आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलच्या बातम्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुगल न्यूजची मांडणी News aggregator या संकल्पनेवर आधारित आहे. न्यूज अ‍ॅग्रिगेटर म्हणजे एखाद्या विषयांसंबंधित एकाच ठिकाणी सर्व बातम्या एकत्रित करणे. त्यालाच news reader किंवा RSS feed देखील म्हटले जाते.

गुगल न्यूज जगभरातील ४५०० बातम्यांच्या स्रोतांना दररोज भेट देते. त्यासाठी वेगवेगळ्या व्हर्जन्सचे न्यूज अ‍ॅग्रिगेटर ६० भागांत आणि २८ भाषांत उपलब्ध आहेत. गुगल न्यूज इंग्रजी, अरेबिक, कोरियन, फ्रेंच, जर्मन, हिंदी, मल्याळम, तामीळ, तेलगू, रशियन, टर्किश, स्वीडिश, व्हिएतनामीज अशा अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी २५००० प्रकाशकांकडून हा कंटेंट उपलब्ध होतो. होमपेजवर मोजक्या वाक्यांत (२०० अक्षरांची) मुख्य बातमी असते. त्यावर क्लिक केल्यावर साइटवरच्या पानांवर आपल्याला विस्तृत बातमी वाचता येते. त्यासाठी मुख्य वेबसाइटचे subscription घ्यावेच लागते असे नाही. बहुतेक वेळा या बातम्या मोफत उपलब्ध असतात.

२०११मध्ये गुगल न्यूजच्या तंत्रात आणि डिझाइनमध्ये अनेक अद्ययावत बदल झाले. गुगल न्यूजने सर्चची सोय उपलब्ध केली. त्याचबरोबर तारीख, वेळ, ठिकाण यानुसारही आपल्याला बातम्यांची मांडणी (news sorting) करता येते. वाचकांना ईमेल अलर्टसही लावता येतात. त्यातच विषय, वेळ आणि किती बातम्या दाखवायच्या हे ठरवता येते. गुगलही ‘वाचाव्या अशा बातम्या’ आपल्याला सुचवत असते. जुन्या बातम्या वाचण्याचीही येथे सोय असते.
वाचकहो, आपला वेळ वाचवण्यासाठी या सेवेचा नक्की लाभ घ्या. तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयावरच्या बातम्या, स्थानिक घडामोडी, वैश्विक घडामोडी एका क्लिकवर उपलब्ध आहेत. या बातम्या तुम्ही संगणकाव्यतिरिक्त मोबाइल, टॅब आणि आयपॅडवरही वाचू शकता.