आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Electrical Magnetic Wave By Yogesh Kulkarni, Divya Marathi

जुनाट दाहवर परिणामकारक (सायलेंट क्रॉनिक इन्फ्लामेशन) : शरीरात विद्युत चुंबकीय लहरी सोडून उपचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वी माणूस आजारी पडण्याचे किंवा मृत्यू पावण्याचे कारण हे इन्फेक्शन (संसर्ग) असायचे, (जसे कॉलरा, प्लेग, मलेरिया, टायफाइड, टीबी) परंतु आता इन्फेक्शनने आजारी पडण्याच्या प्रमाणापेक्षा इन्फेक्शनने आजारी पडण्याचे प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे. ब-याच वेळेस अनेकजणांना शरीरात असलेले सायलेंट इन्फ्लामेशनमुळे कोणतेही शारीरिक किंवा इतर लक्षणे नसतात, परंतु हेच इन्फ्लामेशन भविष्यात आजार होण्यास कारणीभूत ठरते. क्रॉनिक (जुनाट) इन्फ्लामेशन (दाह) मुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन हृदयाला व मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी पडतो व हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक येतो. जुनाट आजार होण्याची कारणे ही सायलेंट क्रॉनिक इन्फ्लामेशन हेच आहे.


‘इन्फ्लामेशन’च्या द्वारे शरीराचे संरक्षण :
इन्फ्लामेशन (दाह) हे एक प्रकारे शरीराचे संरक्षण करण्यासाठी होत असते. शरीरातील प्रतिकार शक्तींचा रोगांना आळा घालण्यासाठी, शरीरावर हल्ला करणा-या जीवाणू व विषाणूंना निष्प्रभ करण्यासाठी व इतर विषद्रव्यांचा
शरीराच्या पेशींवर होणारा हल्ला परतावून लावण्यासाठी ‘इन्फ्लामेशन’च्या द्वारे शरीराचे संरक्षण केले जाते.
- वारंवारच्या इन्फ्लामेशनमुळे
दुर्धर आजार निर्माण होतात :
परंतु वारंवार होणारे इन्फ्लामेशनमुळे शरीरात अशी अवस्था निर्माण होते की ज्यामुळे अनेक दुर्धर आजार निर्माण होतात जसे कॅन्सर, पार्किन्सन, डायबेटिस, उच्च रक्तदाब, मेंदूचे-हृदयाचे, किडनीचे व इतर अवयवांचे आजार, हाडांची ठिसूळता व हाडांशी निगडित आजार.
- दाह आटोक्यात आणल्यास
आजार होण्याचा धोका कमी होतो :

शरीरातील इन्फ्लामेशन (दाह) आटोक्यात आणल्यास हृदयरोग, पॅरालिसिस, कॅन्सर, टाइप-2 डायबेटिस, ऑटोइम्युन डिसिजेस (जसे संधिवात, मल्टिपल स्केलोसिस आदी) न्युरोलॉजिकल आजार (पार्किन्सन, डिप्रेशन, अल्झायमर, अ‍ॅटेंशन डेफिशिट डिसऑर्डर) तसेच मायग्रेन, आर्थ्रायटिस ह्यांसारखे अनेक आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
- ओंडामेड या विद्युत चुंबकीय
पद्धतीमध्ये शरीराची संपूर्ण तपासणी :

ओंडामेड या विद्युत चुंबकीय पद्धतीमध्ये शरीराची संपूर्ण तपासणी केली जाते. ह्या तपासणीत शरीरात पेशींच्या पातळीवर झालेल्या दुखापती, इजा, जैवद्रव्ये आणि लिम्फवाहिन्यांत निर्माण झालेल्या बाधा, मानसिक धक्क्याने निर्माण झालेल्या सूक्ष्म दुखापती शोधून काढल्या जातात. ओंडामेड उपचार पद्धतीत दुखण्यांच्या या मूळ जागांवर विशिष्ट कंपनक्षमतेच्या विद्युत चुंबकीय लहरी सोडल्या जातात. लहरींची विशिष्ट कंपने या दुखावलेल्या पेशींना आणि ऊतींना सुधारतात, बरे करतात आणि पुनरुज्जीवित करतात. दुखण्याच्या मूळ कारणाच्या जागेवरच अचूक प्रकारे विद्युत चुंबकीय लहरी सोडण्याचे काम केवळ ओंडामेड ही पद्धतच मूळ स्थान शोधून काढते. एकदा हा शोध लागला की ओंडामेड उपकरण अचूक त्या जागेवरच बरोबर लागू पडतील, अशा विद्युत चुंबकीय लहरी सोडून तेथील पेशींना जागृत करते.
- रोग्याचे शरीरच स्वत:वर इलाज सुरू करते :
ओंडामेड उपकरणाने रुग्णाच्या शरीरात सोडलेल्या लहरी दुखण्याच्या मूळ ठिकाणी पोहोचतात. शरीर त्या लहरींना प्रतिसाद देऊ लागते व त्या लहरींच्या कंपनांमुळे इजा झालेल्या ठिकाणी मुक्त इलेक्ट्रॉन व पांढ-या रक्तपेशी आकर्षित होऊ लागतात. अशा रीतीने रोग्याचे शरीरच स्वत:वर इलाज सुरू करते.
औषधे व सप्लिमेंट्सने तात्पुरता आराम, परिणाम संपल्यानंतर मूळ आजाराचा त्रास पुन्हा सुरू, अशा स्थितीत ओंडामेड यंत्राद्वारे उपचार
असे क्रॉनिक इन्फ्लामेशन (जुनाट दाह) आटोक्यात आणण्यासाठी असणारी औषधे व सप्लिमेंट्स ही काही काळापुरतीच परिणामकारक ठरतात. अशा औषधाने रुग्णांस तात्पुरता आराम वाटतो. औषधांचा परिणाम संपल्यानंतर मूळ आजार पुन्हा त्रास देऊ लागतो. अशा परिस्थितीत ओंडामेड या यंत्राद्वारे दिल्या जाणा-या संतुलित विद्युत चुंबकीय लहरी विशेष उपयोगी पडतात आणि आजार बरा करण्यासाठी मदत करतात. कोणत्याही औषधे, ऑपरेशन वा रसायनांचा वापर न करता ओंडामेड ही उपचार पद्धती रोगांवर हळूवारपणे इलाज करते व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या पद्धतीचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. विद्युत चुंबकीय लहरींचा उपचार करताना त्या व्यक्तीस कोणताही त्रास होत नाही. ( उदा. वेदना, आग होणे, गरम होणे असे काहीही होत नाही.)


spectrum@spectrumnashik.com