आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शंभर व्याधी:अाेळख एकच कॅन्सर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१) पेशींमध्ये विकृत बदल कधी घडून येतात?
आपल्या शरीरामध्ये सामान्य प्रकारच्या शरीराला आवश्यक अश्या असंख्य व अनेक प्रकारच्या पेशी असतात, प्रत्येक पेशीचे ठराविक वय असते त्यांचा कालावधी संपताच त्या मृत पावतात व त्यांच्या जागी नवीन पेशींची निर्मिती होत असते, नवीन पेशींच्या निर्मितीमध्ये आपल्या शरीरात असलेल्या जनुकांची महत्त्वाची भूमिका असते. जनुकांमध्ये असलेल्या गुणसूत्रांनुसार पेशींची निर्मिती ठरलेली असते. अशा प्रकारे जुन्या पेशींना बाहेर टाकणे व नवीन पेशींची निर्मिती होणे हे शरीरक्रियेचे चक्र २४ तास सुरूच असते. नैसर्गिकरीत्या एका पेशीपासून दुस-या अनेक पेशींची निर्मिती सुरूच राहते, निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये विकृत (Abnormal) बदल घडून सामान्य (Normal) पेशी निर्माण होण्याऐवजी विकृत अनावश्यक पेशींची निर्मिती होते त्याचा शरीरक्रियेवर (physiology) परिणाम होतो व दिवसेंदिवस आजार बळावत जातो. जुन्या किंव्हा कुठल्याही कारणाने जखमी (injured) झालेल्या पेशीमध्ये शरीरक्रियेनुसार सुधारणा (repair) होत असते, जर त्या पेशींमध्ये सुधारणा होऊ शकली नाही तर त्या पेशी शरीरातून बाहेर टाकल्या जातात व त्याजागी नवीन पेशींची निर्मिती होत राहते. पेशींचे डॅमेज व रीपेअर ही शारीरिक क्रिया २४ तास सुरूच राहते, पेशी दुरुस्त (रीपेअर) होण्याच्या या प्रक्रियेमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा कॅन्सरची सुरुवात होते, जखमी पेशींची सुधारणा न होता त्याच अवस्थेत नवीन पेशींची निर्मिती सुरू राहिल्यास पुढील निर्माण होणा-या पेशींमधील जनुकांमध्ये विकृत जनुकीय बदल (genetic mutation) घडून येतात आणि त्यातील गुणसूत्रात फेरबदल होऊन विकृत जनुकांची निर्मिती होते व त्यापासून पेशींच्या निर्मितीसाठी चुकीचे निर्देश मिळतात आणि कॅन्सरच्या पेशींची निर्मिती सुरू होते. कॅन्सर हा कुठल्या एका इंद्रियाचा किंवा शरीराच्या एका भागाचा आजार नसून तो एक पूर्ण शरीराचा आजार आहे.
२) जनुकांमधील आनुवंशिक व चालू आयुष्यातील बदलांमुळे कर्करोग :
कॅन्सर दोन प्रकारे होऊ शकतो एकतर आपल्या पूर्वजांच्या जनुकामध्ये झालेल्या बदलामुळे ज्याला इंहेरीटेड (Inhereted) कॅन्सर म्हणतात व दूसरा म्हणजे आपल्या शरीरातील चालू आयुष्यात घडलेल्या जनुकातील बदलामुळे ज्याला अक्वयार्ड (acquired) कॅन्सर असे म्हणतात. जोपर्यंत या जनुकांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत ह्या कॅन्सरच्या पेशींची निर्मिती होतच राहणार.
विषाणूजन्य आजार ज्याच्या उपचारासाठी अति प्रमाणात आधुनिक रसायनिक औषधीचा वापर केला असेल अशा अवस्थेत तो विषाणूजन्य आजार शरीरात दाबला जातो त्यामुळे त्याचा प्रभाव आपल्या जनुकांवर पडतो त्यामुळेदेखील कॅन्सर होऊ शकतो, विषाणूजन्य व जीवाणूजन्य आजारावरती आपल्या देशात सरस आधुनिक औषधींचा अॅंटीबायोटिकचा मारा केला जातो परदेशात याच अॅंटीबायोटिकचा वापर इतका सहजासहजी करता येत नाही त्यासाठी डॉक्टरांना बंधन आहेत जे आपल्या देशात नाहीत. काही अॅंटीबायोटिकमुळेदेखील जणुकावर त्याचा दुष्परिणाम होत असल्याचे निदर्शनात आले आहे, शक्यतो अॅंटीबायोटिकचा कमीतकमी वापर करावा किंवा विषाणूजन्य व जीवाणूजन्य व्याधींसाठी होमिओपॅथिक किंव्हा आयुर्वेदिक औषधींचा वापर करावा. खाण्या मध्ये किटकनाशकांचा वापर न झालेल्या भाज्या व फळे खावीत.
जनुकामध्ये झालेल्या विकृत बदलात दुरुस्तीएेवजी दुष्परिणाम
{उपचार : कॅन्सरवर प्रथम अवस्थेत उपचाराचा जास्त फायदा होतो, जनुकातील एका म्युटेशनमुळे कॅन्सर होत नाही दोन किंव्हा जास्त म्युटेशन झाल्यास कॅन्सरची सुरुवात होते, जितके म्युटेशन जास्त तितका कॅन्सर जास्त लवकर पसरतो व जास्त बळावतो. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी जनुकामध्ये झालेला विकृत बदल दुरुस्त करणारी औषधी वापरली जावी. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी होमीओप्याथिक, आयुर्वेदिक व अॅंलोप्याथीक या सर्वच उपचार पद्धतीमध्ये उपचार केले जातात. अॅंलोप्याथीक उपचारपद्धतीमध्ये केमोथेरपी व रेडीओथेरपी या पद्धतीने उपचार केले जातात, या पद्धतीमध्ये फक्त कॅन्सरच्या पेशी मारल्या जातात किंव्हा कॅन्सर झालेला भाग किंवा अवयव शस्त्रक्रीया करून काढून टाकला जातो. कॅन्सरच्या पेशींबरोबर इतर शरीराच्या आवश्यक पेशी देखील मारल्या जातात, परंतु जनुकामध्ये झालेला विकृत बदल दुरुस्त केला जात नाही उलट त्याचे दुष्परिणाम अधिक होतात.
होमिओपॅथी औषधीचे जनुकांवर कार्यपरिणाम नॅनो टेक्नॉलॉजी ने हे सिद्ध केले आहे की होमिओया पथिक औषधी हे जनुकांवर कार्य करते, त्यामुळे कॅन्सरच नाही तर इतर कुठल्याही आजारामध्ये प्रथम अवस्थेत आपण होमिअाेपॅथिक औषधी घेतली तर त्याचा जास्तीजास्त फायदा होतो कारण होमीओपॅथिक औषधींचे दुष्परिणाम होत नाहीत. होमिओपॅथिक औषधी जनुकांवर काम करतात त्यातील दोष दूर करतात म्हणून होमिओपॅथीबद्दल बोलले जाते की औषधी आजार मुळापासून काढते.
इतर उपचारासह होमिओपॅथी सुरू ठेवा : कॅन्सरच्या उपचारामध्येदेखील इतर उपचार पद्धतीबरोबर होमिओपॅथिक औषधी घेऊ शकता इतर औषधींचा होमिओपॅथिक औषधीवर किंवा होमिओपॅथिक औषधींचा इतर औषधीवर कुठलाही परिणाम होत नाही कारण इतर औषधी फक्त कॅन्सरच्या पेशींना मारण्याचे काम करते तर होमिओपॅथिक औषधी जनुकांवर कार्य करून नवीन कॅन्सरच्या पेशी तयार होण्याचे काम थांबवते, परंतु प्रथम अवस्थेत होमिओपॅथिक उपचाराचा जास्तीत जास्त फायदा होतो.
drsanjay.padole@gmail.com