आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लर्ब: मराठी कादंबरीचे प्रारंभिक वळण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मराठी कादंबरीचे प्रारंभिक वळण’ या ग्रंथात मराठी कादंबरीचा उगम या सांस्कृतिक वस्तुस्थितीची अपूर्णमित संकल्पनेच्या आधारे मीमांसा केली आहे. तसंच तिचं प्रारंभीच्या काळातलं रूप समजून घेण्याचं आव्हान १९व्या शतकातल्या लुप्तप्राय झालेल्या १३५ कादंब-यांच्या साहाय्याने पेललं आहे. १९व्या शतकातल्या सुशिक्षितांप्रमाणेच तत्कालीन कादंबरीही साम्राज्यवादी व राष्ट्रवादी या दोन विरोधी भूमिकांमध्ये आंदोलत होती. या ग्रंथात या भूमिकांना अनुसरून तिच्या रूपाचं वस्तुनिष्ठपणे आणि बारकाव्यांसह विवेचन केलं आहे.
त्यामुळे हे विवेचन साहित्याच्या अभ्यासाला नक्कीच नवी दिशा देईल. एक ऐतिहासिक भाष्य आणि दुर्मिळ दस्तऐवज म्हणून या ग्रंथाचं महत्त्व आहेच, पण सध्याच्या काळातल्या साहित्याच्या संशोधकांसाठीसुद्धा हा एक उत्तम संदर्भग्रंथ आहे.