आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तरच दमा नियंत्रणात ठेवता येतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमा हा आजार विज्ञानाच्या भाषेत सांगायचा झाला तर श्वासनलिकेच्या आतमधून सूज येऊन श्वास घ्यायला त्रास होतो. सूज येण्याची काही प्रमुख कारणे आहेत. त्याला आम्ही ट्रीगरस म्हणतो. काही ट्रीगर्स भावनिक ताणतणाव, धूळ, धूर, हवेतील बदल, प्राण्यांची लोकर(केस), शारीरिक श्रम आदी कारणे आहेत. ह्या सर्व ट्रीगर्सपैकी भावनिक ताणतणावाविषयी आज आपण चर्चा करूया. आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला मानसिक ताणतणावाखाली जगावं लागत आहे. प्रत्येक व्यक्तीच क्षितीज हे वेगळं आहे. कमी कालावधीत सगळं काही मिळवण्याची प्रत्येकाची धडपड चालू असते. त्यामधून संघर्ष निर्माण होणे, काही वाईट गोष्टी कराव्या लागणे, पुढे जायचे म्हणजे हे सगळं आलच, हे व्याक्य या जनरेशनसाठी अगदी अंगवळणी पडलं आहे. ह्या सर्व गोष्टीबरोबर शरीर व आरोग्य ह्या गोष्टीकडे पण दुर्लक्ष होत
आहे. अचानक फोन येतो की शरदला (काल्पनिक नाव) दम्याचा तीव्र झटका आल्यामुळे आय.सी.यु त भरती करावं लागलं. डॉक्टरांना विचारले की हे असे कसं काय झालं. तुम्ही दिलेली औषधी नियमित घेत असतानाही मला हा त्रास का झाला. डॉक्टरांनी शांतपणे उत्तर दिलं - तुझा ऑफिसचा कामाचा वाढता ताण. त्यामुळे आता ही वेळ आलेली आहे. दम्यासाठी औषधी बरोबर स्ट्रेस ताण व्यवस्थापन करण्याचीसुध्दा आवश्यकता लागणार आहे.

दुसरे उदाहरण - डॉक्टरांनी मला दम्याचा आजार सांगितला आहे. मला खूप ताण (टेन्शन) आलं आहे. आयुष्यभर दम्याचं एक औषध नियमित घ्याव लागेल. माझे अजून लग्नही झालेले नाही. मुलाकडील मंडळींना आम्ही सांगणारच नाही. कारण लग्न तर तुटू द्यायचे नाही. लग्न झाल्यावर ते कळू न देण्याचे टेन्शन आहेच. एका दिवशी दम्याचा तीव्र झटका येतो. हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. त्यानंतर मुलीच्या सासरच्या मंडळींकडून दिली जाणारी वागणूक आपल्याला माहितीच आहे.

वरील दोन्ही उदाहरणे आपल्या दैनंदिन जीवनात आजूबाजूला घडत असतात. ह्या सर्व गोष्टींना कारणीभूत आहे आपलं दम्याबद्दलच अज्ञान. दमा हा अानुवंशिक आजार असून तो संसर्गजन्य नाही. दम्यासाठी इनहेलर्स हाच एकमेव उत्तम पर्याय आहे. नियमित औषधे घेतल्याने आपल्या
फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते व आजार बळावत नाही. औषधांबरोबरच आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवणे महत्वाचे आहे.