आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिजैवके : अँपिसिलिन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे एक प्रतिजैविक किंवा अँटीबायोटिक आहे. २५० किंवा ५०० मिली ग्रॅमच्या कप्सूल उपलब्ध असतात. पातळ औषध तयार करण्यासाठी पावडरही मिळते, असे औषध तयार करण्यासाठी उकळून थंड केलेले पाणी बाटलीत खुणेपर्यंत टाकावे. बाटली हळूवारपणे हलवावी. दर ५ मिली पातळ औषधात १२५ किंवा २५० िमली ग्रॅम अँपिसिलिन असते. हे औषध अनेक प्रकारच्या जंतूंना मारु शकते. रक्ती हगवण, चिघळणा-या जखमा, कान फुटणे, घसा -टॉन्सिल, श्वसनसंस्था, मूत्रविसर्जन संस्था आदींचे जंतूदोष या सर्व रोगात परिणामकारक ठरते. विषमज्वर तसेच काही गुप्तरोग व मेंदू आवरण दाहातही उपयोगी ठरते. प्रौढ व्यक्तींसाठी दिवसातून चार वेळा एकेक कप्सूल याप्रमाणे पाच दिवस औषध घ्यावे लागते. एमाक्सिलिन हे याच प्रकारचे औषध आहे.
या औषधामुळे क्वचित अंगावर खाज सुटून गांध येते, पोट बिघडून एखाद-दोन जुलाब होतात. जास्त दिवस घेतल्यास आतड्यातील उपयुक्त जंतूही मरतात. हे औषध प्रभावी आहे पण त्याचा उठसूट वापर करु नये. एकदा चालू केल्यावर किमान पाच दिवस द्यावे अन्यथा रोगजंतूमध्ये त्याच्या विरोधी प्रतिकारशक्ती तयार होते. रुग्णाला पेनिसिलीन चालत नसेल तर अँपिसिलिनही वापरू नये. या औषधापेक्षा एमॉक्सिलिन स्वस्त व बरे पडते. मात्र हे जमत नसेल तर डॉक्टरच्या सल्ल्यानेच करावे.