आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Asthma By Gautam Jogad Jain, Divya Marathi

दम्यापासून सुटकेसाठी आयुर्वेदिय उपचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऋतुमानात बदल झाल्यानंतर येणारा सर्वात कष्टदायक आजार म्हणजे दमा किंवा अस्थमा. हा आजार ठीक होण्यास सर्वात अवघड असा आहे. या आजारात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीबरोबरच वातावरणातील बदलही कारणीभूत असतो. अशावेळी आपण सभोवतालचे वातावरण बदलू शकत नाही, परंतु काही खबरदारी घेतली तर या जीवघेण्या त्रासापासूनही आपली सुटका होऊ शकते. आजकालच्या प्रदूषित वातावरणामुळे या आजाराचे प्रमाण खूप वाढले आहे.
दमा होण्याची कारणे : 1) थंड आहार - विहार 2) आनुवंशिकता 3) अ‍ॅलर्जी (धूर-धूळ, सिगारेट आणि वात प्रदूषण इ.) 4) सायनुसायटिस, सर्दी, सतत खोकला यासारखे त्रास 5) मानसिक तणाव, जागरण, अतिश्रम 6) रक्ताची कमतरता, टीबी, हृदयरोग, एड्स इ.
वरीलपैकी कोणत्याही किंवा इतर कारणांनी रुग्णास दमा झाल्यास पुढील लक्षणे उत्पन्न होतात. आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे व प्रदूषित वातावरणामुळे बालदम्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. रुग्णास श्वास घेण्यास खूप त्रास होतो, पोट फुगते, जीव कासावीस होतो, श्वास घेताना शिटी वाजल्यासारखा आवाज होतो. झोप येत नाही, छातीत कफ साठणे, डोळे ताठर होणे, मंद ताप असणे इ. तसेच बंद घरात जास्त त्रास होतो.
उपचार : या आजारात दम्याचा अ‍ॅटॅक आल्यावर रुग्णास काही इमर्जन्सी औषधी घ्यावी लागतात, तर कधी रुग्णालयात भरती होण्याची पाळी येते, थोडा वेग कमी झाल्यावर पुढील उपचार करावा.


वमन : छातीत खूप कफ भरलेला असेल तर वमन केल्याने कफ बाहेर पडतो. त्याने रुग्णास श्वास घेण्यास त्रास होत नाही, कफ कमी झाल्याने कमी आयुर्वेदिय औषधे देऊन आजार बरा होण्यास मदत होते, तर कधी विरेचन आणि बस्ती हे पंचकर्म केल्यावर रुग्णास वर्षभर त्रास होत नाही. असे सलग 2 ते 4 वर्षे केल्यास हा आजार आटोक्यात आणण्यास मदत होते.
रसायन उपचार : आयुर्वेदिक ग्रंथात या आजारापासून सुटका करण्यासाठी पिप्पली रसायन घ्यावे, असा उल्लेख आहे, असे केल्याने फुप्फुस या अवयवाची शक्ती वाढते.
घरगुती उपाय : औषधी उपचारासोबत काही घरगुती उपायही करावे : 1. दालचिनी दुधात घ्यावी. त्यात थोडा मध टाकून घेतल्यास छातीतील व गळ्यातील कफ सहज सुटतो. 2. खडीसाखर, मनुके व दालचिनी चावून खाल्ल्याने दम्याचा अ‍ॅटॅक कमी होतो. 3. रात्रीचे वेळी 3 चमचे एरंडीचे तेल पिल्यास कफ बाहेर पडतो. त्यानंतर रुग्णास आराम मिळतो. 4. मोहरीच्या तेलात मीठ टाकून छाती चोळून गरम पाण्याने शेकल्यास कफ पातळ होऊन सुटतो. 5. हृदयरोग नसणा-या रुग्णांनी एक ग्लास गरम पाण्यात 5 ग्रॅम मीठ टाकून ते पाणी 1 - 1 चमचा या प्रमाणात दिवसभर पिल्यास कफ पातळ होऊन बाहेर पडतो. 6. अद्रक आणि मध घ्यावा तसेच पपई खावी. याशिवाय इतर आयुर्वेद चिकित्सा उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत.
हे करू नये (अपथ्य) : - ध्रूमपान कफ वाढवणारा आहार जसे दूध, दही, साबुदाणा, केळी, थंड पेय इत्यादींचे सेवन करू नये. एसी किंवा कूलरमध्ये झोपू नये. रात्री जागरण, थंड हवेत फिरणे टाळले पाहिजे. दम्याच्या रुग्णाचे पोट नेहमी साफ राहिले पाहिजे. बद्धकोष्ठता होणा-या वस्तूंचे सेवन टाळावे. मैदा किंवा त्यापासून बनलेले पदार्थ, बटाटे, शिळे अन्न, हॉटेलचे जेवण टाळावे.