Home | Magazine | Akshara | article of suyasha parakhi on book pratibhechya dwari

‘प्रतिभेच्या द्वारी’

सुयशा पारखी | Update - Dec 30, 2016, 03:00 AM IST

वटवृक्षाच्या छायेतील या ज्ञानमंदिरास हा कवितासंग्रह समर्पित केलेला आहे. कवी लिहितो कशासाठी..? खूप गोष्टी कवीला दिसतात, जाणवतात त्या कुणाशी तरी व्यक्त होण्यात धन्यता असते कवी हे कवितेतून करतो. तेच कवी गोकुळ वाडेकर यांनी अापले गूज येथे व्यक्त केलेले दिसून येते.

  • article of suyasha parakhi on book pratibhechya dwari
    वटवृक्षाच्या छायेतील या ज्ञानमंदिरास हा कवितासंग्रह समर्पित केलेला आहे. कवी लिहितो कशासाठी..? खूप गोष्टी कवीला दिसतात, जाणवतात त्या कुणाशी तरी व्यक्त होण्यात धन्यता असते कवी हे कवितेतून करतो. तेच कवी गोकुळ वाडेकर यांनी अापले गूज येथे व्यक्त केलेले दिसून येते.

    कधी कुणाच्या वाटेवरती ठेवू नका अंधार, इतक्या सध्या सोप्या शब्दांमधून कवी विचार मांडतो. वटवृक्षांच्या छायेत चंदनासारखे झिजणारे अण्णा असतील, कर्मवीर असतील, नवे जग पाहण्याची जिज्ञासा असलेले, राष्ट्रवीरांची विटंबना असेल, शाळेबद्दलची कृतज्ञता असेल, आई-बापांच्या आकारात बघितलेला ओंकार असेल, आयुष्यात राहून गेलेल्या काही बाबी असतील या सर्वांबाबत कवी आपुलकीने, आदराने बोलताना दिसून येतो. हा कवी नव्या दमाचा नवा कवी आहे. पाषाण फोडण्याची, समुद्राच्या लाटा उठवण्याचा, शौर्यगीते गाण्याचा त्यांचा आवेग आहे. म्हणून धडपडणाऱ्या मुलांना गाऊ द्या, असे प्रोत्साहन देताना कवी दिसून येतो. जीवनगाडी हाकताना बेकारीची झळ ज्यांना बसली आहे. अशा लोकांचे मनोगत कवी त्याचे कवितेतून करताना दिसून येतो. अशावेळी कांगावा केला असा वेगळा सूर कवी लावतो. कवीला निसर्ग आवडतो म्हणूनच कवी सृष्टी स्नान करताना थेंब जळाचे चिकटून होते. साऱ्या अंगावरी लाजून लाजून झटकत होते साऱ्या पृथ्वीवरी अस म्हणताना तनू लाजरी पानापासून झाकून घेतात असा भावसुलभ उद‌्गार बाहेर येतो. मातीच्या वेदना मांडताना भूमिपुत्राचं दु:ख आणि त्यांचे कष्टप्रद प्रवास कवी अतिशय रोचकपणे मांडतो. समाजकारण, राजकारण, शेती, निसर्ग या सर्व विषयांवर लिहिताना कवी निवडुंगावरती देखील भाषण करतो; पण तुक्याच्या वाणीचा जिव्हाळादेखील कवीला आहे, मराठी माईचे प्रेम आहे, युवकांच्या थव्याविषयी कवीला आस्था आहे आणि फुले हळुवार स्पर्शाबरोबर वेदना ठेवून जातात. याची जाणीव कवीला आहे. ‘प्रतिभेच्या द्वारी’ या कवितासंग्रहात कवी आपल्या विचारांना, चिंतनाला, भावभावनांना मिळालेले शब्द वरदान त्यातून प्रतिबिंबीत झालेल्या कविता रसिकांपर्यंत या कवितासंग्रहाच्या रूपाने सादर करत आहे.
    शब्दांकन : सुयशा पारखी
    प्रकाशक : शब्दमल्हार प्रकाशन कवी : गाेकुळ वाडेकर किंमत : १०० रुपये

Trending