आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वंध्यत्व : लवकर निर्णय घ्यायला हवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वंध्यत्व म्हणजे एखाद्या जोडप्याने सतत एक वर्ष सोबत राहून कुठल्याही गर्भनिरोधकाचा वापर न करता आठवड्यातून किमान दोन वेळेस शरीरसंबंध ठेवूनसुद्धा गर्भधारणा झाली नसल्यास त्या वंध्यत्व आहे, असे म्हणता येईल. आजच्या धकाधकीच्या जीवनात पती व पत्नी दोघेही काम किंवा नोकरी करतात ज्यामुळे खूप मानसिक ताण-तणाव असू शकतो तो तुमच्या वंधत्वाचेदेखील कारण असू शकतो. आजकालच्या पिढीत उशिरा लग्न होणे नेहमीचे झाले आहे. करिअर करायच्या नादात लग्नाला किंवा गर्भावस्थेला नकार दिला जातो ते कधी कधी धोकादायक ठरू शकते. कारण महिलांचे वय वाढल्यास वंध्यत्वाचा धोका अधिक असतो.

- सध्या जंक फुडचा प्रभाव व व्यायामाचा अभाव त्यामुळे वजन वाढीचे प्रमाण खूप आहे. वाढीव वजन गर्भधारणेला अडसर ठरू शकतो. सिगारेट, दारू किंवा तंबाखू कुठल्याही जोडीदारीची सवय असल्यास गर्भधारणेला अडचण येऊ शकते.

- ब-याच लोकांचा गैरसमज असतो की मला आधी एक मूल आहे. दुसरे होण्यास काहीच प्रॉब्लेम नाही. काहीअंशी हे बरोबर पण आहे. परंतु महिलेचे वय वाढत गेल्यास दुस-या वेळी गर्भधारणेला अडचण निर्माण होऊ शकते.

अत्याधुनिक उपचार
अत्याधुनिक उपचार पद्धती म्हणजेच टेस्ट ट्युब बेबी होय. याबद्द्ल आपण थोडे समजावून घेऊ. अजूनही भारतीय समाज व्यवस्थेत टेस्ट ट्युब बेबी ही उपचार प्रणाली मोठ्या प्रमाणात स्वीकारल्या जात नाही. परंतु आपणास हे माहीत आहे का भारतातील प्राचीन काळात ऋषी मुनींना ही प्रणाली परिचित होती. महाभारतात त्याचे दाखले मिळतात. टेस्ट ट्युब बेबी कोणामध्ये करावी हे आधी समजून घेऊ : - १. पुरुषांमध्ये शुक्रजंतूंचे प्रमाण खूपच कमी असल्यास, तसेच शुक्रजंतूंची शक्ती कमी असल्यास. २. शुक्रजंतू विर्यात अजिबात नसल्यास. ३. महिलांचे वय जास्त असल्यास किंवा त्यांच्या दोन्ही गर्भनलिका बंद असल्यास. ४. गर्भाशय नळ्या अंडाशय एकमेकांना चिकटलेले असल्यास. ५. खूप वेळा आय. यू. आय. (कृत्रिम बीजारोपण) करूनदेखील गर्भ न राहिल्यास.

गैरसमज, हा शेवटचा प्रयोग नव्हे
टेस्ट ट्युब बेबी सर्वात शेवटचा प्रयोग आहे असा गैरसमज लोकांच्या मनात असतो. परंतु असे नाही. वंध्यत्वाची काही कारणे अशी आहेत की ज्यामध्ये टेस्ट ट्युब बेबी हा एकच पर्याय उरतो. उदा - महिलांच्या दोन्ही नळ्या बंद असल्यास खूप उशिरा निर्णय घेतल्यास यशस्वी होण्याची शक्यता कमी होते.ह्या तंत्रज्ञानाद्वारे जन्माला आलेली मुले तुमच्या आमच्या सारखीच असतात. जगात ह्या तंत्रज्ञानाद्वारे जन्माला आलेली मुले कितीतरी उच्च पदावर कार्यरत आहेत. टेस्ट ट्युब बेबी केल्यास यशस्वी होण्याचा दर अंदाजे ५० टक्क्यांपर्यंत जातो.