आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्स्ट लेडी की फर्स्ट जंटलमन?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्याकडे आजचा सूर्य मावळेल तसा अमेरिकेत दिवस उजाडेल आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अगदी शेवटचा, निकालाचा, टप्पा सुरू होईल. जगभरातल्या कोट्यवधी लाेकांना चुंबकाप्रमाणे खेचून घेणाऱ्या या खंडप्राय देशाचे अध्यक्षपद प्रथमच एक महिला भूषवणार का, या प्रश्नाचं उत्तर मिळायला आपला बुधवार उजाडेल. आज दिवसभर वृत्तवाहिन्यांवर याविषयीच चर्चा सुरू असेल. 

हिलरी अध्यक्ष झाल्या तर त्यांचे पती बिल यांना काय म्हणायचं, हा प्रश्नही अमेरिकी लोकांना महत्त्वाचा वाटतो. आतापर्यंत पुरुष अध्यक्ष असल्याने त्याची पत्नी \'फर्स्ट लेडी\' असे. मग बिल यांना \'फर्स्ट जंटलमन\' म्हणायचे का? अध्यक्षासाठी तिथे POTUS - President of The United States व अध्यक्षाच्या पत्नीला FLOTUS - First Lady of The United States असे संबोधले जाते. हिलरी जिंकल्या तर अमेरिकेतील शब्दकोशांमध्येही अनेक नवीन शब्दांची भर पडण्याची चिन्हं आहेत. कारण फ्लोटस हा शब्द त्यांच्या कार्यकालात तरी वापरता येणार नाही. मग एखादा नवीन शब्द तयार करावाच लागेल. 

इतक्या प्रगत, समानतेचं मूल्य जोपासणाऱ्या देशात अद्याप एक महिला अध्यक्षपदी कशी पोहोचली नाही, याचं अमेरिकेबाहेरच्या अनेकांना आश्चर्य वाटतं. तुलनेने मागासलेल्या अाशिया खंडातल्या अनेक राष्ट्रांचं प्रमुखपद महिलांनी भूषवलेलं आहे. परंतु, यातून हेच लक्षात येतं की, देशाच्या अध्यक्ष/पंतप्रधानपदी महिला अाहे म्हणजे त्या देशातल्या महिला सुखी, समाधानी व सुरक्षित आहेत, असं नाही. भारत, बांगलादेश, पाकिस्तान, आणि श्रीलंका या देशांमध्ये पहिली महिला पंतप्रधान अनेक वर्षांपूर्वी होऊन गेली आहे, परंतु तिथल्या महिलांचा सामाजिक, आर्थिक, शारीरिक, भावनिक विकास अद्याप खुंटलेलाच आहे. तर अमेरिकेत महिला अध्यक्ष न होताही महिला बहुतांश क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आहेत. तिथे मुलीचा जन्म नकोसा वाटत नाही, हेही पुरेसं वाटावं. हिलरी यांच्याबद्दल बोलताना त्या कशा एक आदर्श आई आणि आजी आहेत, याचे दाखले दिले जातात, याचा मात्र खेद वाटतो. कोणत्याही पुरुष अध्यक्ष, नेता, कर्णधार, व्यवस्थापक यांचं पितृत्व असं जोखलं जात नाही, ते राहून राहून आठवतं ना?

mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...