Home | Magazine | Divya Education | Article On Creativity By Shirin Kulkarni

संगीत, हस्तकौशल्य आणि कल्पकता

शिरीन कुलकर्णी /संचालक, काैन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन, सीसीई, फिनलंड, shirin.kulkarni@ccefinland.org | Update - Jul 29, 2015, 06:34 AM IST

चौसष्ट कला, चौदा विद्यांमध्ये प्रावीण्य मिळवणारी व्यक्ती म्हणजे कुशाग्र बुद्धीमत्ता असलेली व्यक्ती.

  • Article On Creativity By Shirin Kulkarni
    चौसष्ट कला, चौदा विद्यांमध्ये प्रावीण्य मिळवणारी व्यक्ती म्हणजे कुशाग्र बुद्धीमत्ता असलेली व्यक्ती. ही कुशाग्र बुद्धिमत्ता एकाच स्वरूपाची असून चालणारी नाही. कलांमध्ये प्रावीण्य मिळवायचे तर कल्पकता हवीच. या लेखात आपण संगीत आणि हस्तकौशल्यांवर आधारीत कलांचा विचार करूया.

    संगीत ही कला अमूर्त स्वरूपातील आनंद देते. आवाजाचे माध्यम आणि त्यास अभ्यास, बुद्धिमत्ता व मेहनतीची जोड याद्वारे संगीतात प्रावीण्य मिळवता येते. शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणात तर कल्पनाशक्तीचा वापर करण्यास मोठा वाव असतो. शास्त्रीय संगीत गायक अभ्यास, आपल्या कमावलेल्या आवाजाबरोबरच कल्पनाशक्तीच्या सामर्थ्यानेच रसिकांसमोर रागदारी करतो आणि वाहवा मिळवतो. दरबारी कानडा ऐकावा तर पं. भीमसेन जोशींचाच .. हे असे अढळपद मिळवणे तेव्हाच शक्य होते जेव्हा कल्पनाशक्तीच्या जोरावर आपले वेगळेपण आपण दाखवतो. कल्पनाशक्तीचा वापर करून संगीताच्या क्षेत्रात आपले अढळपद निर्माण करणारे कुमार गंधर्व तर अजरामर आहेत. फुप्फुसाच्या व्याधीने ग्रस्त असलेल्या त्यांनी शास्त्रीय संगीतामध्ये नवे विचार आणले व त्याआधारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला नवा आयाम दिला. चित्रपट संगीतात नवे प्रयोग करणारे आर.डी.बर्मन विविध वस्तूंच्या वापराने नवे नाद निर्माण करत व त्यांचा वापर चित्रपटातील संगीतात करत हे आपण जाणतो. आजच्या पिढीतील संगीतकार अजय अतुल यांनी नटरंग, जोगवा अशा चित्रपटातून आपले वेगळेपण समर्थपणे दाखवून दिले आहे. कल्पनाशक्तीचा मुबलक वापर करता येतो तो संगीत दिग्दर्शकाला. परंतु केवळ कल्पनाशक्ती असून उपयोग नाही, तर आपले स्थान निर्माण करण्यासाठी कल्पनाशक्तीला अभ्यास आणि प्रयोगशीलतेची जोड देणे अत्यावश्यक आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी आनंदघन या नावानी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी अजरामर आहेत याचे मुख्य कारण हेच तर आहे.

    संगीताबरोबरच हातानी करता येणा-या कलांबाबतही हेच नियम लागू होतात. विणकाम, भरतकाम, कलाकुसर, चित्रकला, शिल्पकला, मातीकाम, बांबूच्या वस्तू बनवणे, कच-यातून कला निर्मिती आदी अनेक कलांमध्ये कल्पकतेला अनन्यसाधारण महत्व आहे. याचे कारण या कलांच्या माध्यमातून साकारलेले प्रत्येक काम हे वेगळे असेल तरच त्याला प्रेक्षकांच्या दृष्टीने वेगळे मोल मिळेल. जर त्यामध्ये वेगळेपणा, नावीन्य यांचा अभाव असेल तर त्यातील एकसुरीपणा, तोच तो पणा प्रेक्षकांना ताबडतोब खटकेल. कलेचा मुख्य हेतू आनंदनिर्मिती असला तरीही कलाकारांना त्यांची कला हे उदरनिर्वाहाचे साधन असते. त्याचबरोबर कलाकाराला कलेच्या माध्यमातूनच समाजात मानाचे स्थान मिळवणे शक्य होते. त्यामुळेच कलाविष्कार करताना त्यास त्याचे वेगळेपण समर्थपणे दाखवता आले पाहिजे. उदाहरणार्थ, पिकासो किंवा एम.एफ.हुसेन. या दोन्हीही चित्रकारांनी चित्रांच्या माध्यमातून आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले. आज जर कोणी त्यांच्याप्रमाणे चित्र काढण्यात यशस्वी झाला तर ते मोठेपण त्या चित्रकाराचं नसून त्या मुख्य कलाकाराचं आहे. त्यामुळेच आपला ठसा उमटवण्यासाठी आपली कल्पनाशक्ती वापरता आली पाहिजे. हा स्वतःचा स्वतःशी लढा आहे. कलाकाराला जोपर्यंत हा मार्ग सापडत नाही तोपर्यंत त्यास अनेक प्रलोभने खुणावत रहातात. व्यसनं, नैराश्य यास बळी न पडता त्याने ही लढाई लढली पाहिजे. कलेच्या

    { शब्दांकन : मोहिनी घारपुरे-देशमुख

Trending