आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकस्मिक मृत्यूंचे मुख्य कारण अचानक हृदयक्रिया बंद पडणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यत: जगभरात होणा-या आकस्मिक मृत्यूंचे मुख्य कारण अचानक हृदयाच्या कार्यात बिघाड होणे किंवा हृदयाचे कार्य बंद पडणे हे असू शकते. यामुळे मेंदूसारख्या शरीराच्या मुख्य अवयवांना रक्त व ऑक्सिजन पुरवठा होत नाही आणि यामुळे या अवयवांना कायमस्वरुपी इजा पोहोचते. मेंदूला होणा-या रक्त व ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे अथवा रक्त व ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे अथवा रक्त व ऑक्सिजन पुरवठा थांबल्यापासून पहिल्या पाच ते सात मिनिटात कायमस्वरुपी अथवा गंभीर इजा पोहोचण्याची शक्यता असते तर आठ ते दाहा मिनिटानंतर मेंदूचे कार्य पूर्णत: थांबून मेंदू मृत्यू पावण्याची शक्यता असते.

१. हृदयकार्यात बिघाड झाल्यास सी.पी.आर प्रणाली अत्यावश्यक
हृदयाच्या कार्यात बिघाड झाल्याने सी.पी.आर या पर्यायी पण अत्यावश्यक कार्यप्रणालीत आवश्यक वैद्यकीय सेवा पोहोचेपर्यंत बाहेरुन हृदयाला मसाज दिला जातो. अत्यावश्यक रुग्णांना त्वरित छातीवर योग्य ठिकाणी व योग्य पध्दतीने दाब (आकंुचन-प्रसरण क्रिया हाताने करणे) सर्वसामान्य प्रशिक्षित व्यक्तीने दिल्याने रुग्णाचे प्राण वाचू शकतात. अशा वेळी त्वरित अत्यावश्यक क्रमांकावर संपूर्क साधून तज्ज्ञांची मदत घ्यावी. या प्रणालीत हृदयाला विजेचा शॉक देण्याचे मशीन-यंत्र व डॉक्टरांची मदत मिळविणे आवश्यक असते.

२.बेसिक लाइफ सपोर्ट प्रणाली
अमेरिकन हार्ट असोसिएशन या संस्थेने प्रौढ (१८ वर्षांवरील) व्यक्तींसाठी टप्प्याटप्प्याने व सोप्या पध्दतीने बेसिक लाईफ सपोर्ट ही प्रणाली सुरु केली आहे. ही जागतिक संघटना २०१० च्या इंटरनॅशनल कॉन्सेन्सस ऑन सीपीआर एण्ड इसीसी यावर आधारलेली आहे. आणि हा या कार्यशाळेचा पाया आहे.

३.चक्कर येऊन बेशुद्ध व्यक्तीसाठीची मदत
चक्कर येऊन बेशुध्द पडलेल्या व्यक्तीचा सर्वात प्रथम खांदा हलवून तुम्ही बरे आहात का, हे विचारुन त्या रुग्णाला प्रतिक्रिया जाणून घ्यावी जर रुग्ण प्रतिसाद देत नसेल, तसेच त्यास श्वसनास त्रास होत असेल किंवा श्वसनक्रिया थांबली असेल तर शक्य तितक्या लवकर संपर्क साधून हृदयाला विजेचा शॉक देण्याचे मशीन -यंत्र व तज्ज्ञांची मदत मागवून घ्यावी.

मसाज देणे आवश्यक
अशा वेळी प्रशिक्षित सर्वसामान्य व्यक्तीने हृदयावर मसाज देणे अत्यावश्यक आहे. मसाज देताना छातीच्या मध्यभागी हाडावर दाब देणे, दाब सोडणे ही क्रिया जोरात व वेगाने करावी.

लक्षात ठेवा
१. दाब देणे व सोडणे याचा वेग एका मिनिटाला शंभर असा असावा.
२. दाब देताना दोन इंच (५ सें.मी.) आतपर्यंत द्यावा.
>अशाप्रकारे दाब देताना वेग व दाबाची सखोलता ही समान असावी. तसेच ही प्रक्रिया श्वसन-हृदय यांचे कार्य बहुतांशी पूर्वपदावर येईपर्यंत करणे आवश्यक आहे.
>मसाजमुळे रक्त पुरवठा सुरळीत होतो : छातीवर मसाज करताना हृदयाच्या आणि पाठीतल्या हाडांच्यामध्ये हृदय दाबले जाते. आणि रक्त हे शरीरातल्या मुख्य अवयवंाकडे जाते. तसेच प्रत्येकवेळी दाबण्याच्या आधी जेव्हा आपण छातीवरचा दाब सोडतो त्यावेळी हृदय संघटित करते, जे पुढच्या मसाजच्यावेळी प्रवाहित होते.
>अशाप्रकारे मसाज व दाब दिल्यामुळे हृदयाला व मेंदूला रक्त व ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.
>प्रशिक्षित व्यक्तीने वैद्यकीय मदत मिळेपर्यंत ही सी.पी.आर. प्रणाली (छातीचा मसाज व छातीवर दाब देणे) चालू ठेवावी. जर तज्ज्ञाकडून बाहेरुन छातीला विजेचा शॉक देणारे मशीन-यंत्र उपलब्ध झाले तर त्याद्वारे योग्य मार्गदर्शनाखाली व सूचनांचे पालन करुन छातीला विजेचा शॉक देता येतो.