आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Knee Pain By Dr. Sunil Sonar, Divya Marathi

आता गुडघ्याचे दुखणे फार सहन करायची गरज नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया भारतात ब-याच मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला ह्या सांध्याचे कोणते प्रकार असतात, हे माहिती पाहिजेच. सर्व आयुष्य कष्टात गेल्यावर, मुला - मुलींचे संसार सुरू करून दिल्यावर थोडीशी मानसिक शांतता मिळते तोच गुडघेदुखी मागे लागते.

चालणे, जिने चढणे, उतरणे अवघड होते. काही दिवसांनी बसलेले, झोपलेले असतानादेखील गुडघे दुखू लागतात. आता शस्त्रक्रियांच्या पद्धती, उपलब्ध असणारे कृत्रिम सांधे, ऑपरेशन थिएटर्स आणि अँटिबायोटिक्स हे इतके विकसित झाले आहे की, आपण हे वय वेदनांमध्ये काढण्याची गरज नाही. ५० ते ७० वयाच्या काळात नातवांचे वाढदिवस, समारंभ, छोट्या ट्रिप्स , देवस्थानांचे दर्शन करण्यास वेळ व आनंद मिळतो. मग तो वाया का घालवायचा?
७५ ते ८० वर्षांपर्यंत दुखणे अंगावर काढून मग नाइलाजाने ऑपरेशन करायचे ? ८० वर्षांनंतर कोणते जगणे शिल्लक राहते ?

सब व्हास्ट‌्स अ‍ॅप्रोच :
गुडघ्याचे कृत्रिम सांधेरोपण करतात, मांडीचा स्नायू क्वाड्रीसेफ न कापतादेखील ऑपरेशन करता येतात. ह्या पद्धतीला सब व्हास्ट‌्स अ‍ॅप्रोच असे म्हणतात. ह्यामध्ये हा स्नायू कट न करता वर उचकविला जातो व बाजूला करून ऑपरेशन केले जाते. त्यामुळे तुमच्या मांडीची ताकद पूर्णत: जशीच्या तशी राहातेच, पण तुम्ही दुस-या/तिस-या दिवशी पाय-या चढू शकता. वाॅकर घेण्याचीही गरज नाही. फिजिओथेरपीसाठी खर्च होणारे हजारो रुपये, जाणे, येणे, दुखणे इ. त्रासही वाचतात.

गुडघ्याच्या कृत्रिम सांध्याचे प्रकार
१. ऑलपॉली - म्हणजे घर्षण टाळणारा प्लास्टिकचा पार्ट डायरेक्ट हाडाला चिकटवलेला असतो. याची किंमत असते. पण खूप ठिसूळ हाडांत हा लावणे टाळावे लागते.
२. मेटल बॅक - प्लास्टिकच्या पार्टखाली मेटल प्लेटचा आधार असतो. फक्त प्लास्टिकचा पार्ट खराब झाल्यास व इतर कारणाने बदलावयाची वेळ आल्यास सर्व पार्ट‌्स बाहेर न काढता प्लास्टिक बदलता येते.
३. हाय फ्लेक्स - नेहमीचा सांधा १०० ते ११० डिग्री वाकतो. १४० ते १५० वाकणा-या सांध्यास हाय फ्लेक्स म्हणतात.
४. रोटेटिंग प्लॅटफॉर्म - हा सांधा आतल्या आत फिरू शकतो.
५. constrained joint / लायनर - ह्यामध्ये सांध्याची थोडी कमी करून त्याला अिधक घट्टपणा दिलेला असतो. स्नायू, लिंगामेंटस् , हाड, सांधा ह्यात भक्कमपणा नसल्यास हे कृत्रिम सांधे वापरता येतात. काहीवेळा त्याला एक्सटेंशन स्टेमही जोडावे लागते. ६. कोबाल्ट क्रोमीदम - संपूर्ण सांधा वा फक्त वरचा पार्ट कोबाल्ट क्रोमीयमचा असतो.
७.ऑक्झिनियमचा सांधा- सिरॅमाइज्ड मेटल ह्या प्रकारचा सांधा असतो. हा ३० ते ३५ वर्षेदेखील टिकतो. ह्यांचे घर्षण होण्याची प्रवृती कमी असते. ८. प्लास्टिक - यात वापरला जाणारा प्लास्टिकचा पार्ट हा काहीवेळा क्राॅस लिंक्ड तंतूनी बनवला असतो. ह्यास highly cross-linked poly असे म्हणतात. ९. भारतीय-परदेशी सांध्याप्रमाणे भारतीय सांधेदेखील उपलब्ध आहे. कृत्रिम सांधे रोपणानंतर आपले ८० टक्के ते १०० टक्के दुखणे १० ते ३० वर्षाकरिता (सांध्याच्या प्रकारानुसार) निघून जाते. आपण पाय-या, जिने चढू शकता.
आजकाल ऑपरेशन थिएटरमध्ये असलेले इपॉक्सी कोटिंग, लॅमिनार फ्लो, हाय प्रेशर एअर फ्लो, अतिशय प्रभावी औषधे, डायबेटिससारख्या आजारावर उत्तम कंट्रोल ह्यामुळे इन्फेक्शनचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. म्हणून फार दुखणे सहन करायची आता गरज नाही.