आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिचंचलता आणि एकाग्रतेचा अभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटेंशन डेफिसीट हाईपर डिसऑर्डर म्हणजे अतिचंचल मुलांमधील एकाग्रतेचा अभाव असणारा हा आजार. म्हणजे लहान मुलांमधील सर्वाधिक आढळून येणारा न्यूरोबिहेवीथरल प्रकारात मोडणारा हा एक आजार! शाळेत जाणा-या मुलांत एडीएचडी असण्याचं प्रमाण ४ टक्के ते १२ टक्के इतकं जास्त आहे. या आजाराची अनावधान किंवा एकाग्रतेचा अभाव, उताविळपण आणि अतिचंचलता ही वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे आहेत. अशी मुलं कुठलंच काम स्थिरपणे करीत नाही. त्यांची सतत चुळबुळ सुरू असते. अभ्यास नीट करीत नाहीत. लक्ष देत होमवर्क पूर्ण करणे त्यांना जमत नाही. सतत गोंधळलेले असतात.

ते कधी काय करतील याचा नेमका अंदाज बांधणे अवघड असते. खेळत असताना मध्येच अभ्यासाला नाही तर गाणं म्हणतील. त्यामुळे नेहमी चुका करत असतात. काही मुलांच्या बाबतीत असंही आढळतं की त्यांना जुन्या गोष्टी नीट लक्षात राहतात, पण आता सांगितलेलं मात्र ते सरळ विसरतात. ती एका वेगळ्या विश्वात वावरत असतात. शाळेत खूप मस्ती करणं, खोटं बोलणं असे अवगुण त्यांच्यात वाढत जातात. मात्र त्यांना सगळी कामं अगदी पटापट करायची असतात. पण एकही काम ती नीट पूर्ण करू शकत नाहीत.

एडीएचडीच्या कारणांचा शोध घेताना मेंदूतल्या डोपामिन या न्यूरोट्रान्समीटरची कमतरता ही बाब या आजाराला कारणीभूत ठरते. मॉलेक्युलर स्टडीनुसार एडीएचडी आणि डोपामिन रिसेप्टर जीन d4, डोपामिन रिसेप्टर जीन d5 आणि डोपमिन ट्रान्सपोर्टर जीनचा संबंध दिसून आला. एडीएचडीचे इनअॅटेन्टिव्ह टाइप, इम्पालिसिव्ह, कार्बाइन्ड टाइप असे प्रकार आहेत.

एडीएचडीमध्ये मेंदूच्या एक, दोन किंवा ब-याच भागावर परिणाम होऊन एडीएचडी हा विकार असलेल्या मुलांत विविध प्रकारच्या स्टाईल्स किंवा प्रोफाईल्स उत्पन्न होतात. मेंदूच्या फ्रन्टल लोप कॉर्टेक्सची प्रतिबंध करण्याची रचना, लिबीक सिस्टिम आणि रेटीक्युलर एक्टिव्हेटिंग सिस्टिम यावर प्रभाव पडतो. मेंदूचे हे भाग वेगवेगळी कार्य करतात.जसे गोष्टीकडे लक्ष्य देणे, आकलन करणे, योग्य वर्तन करणे, अतिचंचल होणे वा अविचाराने बोलण्यापासून परावृत्त करणे इत्यादी. पण जेव्हा मेंदूचे हे इनहिबीटरील मॅकेनझमस आवश्यक तेवढे कार्यक्षम नसतात, तेव्हा त्याचे परिणाम काही वेळा डिसइनहिबीशन डिसऑर्डरसच्या रूपाने सामोरे येतात. उतावीळपणा, रागीटपणा, निर्णयक्षमता खच्ची होणे. अतिचंचलता हा त्याचाच परिणाम असू शकतो.
लिबीकसिस्टिमच्या कार्यात अडथळा आल्याने मग भावनांचे सर्वसाधारण बदल, झोपेची वेळ, दैनंदिन तणावाला तोंड देण्याचे सामर्थ्य या बाबींवर त्याचा अनिष्ट परिणाम दिसून येतो. अशा मुलांत समाजविरोधी वागणूक आढळते. ती उद्धट असतात. एडीएचडीला शिकार झालेल्या मुलांचा शाळेतील परफॉर्मन्स अगदीच कमी असतो. एडीएचडी म्हणजे मतिमंदत्व नव्हे किंवा आय. क्यु. कमी आहे असे नव्हे. अशा मुलांचा आय. क्यु. चांगला, सामान्य किंवा कमी असू शकतो. त्यांची शैक्षणिक प्रगती खुंटते अन् त्याच्यावर एक प्रकारचे दडपण येते. जवळजवळ ५० ते ६० टक्के एडीएचडी मुलांच्या लक्षणांमध्ये विसाव्या वर्षी वाढ होऊ शकते. कारण मेंदूची विशेषत: फ्रन्टल लॅबची अंतिम वाढ ही वयाच्या १९ ते २० व्या वर्षी होते. त्यानंतर अतिचंचलता कमी होऊ शकते. नोकरी - व्यवसाय नीट न करणे, यामुळे भावी आयुष्यावरही त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात. त्याची प्रशंसा करून त्याला सतत चांगले वागण्यासाठी आणि सुधारण्यासाठी त्यांना वेळ द्या. मुलांत जर अशी लक्षणे आढळली तर त्वरित बालरोग तज्ज्ञ / मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे आहे.