आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Acupressure By Dr.shashikant Gorwadakar

सर्व नियंत्रक बिंदू जाणून घ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीरातील सर्व घटकांचा समतोल घडवून आणणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे व अवयवांचे पोषण वाढवणे या गोष्टी सर्व नियंत्रक बिंदूवर दाब दिल्याने घडून येतात. शरीरास फक्त ४ बिंदू मर्म आहे.

एस.टी. ३६-ठिकाण : गुडघ्याच्या वाटीखाली ३ चुन समोरून खालच्या बाजूस वाटीपासून ४ बोटे टि.बी. या हाडाच्या वरच्या भागापासून १ बोट बाहेरच्या बाजूस.
उपयोग : गुडघ्याच्या संबंधित सर्व विकार, सर्व साधारण आरोग्याच्या सर्व तक्रारी, उच्च व कमी रक्तदाब, मधूमेह, खालच्या अवयवांचा लकवा, चेह-याचा लकवा, उलट्या, भूक न लागणे, ढेकर येणे, मज्जातंतूच्या विकारामध्ये, सौदर्योपासना, अर्धाग वायू मानसिक ताणतणाव. हा बिंदू पोटाच्या सर्व विकारावर दूरस्थ मर्म म्हणून वापरला जातो. पोटाशी संबंधित, पोटदुखी, जुलाब, अतिसार, मलावरोध आणि इतर विकारासाठी या बिंदूवर उपचार करावा तसेच हा बिंदू घसा व छाती यांच्या विकारासाठी पण वापरता येतो.
एस.पी.६ : प्लीहेचा बिंदू, प्लीहा, ऊर्जापथ ठिकाण – पायाच्या आतल्या घोट्याच्या उंचवट्यापासून ३चुन ४ बोटे टिबीयाच्या हाडाच्या मागच्या बाजूला.
उपयोग : जठर व प्लीहा यांच्याशी संबंधित विकार, पोटातील आवाज, पोटावरील ताण, अॅलर्जी, अपचन, सूज, सर्वसाधारण आरोग्य उच्च, निच रक्तदाब, ताप अंतस्त्राव ग्रंथीच्या स्त्रांच्या प्रमाणात बदल होणे व यामुळे उद‌्भवलेले विकार वारंवार शौचाला जाणे, अवयवांचे दुबळेपण, खालील अवयवांचा लकवा, कान, डोळे याचे विकार. जठर, प्लीहा, मूत्रपिंड यांचे ऊर्जापथ या बिंदूजवळून गेल्याने या तिन्ही ऊर्जापंथांशी संबंधित विकारावर हा परिणामकारक ठरतो. हा मर्म बिंदू गूहय भागासाठी दूरस्थ मर्म म्हणून कार्य करतो. त्यामुळे पुनरोत्पादन संस्थेशी संबंधित विकारावर म्हणजेच नपुसकता, शुक्रजंतुची अपूर्णता, मासिक पाळीच्या तक्रारी अवघड बाळंतपण, अंडाशयातील वेदना, झोपेत लघवी. लघवीत अडथळे, निद्रानाश, स्वप्नदोष, पांढरे जाणे, सूज इत्यादी वर अतिशय उपयुक्त ठरतो. शरीरात समतोल राखतो.
एल. आय.११ : मोठे आतडे - ठिकाण - हात कोप-यावर वाकवल्यावर कोपराच्या बाहेरच्या बाजूच्या घडीच्या टोकाच्या हाडाच्या खड्यात.
उपयोग : कोपर दुखणे, शरीराच्या वरच्या भागामधील हालचालीतील बाधा, पित्ताचे चट्टे, अतिसार, उलटया, ताप येणे, अति रक्तदाब, मधूमेह, त्वचारोग, पोलिओ, अनियमित पाळी, अर्धां वायू हा सर्वसमावेशक मर्म आहे. शरीराचा समतोल प्रस्थापीत करतो.
जी. व्ही. १४ पार्श्वमध्यगा उर्जापथ : ठिकाण : मानेच्या सातव्या व पाठीच्या पाहिल्या मनक्यामध्ये हा मर्म आहे.
उपयोग : सर्व प्रकारचे मानसिक विकार, मान अवघडणे, सर्वाइकल स्पाॅडिलायटिस ताप, सूज, त्वचा रोग, एन्फ्लुइन्झा, डोकेदुखी, अर्धशिशी इत्यादी. हा शरीरातील सर्व मर्मामध्ये सर्वात्कृष्ट मर्म समजला जातो. रोगप्रतिकारक शक्ती, वाढ, पोषक करणे, ताप कमी करणे, आदीचा प्रभाव कमी करणे यासाठी या बिंदूवर उपचार करावा.