आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणसूत्रातील दोष शोधून औषधे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्यामध्ये मतिमंदत्व (डाऊन सिंड्रोम) सारखे आजार हे मातेच्या गर्भामध्येच सुरु झाल्यामुळे त्यावर सुरक्षितता घेण्याचा कुठलाही योग्य मार्ग उपलब्ध नाही, परंतु अशी बालके जन्माला आल्यानंतर त्यांचे संगोपन व आयुष्यभर होणारे त्यांची उपचार, त्यामुळे पालकांवर ती एक आव्हानात्मक जबाबदारी असते. त्यामध्ये उमेदीने कुठलीही, अपराधीपणाची जाणीव न ठेवता ते पूर्ण पार पाडावेच लागते. परंतु होमिओपॅथीमध्ये त्यांचा चांगल्या पध्दतीने उपचार करुन बरीचशी बालके आज ओळखायला येत नाहीत. की त्यांना मतिमंदत्व व गतिमंदत्व आहे.
डाऊन सिंड्रोम
ह्या आजारात जन्माला येणारे बालक काही जास्तीच्या गुणसूत्रांमुळे त्याला हा आजार जडत असतो. मानवी स्वभावाप्रमाणे सर्व गोष्टी जास्त घेण्याची जी प्रवृत्ती असते. ती कधी कधी आयुष्यभर त्रासदायक ठरत असते. डाऊन सिंड्रोम हे त्यामधीलच उदाहरण आहे. ज्यामध्ये गुणसूत्राचे प्रमाण सेहचाळीस (४६) ऐवजी सत्तेचाळीस (४७) म्हणजे एक जास्तीचे गुणसूत्र क्रमांक एकेवीस (२१) असते. त्या जास्तीच्या गुणसूत्रामुळे मतिमंदत्व होऊन बाळ जन्माला येते. मतिमंदत्वाचा प्रतिबंध करणे अवघड आहे, परंतु गर्भाची सोनोग्राफी करीत असताना एनोमीली स्कॅनसारख्या तपासणीमध्ये त्याचे निदान तज्ज्ञ डॉक्टरांकडून होत असते.