आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Ardhmastyendrasan By Smita Sharad Bhogale

सहज सुलभ योगासने : अर्धमत्स्येन्द्रासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे बसून करावयाचे आसन आहे
कृती :
१. पाय पुढे पसरून बसावे.
२. डावा पाय गुडघ्यात वाकवून त्याची टाच शिवणीजवळ पक्की बसवावी.
३. उजवा पाय गुडघ्यात वाकवून डाव्या बाजूला डाव्या गुडघ्याजवळ ठेवावा.
४. डावा हात उजव्या गुडघ्यावरून घ्यावा आणि हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडावा.
५. संपूर्ण शरीर डावीकडे फिरवावे. उजवा हात पाठीमागून डाव्या मांडीवर ठेवावा.
६. डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला दाब देत उजव्या हाताने मांडीला ताणून शरीर उजवीकडे जास्तीत जास्त फिरवावे. मान उजवीकडे नेऊन नजर मागे न्यावी. या स्थितीत काही सेकंद राहून आसन सोडावे.
७. दुस-या बाजूने हिच क्रिया करावी.