Home | Magazine | Akshara | article on book panpasara

'पाणपसारा’

दिव्‍य मराठी | Update - Dec 30, 2016, 03:00 AM IST

खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण, हवामान बदल अाणि सर्वच स्तरांवर जलसंघर्षाच्या संख्येत व तीव्रतेत सातत्याने हाेत असलेली जीवघेणी वाढ या व्यापक पार्श्वभूमीवर ‘पाणपसारा’ हे पुस्तक अाहे. राज्यातील व विशेषत: मराठवाड्यातील दुष्काळाचा दाहक संदर्भही त्याला अाहे. माती, पाणी, उजेड, वारा हा सर्व पसारा समजावून घेत पाणी-प्रश्नाला भिडणे हे अाव्हान अाहे. ते स्वीकारताना पाण-पसाराची निश्चतच मदत हाेणार अाहे.

  • article on book panpasara

    पर्यावरण, जलनियाेजन व जलविकास, मराठवाड्याचा पाणीप्रश्न, पाण्याचे खासगीकरण अाणि दुष्काळ अशा साधारण पाच विषयांवर गेल्या दहा वर्षांत प्रा. विजय दिवाण यांचे विविध वर्तमानपत्रांतून प्रकाशित झालेले एकूण ३१ लेख या पुस्तकांत अाहेत. लाेकाभिभुख व शासकीय दृष्टिकाेनातून केलेली अभ्यासपूर्ण मांडणी अाणि सुस्पष्ट विश्लेषण हे या लेखांचे वैशिष्ट्य अाहे. एका सर्वसामान्य वापरकर्त्यांच्या भूमिकेतून मते मांडली अाहेत असे जरी असले तरी हे लिखाण त्याच्या फार पलिकडे जाणारे असून त्यात लेखकाचा अभ्यासू व्यासंग अाणि सामाजिक बांधिलकी पदाेपदी जाणवते. पाण्याच्या पर्यावरण दृष्टीने नियाेजन व व्यवस्थापन, पाणीवाटपातील विषमता, पाण्याचा बाजार अाणत्र चंगळवादी व अकार्यक्षम वापर यावर लेखकाने काेरडे अाेढले अाहेत. माेठ्या धरणांना विराेध अाणि लाेकसहभागावर अाधारित पर्यावरण-स्नेही विकेंद्रित जल विकासाचा अाग्रह हे त्यांच्या मांडणीचे मध्यवर्ती सूत्र अाहे. त्यांच्या प्रतिपादनाचे मुख्य दुवे सूत्ररुपाने पुढीलप्रमाणे अाहेत. एक अनमाेल नैसर्गिक वारसा अाणि सामाजिक मूल्य असणशरे सामाईक संसाधन म्हणून पाण्याकडे केवळ विश्वस्ताच्या भूमिकेतून पाहिले पाहिजे. सर्वांना किमान पाण्याचे व उपजीविकेपुरते तरी पाणी मिळण्याला अग्रकम हवा.

Trending