आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बागुलबुवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी मिसेस अमुक तमुक. वय वर्षे ४२. म्हणजे नुकतीच चाळिशी ओलांडलेली. अगदी १७ वर्षे पूर्ण झालेल्या युवतीसारखीच, पण वेगळ्या प्रकारच्या हार्मोन्सच्या बदलाला तोंड देत समर्थपणे उभे राहण्याचा प्रयत्न करणारी मी एक िमसेस अमुक तमुक. भावनांच्या वादळांना तर कायमच तोंड द्यावे लागते. माझे मलाच कळत नाही, मी अशी इतकी विचित्र का वागते आहे. एक तर जवळचे िदसायला कमी लागले आिण एका चष्मा नावाच्या दािगन्याची भर पडली. मंगळसूत्राबरोबर त्याचाही काळा दोरा गळ्यातच लटकावा लागतो कायम.
एकेकाळी चारचौघींपेक्षा धाडसी असणारी मी. आज साध्यासाध्या गोष्टी करताना िबचकायला लागलेय. चतु:शृंगी काय, हनुमान टेकडी काय, पर्वती काय, चढायला काहीच पाहायचे नाही; पण आता गुडघा दुखेल काय या भीतीने नको गं बाई तो ट्रेक, असे होते. कॉलेजमध्ये ब्यूटी क्वीन असलेली मी आता पोटाचा काय, एकंदर सगळाच घेर वाढलाय. जिममध्ये मेहनत घेऊनही वजनाचा काटा मेला हलायलाच तयार नाही. मलाही जाणवतेय ते पण माझ्या हाताबाहेर सगळ्याच गोष्टी गेल्यात, या हार्मोन्स नावाच्या शत्रूमुळे.
गॅसवर दूध ठेवले तर िवसरून जाते. सगळ्यांना वाटते, िहचे लक्ष कुठे असते? ‘जुळून येती रेशीमगाठी’ बघत असणार आिण इकडे दुधाच्या आिण गॅसच्या शेगडीच्या रेशीमगाठी रोज जुळताहेत. एखाद्याचा चेहरा इतका ओळखीचा वाटतो; पण नावच आठवत नाही. पाच िमनिटे त्या व्यक्तीशी कसे काय बरे आहे ना, बोलणे होते, ती व्यक्ती निघून जाते आिण माझ्या डोक्यात भुंगा, कोण होती ती?
पूर्वी घरी पाहुणे येणार असतील, नातेवाईक येणार असतील तर, काय तयारी करू न् काय नाही असे होऊन जायचे. १०-१५ माणसांचा स्वयंपाक सहज उरकायचे; पण आता दोन पाहुणे येणार आहेत कळले तरी पोटात गोळा येतो. वाटते की, त्या पाहुण्यांचे येणे तरी कॅन्सल व्हावे नाही तर आपणच कुठे तरी िनघून जावे. कामाच्या िठकाणी जबाबदारीची कामे नको वाटतात आता. आत्मविश्वासच कमी झाल्यासारखा झालेय आता.
माझ्या वयाच्या मैित्रणी भेटल्या तर त्यांच्याशी संवाद साधल्यावर त्याही थोड्याफार प्रमाणात अशाच शारीिरक व मानसिक समस्यांना तोंड देताहेत. अशा वेळेस आईची खूप आठवण येते. ती पण या मन:िस्थतीतून गेली असेल, ितने तर कधी आपल्याशी या गोष्टींिवषयी चर्चाही केली नाही. आिण माझ्याही ही गोष्ट कधी लक्षातही आली नाही. का आईला कळलेही नसेल? का आपणच ‘मेनोपॉज’ नावाचा बागुलबुवा करतोय?