आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डीएनए व्यक्तीच्या जीवनाचा ब्ल्यू प्रिंटच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीएनए म्हणजे डिआॅक्सिरायबो न्युक्लिक अॅसिड (गुणसूत्र) सर्व सजीवांच्छ पेशीत आढळतो. अतिरेकी जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबुजिंदाल याची ओळख त्याच्या आई-वडीलांच्या डीएनए चाचणीमुळे निश्चित झाली. त्यामुळे या चाचणीला अनन्यसाधारण महत्व आहे. डीएनए ही आयुष्याची ब्ल्यूप्रिंट आहे. प्रत्येक व्यक्तीला जगातील इतर व्यक्तीपासून वेगळे करतो. त्याच्या माध्यमातून स्वत: बद्दलच्या कदाचित तुम्हा आम्हाला माहीत नसलेल्या गोष्टींचा ही शोध घेऊ शकतो.

डीएनए हा एक अनुवंशिक घटक असून तो प्रत्येक सजिवांमध्ये आढळतो, पण प्रत्येकांत तो वेगवेगळा असतो. एकाच प्रकारच्या लोकांच्या डीएनएचा संरचनेचा क्रम एकसारखाच असतो, हा एक जबाबदार अनुवांशिक घटक असून तो व्यक्तीच्या डोळ्यांचा रंग, केसाचा रंग निश्चित करतो. डीएनए दोन भागात विभागलेला असतो.

त्यातील एक भाग पितृपक्ष व दुसरा भाग मातृपक्षातून येतो. हा प्रकारे व्यक्तीच्या जीवनाचा ब्ल्यू प्रिंटच असतो. इंग्लंडच्या लिसेस्टर विद्यापीठाच शास्त्रज्ञ सर अॅलेक जेफरेज यांनी १९८४ मध्ये डीएनए प्रंटचा शोध लावला होता. शरीरात अब्जावधी पेशींच्या क्रिया कलपाची निश्चिती करण्याचे काम डीएनए करतो, असे त्यांनी सांगितले होते. एकाच प्रजातीच्या सदस्यामध्ये ओळखीसाठी या तंत्राचा उपयोग केला जातो. डीएनए चाचणी तंत्रज्ञा अनुवांशिक विज्ञानाने दिलेले वरदान आहे. आॅस्ट्रियाचे शास्त्रज्ञ ग्रेगर जाॅन मेंडेल यांनी अनुवांशिक लक्षणांच्या सिद्धांताचा शोध लावला होता. डीएनए हा स्थिर रसायनिक घटक असून आयुष्यभर एक सारखाच असतो. त्याचा एक निश्चित क्रम असतो. तो रक्ताचा डाग, त्वचा, विर्य, दात, लाळ इत्यादींमधून काढला जाऊ शकतो.

कधी होते चाचणी
*प्रितृत्वाचा शोध - प्रितृत्वाचा शोध लावण्यासाठी डीएनए चाचणी केली जाते. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या मुलाचा बाप मानण्यास नकार देतो तेव्हा ही चाचणी करतात.
*गुन्हा - या चाचणीद्वारे गुन्हेगाराची घटना स्थळावरील उपस्थिती किंवा त्याची भूमिका याचा शोध घेतला जातो. पोलीस या चाचणीचा वापर ख-या गुन्हेगाराला शोधण्यासाठी करतात. मृतदेहाची ओळख करण्यापासून ते दुष्कर्म करणा-याचा गुन्हेगारापयंंत सर्वांचीच ओळख पटवणे या चाचणीमुळे होते.
* प्राचीन संस्कृती - प्राचीन संसक्ृती किंवा समुह याचा शोध लावण्यास होतो. कोणता नमुना कोणत्या युगातील आहे यासाठी याचा उपयोग होतो.
*कृती - शेती वा बाग कामाच्या क्षेत्रात बियाणांचा योग्य प्रजातीचे परिक्षण या चाचणी मुळे होते.
*जीवाश्मिकी - डिएनएच्या माध्यमातून हाडे व जिवाश्माचा ख-या काळाचा शोध लावला होता. * वैद्यकीय- डिएनएचा वापर या क्षेत्रात अनेक प्रकारे केला जातो. यात अनुवांशिक स्थितीचा प्रामुख्याने शोध लावता येतो. यामुळे संभाव्य आजाराचाही शोध घेता येतो.

चाचण्याचे पाच टप्पे :
> सर्व प्रथम ज्या व्यक्तीची डीएनए करायची असते. त्या व्यक्तीचा नमुना घेण्यात येतो. प्रयोग शाळेत नमुन्याद्वारे डीएनए वेगळा करून शुद्धीकरण केले जाते.
> त्यानंतर शुद्ध डीएनए काही विशेष जागेवर, विशेष पद्धतीने कापला जातो. त्यासाठी विशेष रिस्ट्रिक्शन एझाइम कात्रीने काम करतात.
> विखंडित झालेला डीएनए इलेक्ट्रिकचार्जच्या संपर्कात आणला जातो., त्यावर विशेष जेल लावला जातो. या जेलमुळे डीएनए लांबीच्या हिशोबाने वेगळे होतात.
> त्यानंतर डीएनएच्या तुकड्यांचे डी - नॅच्युरेशन केले जाते. यात डीएनएचे दोन्ही तंतू विशेष प्रक्रियेद्वारे वेगळे केले जातात.
> या शेवटच्या टप्प्यात दोन्ही तंतू वेगळे झाल्यावर रेडिओ अॅक्टिव्ह प्रोबच्या मदतीने डीएनएच्या विशेष तुकड्याची ओळख करून घेण्यात येते. फाॅरेन्सिक लॅबमध्ये डीएनए विश्लेषण प्रयोगशाळेत वरील टेस्ट होतात.