आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Dialysis Curse Or Blessing By Dr.abhay Joshi

डायलिसिस : शाप की वरदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूत्रपिंड तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी निकामी झाल्यास किडनीचे कार्य कृत्रिमरीत्या करणे म्हणजेच डायलिसिस होय. दररोज डायलिसिस करण्याची आवश्यकता नाही. नियमित स्वरूपात केल्यास दीर्घकालावधीपर्यंत रुग्ण चांगला राहतो. किडनीचे कार्य १० टक्क्यांपेक्षा कमी होते तेव्हा डायलीसिसची आवश्यकता असते.
डायलिसिस कधी करणे आवश्यक आहे
किडनीचे कार्य १० टक्क्यांपेक्षा कमी होणे, शरीरातील पाणी अतिरिक्त होणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, रक्तातील क्षार कमी-जास्त होणे, रक्तातील विषारी घटकांचा कुप्रभाव दिसणे.
डायलिसिस कशाप्रकारे उपयुक्त असते?
*रक्तातील विषारी द्रव्ये फिल्टर करणे.
*शरीरातील अतिरिक्त पाणी काढणे.
*रक्तात जमलेले अॅसिड (आम्ल) बाहेर काढणे.
*रक्तातील सोडियम, पोटॅशियम थोड्या प्रमाणात प्रस्थापित करणे.

डायलिसिसचे प्रकार किती आहेत?
१) हिमोडायलिसिस : यात रक्त आणि विशिष्ट प्रकारचे द्रव्ये कृत्रिम किडनी म्हणजे शुद्धीकरणाची
प्रक्रिया होते.
२) पेरिटोनियल डायलिसिस : यात पोटात विशिष्ट प्रकारची नळी टाकणे. त्यातून क्षारयुक्त द्रव्य टाकून रक्ताचे शुद्धीकरण केले जाते.

हिमोडायलिसिस कशा प्रकारे केले जाते?
*मशीनमध्ये असलेल्या पंपाद्वारे शरीरातून २५०-३०० मिली रक्त प्रत्येक मिनिटाला कृत्रिम किडनी (डायलायझर) मध्ये पाठवले जाते. कृत्रिम किडनीमध्ये एक खास प्रकारचा द्रव पाठवला जातो. यात शुद्ध झालेले रक्त परत शरीरात पाठवले जाते.
*रक्त शरीरातून वेगाने निघण्यासाठी नळीचा किंवा फिस्टुलाचा वापर केला जातो.

हिमोडायलिसिसमुळे नुकसान काय आहे?
१) यासाठी आठवड्यातून तीन वेळा हॉस्पिटलमध्ये जाऊन चार तास हॉस्पिटलमध्ये थांबण्याची गरज असते.
२) ही सुविधा प्रत्येक गावामध्ये उपलब्ध नाही.
३) हेपेटायटिस ‘बी’ व ‘सी’ यासारखे जंतुसंसर्गाचा धोका.
४) प्रत्येकवेळी सुई टाकणे वेदनादायी असते.
५) या प्रक्रियेत शरीरातून पाणी कमी-जास्त होत असल्याने रक्तदाब कमी-जास्त होण्याची शक्यता.

कुठल्या प्रकारचे डायलिसिस रुग्ण जास्त करतात?
पेरिटोनियल डायलिसिस रुग्ण घरी करू शकतात. त्यासाठी पोटात ऑपरेशनद्वारे नळीचे रोपण केले जाते. याचे ट्रेनिंग घेऊन रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक घरच्या घरी डायलिसिस करू शकतात. हिमोडायलिसिस हॉस्पिटलमध्ये किंवा घरी मशीनद्वारे करता येते. यात खर्च पेरिटोनियल डायलिसिस पेक्षा कमी होता.

पेरिटोनियल डायलिसिसचे तोटे काय आहेत?
१) पोटाचा जंतुसंसर्ग (पेरिटोनायटिस) होण्याचा धोका.
२) काही वर्षांनंतर पोटातील पडद्याची क्षमता कमी झाल्याने हिमोडायलिसिसचे अवलंबन करावे लागते.
३) दररोज तीन ते चार वेळा पोटातील द्रव बदलावा लागतो.
किडन्या पूर्णपणे बंद झाल्या तरीदेखील रुग्ण डायलिसिसद्वारे आपली जीवनचर्या चालू ठेवू शकतो. किडनीदान करण्यासाठी ज्यांच्याकडे किडनीदाता नसतो त्यांना डायलिसिस हाच पर्याय उरतो. म्हणून डायलिसिस हे लाखो रुग्णांसाठी वरदानच आहे, यात शंका नाही.
४) पोटामध्ये कायमस्वरूपी नळी व द्रव राहतो.
५) ही प्रक्रिया महागडी आणि जास्त खर्चिक आहे. गरीब रुग्णांना परवडणारी नाही.
हिमोडायलिसिसचे फायदे काय आहेत?
*पेरिटोनियल डायलिसिसपेक्षा खर्च कमी.
*त्वरित व वेगाने उपचार
केला जातो.
*रोज डायलिसिस करण्याची आवश्यकता नाही.
*नेफ्रोल्डॉनिस्ट आणि विशेष स्टाफद्वारा केले जात असल्याने सुरक्षित पद्धती.
*नियमित स्वरूपात केल्यास दीर्घकालावधीपर्यंत रुग्ण चांगला राहतो.
पेरिटोनियल डायलिसिसचे फायदे काय?
*रुग्ण ही प्रक्रिया स्वत:च्या घरीदेखील करू शकतो.
*प्रत्येक प्रक्रिये आधी सुई लावण्याची गरज नसते.
*पाणी आणि जेवणाबद्दलची पथ्ये कमी होतात.
*प्रक्रिया सुरू असताना रुग्ण दैनंदिन कार्य चालू ठेवू शकतो.
डायलिसिसमध्ये रक्त शुद्धीकरणाचा सिद्धांत काय आहे?
हिमोडायलिसिसमध्ये पेशंटचे रक्त आणि डायलायझेट एका पडद्याद्वारे एकमेकांपासून वेगळे केले जाते. विविध घटकांची देवाण-घेवाण या पडद्यातून होत असते. पेरिटोनियल डायलिसिसमध्ये पोटातले पेरिटोनियल मेम्ब्रेन हे पडद्याचे काम करून रक्तातले घटक डायलामसेटमध्ये टाकते.