आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉस्पिटल व्यवस्थापन 21 व्या शतकातील अनिवार्य गरज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही वर्षांपूर्वी हॉस्पिटल चालवणे म्हणजे ‘एक खांबी तंबू आणि जंगी शिकारखाना’ अशी अवस्था होती. सरकारी रुग्णालयात वा मोठ्या म्हणजे 25-40 बेडच्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या मालकालाच नर्सच्या रजेपासून बँडेज खरेदीपर्यंत सर्व गोष्टी अगदी बिले बनवणे, पैसे घेणे, बँकेत जाणे हे सगळे करावे लागे. काळ बदलला. ‘जनरल प्रॅक्टिशनर’ वर्ग विसर्जित झाला. एकट्या कॅन्सलटंटने चालवलेली 10-20 बेडची हॉस्पिटल्स बंद पडू लागली.


पूर्वी सलाइनवर ठेवले म्हणजे काहीतरी सिरियस आहे, असे समजणारा रुग्ण हल्ली 50 च्या पुढचा असेल तर मागच्या महिन्यातच अँजियोप्लास्टी, बायपास करून घेतली असे कॅज्युअली सांगतो. त्यात थोडासा अभिमानही असतो इतपत रुग्णांची मानसिकता बदलली आहे. बघता बघता छोटी सबकुछ सेवा देणारी from womb to tomb 10-20 बेड्सची हॉस्पिटल मॅनेजमेंटमधील पुस्तकामधील henceform less than 100 beded hospitals wont survive ही गोष्ट हेरून कंपन्या खासगी व्यक्ती, संख्या आणि सुपरस्पेशालिटी डॉक्टरांचे ग्रुप्स या उद्योगात उतरले. ही गोष्ट चांगली की वाईट या विषयात न जाता पेशंट्स डॉक्टरर्स यांनी ही वस्तुस्थिती स्वीकारली आहे. त्यामुळे corporate hospital संस्कृती महानगरातच काय, पण जिल्हापातळीवरही वेगाने पोहोचली आहे. मॉलमधील सेलप्रमाणे निरनिराळ्या पॅकेजेसद्वारे रुग्णांना आकर्षित केली जात आहे. वेगाने वाढणा-या या इंडस्ट्रीकडून रुग्णांच्या अपेक्षा वाढल्या. त्यामुळे हॉस्पिटलने आपली संरचना बदलली. सर्व बाबतीत quality हा जा परवलीचा suvvival चा मूळमंत्र आला आहे तो देण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. हॉस्पिटल प्रोफेशनली चालवणे, नवीन नवीन तंत्रज्ञानाची उपलब्धता एका छताखाली उपलब्ध करून देणे अनिवार्य झाले आहे. कारण इतर इंडस्ट्रीमध्ये नसलेली लॅँड प्रॉडक्ट या इंडस्ट्रीमध्ये आहे. ती म्हणजे sevvice सेवा उत्कृष्ट सेवा मिळणे त्यामुळे या सर्व गोष्टींचे नियोजन करण्याची गरज अनिवार्य झाली आहे.

हॉस्पिटल व्यवस्थापनात मूलभूत व्यवस्थापनाखेरीज मटेरियल मॅनेजमेंट ह्युमन रिसोर्स, फायनान्स, इमर्जन्सी सेवा बाह्य रुग्ण विभाग, नर्सिंग लॅब, डायग्नोस्टिक विभाग ओटीआयसीयू उलट महत्त्वाची, पण दुर्लक्षित हॉस्पिटल कचरा विल्हेवाट नियोजन सेंट्रल स्टरलायझेशन जनसंपर्कापासून मार्केटिंगपर्यंतच्या सेवांचा अंतर्भाव होतो. सर्व रुग्णालयात उपलब्ध सोयी सारख्या असल्या तरी या स्पर्धेमध्ये हॉस्पिटल इन्फर्मेटात सिस्टिम आणि क्वालिटी ऑफ सर्व्हिस यामध्ये अग्रेसर राहणारी कॉर्पोरेट वा मोठी ररुग्णालयेच स्पर्धेमध्ये तग धरू शकतील. अगदी साधे उदाहरण द्यायचे म्हटले तर बाह्य रुग्ण विभागात रुग्णाला तपासणी होण्यासाठी किती वेळ ताटकळत बसावे लागते. इथपासून तातडीची सेवा किती तातडीने दखल घेऊन मिळते याचा बोलबाला होत असतो. कारण शेवटी येणारा रुग्ण हा आता त्याचे पैसे गलथान हॉस्पिटल व्यवस्थापनावर खर्च करणार नाही. कारण हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी त्यानेही वेळेचे नियोजन केलेले असते. म्हणून हॉस्पिटलमधील तांत्रिक सुविधा, उत्कृष्ट डॉक्टरर्स व सेवकवर्ग, स्टार हॉटेलटाइप hospitality यांचे उत्कृष्ट व्यवस्थापन असेल तरच ते रिक्त युनिट होणार नाही. म्हणूनच कॉर्पोरेट, हॉस्पिटलपासून जिल्हा पातळीवरील, मल्टिस्पेशालिटी रुग्णालयापर्यंत कार्यक्षम हॉस्पिटल व्यवस्थापन विभाग अनुभवी व प्रशिक्षित हॉस्पिटल व्यवस्थापनाकडे सोपवणे अपरिहार्य झाली आहे. करिअर निवडताना हॉस्पिटल व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या नवीन संधी म्हणून वैद्यकीय पदवीधारकांनी जरूर विचार करावा.