आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरातील उष्णता डोळ्यास अहितकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोळ्यांचा आकार गोस्तनाकृती म्हणजेच लंबगोलाकार असा सांगितलेला आहे. शिरोस्थीच्या अस्थियुक्त खोवणीतून बाहेर असलेला डोळ्यांचा समोरचा जो भाग गोलाकार असा दिसतो व उत्तरोत्तर खोवणीत निमूळता असा होत जातो. त्यामुळेच या डोळ्यास गोस्तनाकृती असे म्हटले आहे. या डोळ्यांचा आकार दोन अंगुली प्रमाणात आहे.

डोळ्यांद्वारे प्रकाशाचे ज्ञान होते हे आपणास माहीत आहे, पण हे ज्ञान प्रकाश संवेदना (लाइट सेन्स), आकार संवेदना (फाॅर्म सेन्स) व वर्ण संवेदना (कलर सेन्स) या तीन प्रकारचे असते. डोळ्यातील (फोटो केमिकल) रासायनिक बदलामुळे हे ज्ञान नाडी सूत्रामार्फत मेंदूपर्यंत पोहोचवले जाते. हे ज्ञान पोहोचवण्याचे महत कर्य दृष्टीनाडी करते. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या जटिल व गुंतागुंतीने हे नाजूक डोळे निर्माण झालेले असतात.
त्यामुळे डोळ्यांचे रक्षण हे आपण तेवढ्याच तत्परतेने करणे गरजेचे आहे.
कालज हेतूमध्ये मनुष्याचे बाल, तरुण व वार्धक्य अवस्था या डाेळ्यांच्या ठराविक आजारास कारणीभूत ठरतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू देखील डोळ्यांना अपाय करू शकतात. तसेच ऋतू ऋतूमधील विषमता उदा. उन्हाळ्यात ऊन न पडता पाऊस पडणे या तत्काळ हवामान बदलामुळेही डोळ्यांचे विकार होताना दिसतात. तसेच डोळ्यांचे काही आजार वार्धक्यात उद्भवतात. यात अपक्रांतीजन्य डोळ्यांचा ऱ्हास (डिजनरेटिव्ह) पाहायला मिळतो. तसेच प्रौढदृष्टी (प्रेस बायोपिआ) या विकारात मनुष्यास बारीक अक्षर वाचता न येणे वा सुईचा दोरा सुईत ओवता न येणे हे लक्षण पाहायला मिळते. हा दृष्टिदोष ठराविक नंबरचा चष्मा वापरल्याने कमी होतो.

डोळ्याला यांत्रिक व रासायनिक अपघात होतो. यात जेव्हा डोळ्यास यांत्रिक अपघात (मेकॅनिकल ट्रामा) होतो, तेव्हा डोळ्यास सौम्य अथवा गंभीर स्वरुपाची दुखापत होऊ शकते, तर रासायनिक द्रव्याच्या (chemical) संपर्काने डोळ्यास क्षोभासारख्या लक्षणापासून ते गंभीर दृष्टिहानीची लक्षणे पाहायला मिळतात. अशा प्रकारच्या अपघातात संरक्षणात्मक उपाय करणे व तातडीची चिकित्सा ही डोळ्यांच्या डाॅक्टरांना दाखवून करणे गरजेचे
असते. त्यात डोळ्यांचे अनेक अंधत्व येते. ग्लुकोमा, मोतीबंदू, काचबिंदू व मधुमेहामुळे डोळ्यांच्या मागच्या पटलावर होणारे आजार हे होत. लहान मुलांमध्ये वेळीच तपासणी न केल्यामुळे व चष्मा न वापरल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपाचे अंधत्व येते. सध्याच्या काळात विकसित तंत्रज्ञानामुळे सतत प्रकाशाच्या सान्निध्यात राहणे, यात लहान मुले काॅम्प्युटर व मोबाइल सोबत खेळत असतात. त्यामुळे त्यांचे जेवणाकडेही व परिपूर्ण आहार (व्हिटॅमिन युक्त आहार) याकडे लक्ष नसते. लहान मुलांत आवडीचे पदार्थ म्हणजे, चाॅकलेट, बेकरीचे पदार्थ, नुडल्स, पिझ्झा व इतर चमचमीत पदार्थ सेवनाने त्यांचे आरोग्य व डोळ्यांचे सौष्ठव कमी होताना दिसते. त्यामुळे त्यांना लहान वयात डोळ्यांचा नंबर वाढत आहे. त्यामुळे
परदेशातही आता टीव्हीमुक्त रविवार ही संकल्पना अस्तित्वात आली आहे.

डोळ्यांत पाच मंडले
डोळ्यांमध्ये प्रामुख्याने पाच मंडले असतात. यात पक्ष्ममंडल (आयलॅशेस), वर्त्ममंडल (आयलिडस), शुक्लमंडल (स्क्लेरोटीक सर्क्युलर मार्जिन), कृष्णमंडल (उवेल व काॅरर्नीअल एरिया) व दृष्टीमंडल (प्युपीलरी सर्क्यूलर एरिया) हे मोडतात. तसेच डोळ्याच्या सभोवती नेत्रपेशी ह्या लागलेल्या असतात. त्या डोळ्याला स्थिर ठेवणे, डोळ्यांचे चालन करणे इत्यादी कामे करतात. या पेशीमुळेच आपण डोळे फिरवून अपेक्षित दृश्य सहजपणे पाहू
शकतो.

नेत्रपटलांच्या विश्रांतीसाठी पाळा टीव्हीमुक्त दिवस
टीव्हीमुक्त दिवस म्हणजे यात निसर्ग सान्निध्यात वेळ घालवणे त्या दिवशी कोणताही मोबाइल काॅल न घेणे व आपला वेळ कुटुंबासाठी देणे. या गोष्टी केल्या जातात. अशा प्रकारे आपल्या देशातही शरीर व डोळ्यांच्या सुदृढतेसाठी टीव्हीमुक्त दिवस पाळावा, शरीर व डोळ्यांचे आरोग्य जोपासावे. संतुलित आहार व निसर्गसान्निध्य डोळ्यांसाठी हितकर आहे.
आहारजभावामध्ये : पचायला जड असणारा (गुरू) असा आहार, आंबट पदार्थाचे सेवन, उष्ण मसालेयुक्त पदार्थ, मादक पदार्थ, मद्यपान अशा प्रकारच्या आहारीय सेवन व व्यसनामुळे शरीरात उष्णता निर्माण होते व ती डोळ्यास अहितकर ठरते. विहारजभावामध्ये : उन्हात फिरणे, डोळ्याला चष्मा न लावणे, वाहनातून प्रवास, दूरच्या वस्तू अधिक काळ पाहणे, काम करणे जसे -काॅम्प्युटरवर सतत काम करणे, टीव्ही पाहणे, मोबाइलचा अत्याधिक वापर करणे हे होत. सूक्ष्म वस्तूंचे अतिप्रमाणात निरीक्षण करणे हे एक कारण तसेच अत्याधिक वाचन करणे, रात्री जागरण करणे, अतिक्रोध करणे, वेळेवर मल, मूत्र विसर्जन न करणे, यंत्रावर वा गरमभट्टीजवळ काम करणे, अधिक धूळ, धुराच्या जवळ राहणे, डोळ्याला गरम वाफ लागणे, डोळ्यावर आघात होणे, ही कारणे डोळ्यांसाठी कारणीभूत ठरतात.