आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Basti Treatment By Vaidya Dhiraj Deore

पाठीच्या मणक्याच्या आजारावर गुणकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बस्ती म्हणजे एनिमा असा व्यवहारातील भयंकर मोठा गैरसमज आहे. कृतीतील साधर्म्यामुळे हा गैरसमज झालेला आहे, परंतु संपूर्ण अंगाला विशिष्ट पद्धतीची तेल लावून पोटामध्ये विशिष्ट पद्धतीचे स्निग्ध पदार्थ घेऊन आणि संपूर्ण अंगाला विशिष्ट पद्धतीचा शेक देत बस्ती उपचार करावयाचा असतो. हे करण्यापूर्वी शरीरातील अजीर्ण आणि अग्निमांद्य नष्ट करायचे असते. आयुर्वेदानुसार आपल्या मोठ्या आतड्यामध्ये वात दोष उत्तम पद्धतीच्या मलातून (पुरीषातून) उत्पन्न होत असतो. त्यावर शरीरातील सर्व अवयवांचे तसेच मेंदूचे देखील काम अवलंबून असते. त्यामुळे योग्यवेळी जेवण, प्रकृतीला मानवेल असा योग्य आहार आणि शरीर आणि मन:स्वास्थ्य राहील, असा आचार-विचार यावर सर्वच दुखणी अवलंबून असतात.
१) या आजारांवर उत्तम उपचार
शरीरातील वात-दोष हा कप्त व पित्त या दोन दोषांना काम करण्यास प्रवृत्त करत असतो. अशा वात दोषांसाठी तिळीचे तेल हे अंतर्बाह्य वापरणे गरजेचे असते. या बरोबरच बस्ती उपचार ही प्रत्येक आजाराची निम्मी उपचार पद्धत आहे. पाठीचा मणका आणि त्यावर परिणाम करणारे शरीरातील सर्व घटक म्हणून पर्यायाने सर्व वातविकार जसे कंबरदुखी, मानदुखी, खांदेदुखी, हाता-पायाला मुंग्या येणे, कॉर्ड कॉम्प्रेशन, स्लिप डिस्क, गृध्रसीवात (सायटिका), स्पाँडिलेसिस, स्पॉन्डिलायटिस, हात-पाय वाळणे किंवा सुकणे, फ्रोझन शोल्डर, टेनिस एल्बो इत्यादी आजारात बस्ती उपचार उत्तम उपयोगी पडतो. मुस्तादी यादपन बस्ती, दशमूळ, धान्वंतर बस्ती इत्यादी बस्ती शरीरातील अनेक व्याधींसाठी आयुर्वेदाने सांगितले.
२) दुर्धर व्याधी रोखण्यास मदत
बस्ती उपचारांचा दुसरा फायदा म्हणजे कोणत्याही आजारात बस्ती उपचार केल्यामुळे हृदय, मस्तिष्क, आणि वृक्क या तिन्ही मर्मांचे आरोग्य आपोआपच सुधारले जाते. याची गरज कमी जास्त प्रमाणात पस्तीशीनंतरच्या प्रत्येक व्यक्तीस भासतेच. या बस्तीमुळे हार्टअटॅक, मेंदूत रक्तस्त्राव, अर्धांगवात, किडनी फेल्युअर यासारख्या दुर्धर व्याधी भविष्यात उत्पन्न न होण्याची व्यवस्था आपोआपच होते. याचा लाभ क्वचितच इतर उपचारांनी मिळू शकतो.
बस्ती उपचारांमध्ये दुखणं-खुपणं अत्याधिक पथ्यपाणी आणि वेळेचा प्रचंड अपव्यय या गोष्टी फारशा घडत नाहीत. नियोजन मात्र आवश्यक आहे. रुग्ण इतर आजारांसाठी बस्ती घेण्यासाठी येतो आणि शरीराचा कायाकल्प होतो.