आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Commerce By Vilas Gavaraskar, Divya Marathi

कॉमर्समधील संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सगळ्यात एव्हरग्रीन करिअर कोणते असे कुणी विचारले तर एकमुखाने उत्तर येऊ शकते आणि ते म्हणजे कॉमर्समधील. कॉमर्स किंवा वाणिज्य शाखा ही जगभरामध्ये व्यवहारात घडत असलेल्या गोष्टीची नोंद ठेवण्यात अग्रेसर असते. हिशेब, जमाखर्च, ताळेबंद या गोष्टी कोणत्याही कंपनीसाठी जशा महत्त्वाच्या असतात तसेच व्यवस्थापन, मार्केटिंग, मनुष्यबळ व्यवस्थापन या गोष्टीदेखील तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. अशा सर्वच गोष्टींचा अभ्यास कॉमर्समध्ये समाविष्ट असतो. त्यात पुन्हा मॅथेमॅटिक्स आणि नॉन मॅथेमॅटिक्स असेही पर्याय असतात. ज्यांचे गणित खूप चांगले आहे, लॉजिक खूप आवडते, त्यांचे विश्लेषण ज्या विद्यार्थ्यांना खूप चांगले जमू शकते त्यांनी आवर्जून मॅथेमॅटिक्स विषय घ्यावा.
डेरीवेटीव्हज, इंटिग्रेशन किंवा तत्सम गणिती प्रकारांनी लॉजिक छान तयार होऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांचे स्पेशलायझेशन हे मॅथेमॅटिक्स नाही त्यांना देखील भरपूर संधी उपलब्ध होतातच. अशा वेळी सेक्रेटरी प्रॅक्टिससारखा अन्य कुठलाही थिअरी विषय निवडावा लागतो. बारावी कॉमर्सला भरपूर अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क मिळवून सीए., आयसीडब्ल्यूए.,सीएस सारख्या कोर्सेसची तयारी करण्याचे ध्येय ठेवावे. त्यासाठीची तयारी अगदी दहावी झाल्यानंतरच करायला हरकत नाही. अशा कोर्सेसचा एकूण रिझल्ट पाच ते दहा टक्क्यांच्या आत असल्यामुळे पहिल्याच अटेंप्टमध्ये अपयश आले तरीही घाबरण्यासारखे काहीही नाही. पुन्हा सराव करून, जोमाने प्रयत्न करून, पहिल्या परीक्षेच्यावेळी झालेल्या चुका टाळून तयारी केल्यास पास होण्याचे चान्सेस खूप वाढतात. शिवाय या कोर्सेसचा अभ्यासच मुळात अतिशय सर्वव्यापक असतो. जिथे अकाउंटिंग, टॅक्सेशन, लॉ, मॅनेजमेंट अशा सर्वच विषयांवर सारखे लक्ष दिलेले असते. त्यामुळे भविष्यात याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. बारावीनंतर ‘बॅफ’ अर्थात ‘बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स’ असाही कोर्स करता येऊ शकतो.


खासगी बँकांमधील नोकरी करता हा कोर्स उपयोगी पडू शकतो. शिवाय बी. कॉम. नंतर बँकेची परीक्षा हा सुद्धा पर्याय उपलब्ध आहेच. बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसर किंवा क्लार्क किंवा अकाउंट्स, लॉ, अ‍ॅग्रिकल्चरसारख्या स्पेशलिस्ट पोस्ट देखील असतात. तेव्हा बी. कॉम. प्लस लॉ किंवा बीकॉम प्लस एमबीए. किंवा सी. ए. सी. डब्ल्यू. ए. सी. एस किंवा चार्टर्ड फाइनान्शियल अनलिस्ट अर्थात सी. एफ. ए. सारख्या शिक्षणाला भरपूर प्रमाणात संधी उपलब्ध असतात. अनेक छोटे मोठे उद्योग, खासगी कंपन्या, कॉर्पोरेट सेक्टर, आय. टी. सेक्टर, पब्लिक अकाउंटिंग फर्म्स, शेर ब्रोकिंग फर्म्स, बँका अशा कितीतरी ठिकाणी संधी उपलब्ध होतात, शिवाय अत्यंत मेहनती, नेतृत्वगुण विद्यार्थ्यांसाठी स्वत:ची फर्म उघडणे हा सुद्धा पर्याय असतोच. बी. कॉम. नंतर मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स फायनान्स, रिटेल मॅनेजमेंट, इंटरनॅशनल ऑपरेशन्स, पब्लिक रिलेशन्स, या आणि अशा कितीतरी विषयांमध्ये स्पेशलायझेशन घेता येते. यासाठी कॅट, अर्थात कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट, मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट सारख्या टेस्ट देणे गरजेचे आहे. तेव्हा बारावीनंतर कॉमर्स घेऊन मुबलक संधी उपलब्ध आहेत.


पदवी मात्र ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, डिस्टेन्स एज्युकेशन कौन्सिल किंवा मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अशी भारत सरकार मान्यताप्राप्त संस्थांची असलेली पाहिजे.


बारावीनंतर ...
बारावीनंतर ‘बॅफ’ अर्थात ‘बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स’ असाही कोर्स करता येऊ शकतो. खासगी बँकांमधील नोकरी करता हा कोर्स उपयोगी पडू शकतो. शिवाय बी. कॉम.नंतर बँकेची परीक्षा हा सुद्धा पर्याय उपलब्ध आहेच.