा अ‍ॅडव्हान्स्ड, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम - पुणे, हैदराबाद, गोवा व इंदूर येथे.
दोन वर्षांचा प्रोजेक्ट इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम - पुणे येथे.
दोन वर्षांचा रियल इस्टेट आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम - पुणे येथे.
दोन वर्षांचा इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स, डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम - पुणे येथे.

एक वर्षाचा क्वांटिटी सर्व्हेइंगमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
एक वर्षाचा हेल्थ, सेफ्टी अँड एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
० आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर वा प्लॅनिंग विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते वरील पदवी पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले असावेत.
० निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत केंद्रांवर घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व पुणे या केंद्रांचा समावेश असेल.
० अर्जदारांची पदवी : पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षातील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल.
० अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास 1500 रु.चा ‘एनआयसीएएआर’ - पुणे यांच्या नावाने असणारा व पुणे येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
० अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी निकमारच्या दूरध्वनी क्र. 020-26290311 वर संपर्क साधावा अथवा संस्थेच्या www.nicmar.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
० अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील व संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अँड रिसर्च (निकमार), 25/1, बालेवाडी, एनआयए पोस्ट ऑफिस, पुणे 411045 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2013.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे अभ्यासक्रम
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, हैदराबाद येथे उपलब्ध असणार्‍या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
० उपलब्ध अभ्यासक्रमांचा तपशील : संस्थेमध्ये उपलब्ध असणार्‍या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

स्थायी ग्रामीण विकासविषयक पदविका अभ्यासक्रम नियामित अभ्यासक्रम.
वनवासी विकास व्यवस्थापनविषयक पदविका अभ्यासक्रम- दूरस्थ शिक्षण पद्धतीचा अभ्यासक्रम.

० आवश्यक शैक्षणिक पात्रता : वरील दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते पदवी परीक्षेला बसलेले असावेत.
० निवड पद्धती : अर्जदारांचा शैक्षणिक आलेख व पदवी परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल. अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश प्रक्रिया वर्षातून 2 वेळा म्हणजेच जानेवारी व जुलै महिन्यात पूर्ण करण्यात येते. निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिने कालावधीत आपला संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल.
० अर्जाचा नमुना अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती, अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’सह प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, हैदराबादची जाहिरात पाहावी, दूरध्वनी क्र. 040-24008585 वर संपर्क साधावा. अथवा इन्स्टिट्यूट www.nird.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
० अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि

कागदपत्रांसह असणारे अर्ज प्रोजेक्ट डायरेक्टर
(डीईसी), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, राजेंद्रनगर, हैदराबाद-500030 या पत्त्यावर 29 नोव्हेंबर 2013 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.ज्या पदवीधरांना वनवासी विकास, स्थायी स्वरूपातील ग्रामीण विकास यासारख्या सेवाभावी क्षेत्रात करिअर करायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमांचा विचार करावा.

(dattatraya.ambulkar@gmail.com)