आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Listening By Smita Kelkar, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एज्यु कॉर्नर: सुपाएवढे ऐका...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या सुपाएवढ्या कानांनी गणपतीबाप्पा आपल्याला सांगत असतो की, जास्तीत जास्त ऐका. आपले कान तीक्ष्ण ठेवून जी काही माहिती, जे काही ज्ञान मिळते ते ऐकून आत्मसात करा. कारण तुम्ही जेवढे ऐकाल तेवढेच तुमचे ज्ञान दुणावेल.

गणपतीबाप्पांनी आपल्याला कान दिलेले आहेत दोन. तोंड मात्र दिले आहे एकच. ते याकरिता की आपण कानाचा उपयोग जास्तीत जास्त केला पाहिजे. परंतु आपण करतो मात्र याच्या अगदी विरुद्ध आपल्याला ऐकण्यापेक्षा, बोलायला फार जास्त आवडते. आपण जर प्रत्येक वेळी बोलतच राहिलो तर इतरांचे ऐकून जे ज्ञान आपल्याला मिळू शकते त्याला मात्र आपण मुकत असतो. म्हणून योग्य वेळीच योग्य ते बोलण्याची सवय जोपासणे जरुरीचे आहे. ऐकणे हे अगदी सर्वांनाच कंटाळवाणे वाटत असते. त्यामुळे अर्धवट ऐकण्याची सवय आपल्याला लागलेली असते. त्यातूनच पुढे मग निरनिराळ्या समस्या उद्भवत जातात. जवळजवळ सर्वच या समस्येचे बळी झालेले आढळून येतात. सवयीप्रमाणे अर्धवट ऐकून आपल्याला सर्व काही समजले आहे, अशी विद्यार्थ्यांची समजूत झालेली असल्यामुळे ते शिक्षकांचे अर्धवट ऐकतात. त्यामुळे तो विषयही त्यांना अर्थवटच समजते. हीच समस्या कॉर्पोरेट जगतातही निर्माण झालेली आहे. ग्राहकांचे गा-हाणे सखोल न समजत वरवर ऐकूनच, वरवर निराकारण केले जात असल्याचे आढळून येते. ब-याच वेळा तर ग्राहकांची समस्या एकच असते ती म्हणजे अजूनपर्यंत त्यांचे म्हणणे कोणीही नीट ऐकून न घेण्याची. त्यामुळेच ग्राहकांमध्ये असंतुष्टता वाढीस आलेली दिसून येते. याचकरिता विविध कंपन्या कॉल सेंटर यांमध्ये Listening Skill म्हणजेच ऐकण्याचे कौशल्य या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमाद्वारे ऐकण्याचे महत्त्व व हे कौशल्य संपादन केल्यामुळे आपल्या जीवनात कोणते सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. याची मा‍हिती पुरवली जाते. तेव्हा ऐकण्याची कला आजच्या कॉर्पोरेट जगात आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. यामुळे आपला वैयक्तिक विकास तर घडून येतोच, पण त्याचबरोबर आपल्या करिअर जीवनाचाही विकास घडतो. ज्यांनी ऐकण्याची कला अंगी जोपासलेली आहे, नक्कीच त्यांना याची मधुर फळे चाखायला मिळालेली आहेत.
गणपतीबाप्पा मोरया।
ध्यान देओनि ऐकूया।।
निर्धार करा
> ऐकण्याची कला आत्मसात करण्यासाठी आवश्यक असतो तो धीर व चिकाटीपणा. तुमच्यामध्ये असा धीर नसेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट व्यवस्थित ऐकू शकत नाही.
> Hear आणि Listen यामध्येही फरक असतो. hear म्हणजे अर्थ न समजता नुसते वरवर ऐकणे. आणि Listen म्हणजे समोरची व्यक्ती जे बोलत आहे त्याचा सखोल अर्थ समजून घेणे. संपूर्ण ध्यान देऊन ऐकणे. तेव्हा Listening skill संपादित करा तेव्हा गणपतीबाप्पापुढे निर्धार करा की, आजपासून मी सुपाएवढे ऐकणार.