आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकांची नोंद: राजयोगी नेता अटलबिहारी वाजपेयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यक्तिमत्त्वात दोन परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वं चपखलपणे सामावून गेलेली आहेत. किशोर वयापासून विविध चळवळींत स्वत:ला झोकून देत आलेले ते एक योद्धे आहेत, आणि प्रत्येक दु:खद घटनेनं व्याकूळ होणारे कवीही आहेत...
५० वर्षांहून अधिक काळ ते सक्रिय राजकारणात आहेत; पण तरीही एखाद्या कमलपत्राप्रमाणं राजकारणापासून अलिप्तही आहेत...
ते दर्जेदार विनोदी कोट्या करण्यात तरबेज आहेत आणि त्याचबरोबबर अत्यंत भावगर्भ असं मूलभूत चिंतन मांडणारे तत्त्ववेत्तेही आहेत...
‘हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय’ असं म्हणणारे, कट्टर संघ स्वयंसेवक आणि प्रखर हिंदुत्ववादीही आहेत; आणि मुसलमानांना, पाकिस्तानलाही मान्य होणारे कट्टर मानवतावादीही आहेत...
जाती-धर्म-पक्ष अशा सा-याच भेदांच्या पलीकडे जाऊन देश-विदेशात अमाप लोकप्रियता मिळवलेल्या एका राजयोग्याचा हा सर्वांगीण मनोज्ञ वेध.

राजयोगी नेता अटलबिहारी वाजपेयी
*लेखिका : जयश्री देसाई
*प्रकाशक : मैत्रेय प्रकाशन
* मूल्य : ~ २००/-
वारुळ पुराण
जगातला सर्वात थोर कीटकशास्त्रज्ञ लिहितो आहे एक कादंबरी, पहिली पातळी वारुळाची, दुसरी त्याचा अभ्यास करणा-या शास्त्रज्ञाची, तिसरी संपूर्ण जीवसृष्टीची, माणसाला त्याची जागा दाखवून देणारी. या कादंबरीच्या संक्षिप्त भाषांतराच्या निमित्ताने लिहितो आहे भारतातला अग्रगण्य परिसरशास्त्रज्ञ.
कादंबरीतल्या ‘तिहेरी’पणाला समांतर एक ‘तिपेडी’; जनुक, स्मरूक आणि निर्मुक. आणि ही एक मर्मदृष्टी झाली. सर्व जीवसृष्टीची जडणघडण तपासत, पोत तपासत निसर्ग आणि मानव यांच्या संबंधाची समृद्ध, सर्वंकष पाहणीही इथं भेटेल, श्रीमंत, प्रासादिक भाषेतून.
वारूळ पुराण
सातेरीचा वाडा झाला चिरेबंदी : माधव गाडगीळ
उदंड वारुळे जाहली! : ई. ओ. विल्सन
*संक्षिप्त अनुवाद : नंदा खरे
*प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
*मूल्य : ~ २५०/-