माझं वय आज रोजी ८३ वर्षांचे आहे. गांधीनगरमध्ये २४ वर्षांच्या सेवाकाला दरम्यान एम.ए, पदिवका वाणिज्य आदी पदव्या स्वखर्चाने संपादन केल्या. सेवाकालामध्ये कधीही नेहरूनगर दवाखानयात दाखल झाले नाही २४ वर्षांच्या कालावधीनंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन आजपावेतो २६ वर्षे पेन्शन घेत आलो आहे. त्यानंतर नाशिक कोर्टात २० वर्षे वकिलीचा व्यवसाय केला. तसेच दहा वर्षे कला वाणिज्य व लॉचे क्लासेस चालवले. माझे काही विद्यार्थी नाशिक, पुणे, औरंगाबाद येथे उत्तमपणे वकिलीचा व्यवसाय करीत आहेत. वयाच्या मानाने माझे स्वास्थ्य उत्तम आहे. शरीरप्रकृती सुदृढ आहे. तथा प्रत्येक अवयव साधारण आहे. कोणताही गंभीर आजार नाही. अजूनही कामाचा उत्साह आहे.
आरोग्याचे रहस्य-
तारुण्यापासून उत्तम प्रतिकारशक्ती, कामाचा दांडगा उत्साह, ध्येयवादी, युनिव्हर्सल ओ ग्रुप, क्लासच्या निमित्ताने नाशिक रोड ते महालक्ष्मी थिएटरपर्यंत दररोज दहा किलोमीटर सायकल प्रवास, संपूर्ण निर्व्यसनी, शुद्ध आहार, प्रतिबंधक औषधांचा योग्य वापर, वर्षातून एकदा सोनोग्राफी २-डी सारखी वैद्यकीय तपासणीचे नॉर्मल रिपोर्ट, गरम पाण्याचे प्राशन, आयुर्वेदाचा अभ्यास, योगासने, वाचन-मनन व आचरण या सर्व गोष्टींमुळे मला स्वास्थ्य लाभले असावे.
( छायाचित्र : अॅड. नागू सोनू जावळे)