आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान करा, आरोग्यवंत व्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या देशात प्रत्येक वर्षी साधारणत: ४ कोटी युनिट रक्ताची आवश्यकता भासते. पण प्रत्यक्षात ४० लाख युनिट रक्त उपलब्ध असते. प्रत्येक दुसऱ्या सेकंदाला रुग्णाला रक्त देण्याची आवश्यकता आहे. दररोज ३८ हजार रक्तदात्यांची आवश्यकता आहे. सिकलसेल रुग्णांना आयुष्यभर वारंवार रक्ताची आवश्यकता भासते. रोज साधारणत: लाखो नवीन कॅन्सरच्या रुग्णांची भर पडत आहे. यातील बहुतेकांना केमोथेरेपी दरम्यान वारंवार रक्ताची आवश्यक्ता असते. अपघातात जखमींना साधारणत: शेकडो युनिट रक्ताची गरज भासते. रक्त शरीराबाहेर तयार करू शकत नाही. सामाजिक जाण असणाऱ्या व्यक्तींकडूनच रक्त उपलब्ध होऊ शकते. सध्या आणखी एक भीतीदायक स्थिती म्हणजे रक्तदान करण्यास पात्र व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. रक्तदानाविषयी गैरसमज, रक्तदान केल्याचे फायदे, रक्तदान न केल्याचे नुकसान या बाबतीत माहिती लोकांपर्यंत पोहचली नाही तर कालांतराने रक्तदानास पात्र व्यक्तींची संख्या कमी होईल. असंख्य लोकांचा दररोज रक्त उपलब्धते अभावी मृत्यू होऊ शकतो. रक्तदात्याने वारंवार रक्तदान केल्याने त्यांना स्वत:ला होऊ शकणारा संभाव्य हदय रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, त्वचा विकार इत्यादी आजार होण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच त्यांचे आयुष्य निरोगी राहील. अशाच प्रकारची संभावना घेऊन या क्षेत्रात कार्य केले तर आपल्या देशातील एकही रुग्ण रक्त अनुपलब्धतेमुळे मरणार नाही. तसेच आपण संपूर्ण जगाला रक्त पुरवठा करू शकतो. वारंवार रक्तदाब केल्याने निरोगी देशवासीयांची संख्या वाढेल.
विनंती : प्रत्येकाने वर्षातून दोन ते तीन वेळेस रक्तदान करावे. रक्तदान करा- दुसऱ्यांना जीवदान द्या आणि स्वत: आरोग्यवान व्हा.